नवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला नक्की बघा ! भोजनाचे नियम !

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाभारतात जेवण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे ते आपण पाहणार आहोत. जे व्यक्ती जेवण करतांना या नियमाचे पालन करतात त्याना आरोग्या बरोबरच खूप समृद्धी व संपत्ती ची प्राप्ती होते. शात्रांमध्ये हे दिलेले नियम वैज्ञानिक दृष्टीने ही परिपूर्ण आहेत. आशा प्रकारे जेवण केल्यास मनुष्याला देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

म्हणून आपण ही भोजन करताना या नियमांचे पालन करावे. चला तर जाणून घेऊयात भोजन करण्याचे काही नियम. स्वयंपाक घरात कायम भरभराट रहावी देवी अन्नपूर्णेचा आपल्यावर आशीर्वाद रहावा. तसेच घरात कधीही धनधाण्याची कमतरता असू नये अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी आहार ग्रहण करण्यापूर्वी आहार ग्रहण करताना तसेच जेवण झाल्यानंतर नेमके काय करावे या विषयी काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमाचे पालन आपण भोजन करताना केले तर आपल्या घरात बरकत येते.

जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी आपले दोन्ही हात, दोन्ही पाय व मुख धून स्वच्छ करावे. त्यानंतरच जेवणाला बसावे. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांना आव्हाहन जरूर करावे. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे नेहमी मुख करूनच करावे. भोजनाचे ताट पाट, चटई किंवा चौरंग यावरती नेहमी सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरवात करावी.

जेवण करताना शक्यतो मौन पाळावे. बडबड करत गप्पा मारत भोजन करू नये. तसेच रागारागाने किंवा संताप करून भोजन करू नये. दिवसातून एकदा तरी कुटुंबातील सर्व सद्स्यांसोबत बसून जेवण करावे. कधी ही पायात चपला बूट घालून जेवण करू नये. उष्ट्या, खरकाट्या हाताने कधीही अग्नीला स्पर्श करू नये. शक्यतो जेवण स्वयंपाक घरात बसूनच करावे. यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो. जेवणाचे ताट एका हाताने धरून कधीही जेवण करू नये. यामुळे आपले भोजन नेहमी प्रेत योनीत जाते.

भोजन केल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये.आपल्यासमोर ताटात आलेल्या अन्नाला नावे न ठेवता गुपचूप पणे जेवण करावे. ताटात दिलेले संपूर्ण जेवण संपवावे. ताटात उष्ठे सोडू नये. रात्री जेवण झाल्यानंतर उष्ठी खरकटी भांडी तशीच घरात पडू देऊ नये. जेवण झाल्यानंतर आपले ताट नेहमी योग्य ठिकाणी ठेवावे. रात्रीच्या वेळी तांदूळ, दही किंवा सातूचे सेवन केल्यास देवी लक्ष्मी चा अपमान होतो. म्हणून रात्रीच्या वेळी या वस्तूंचे सेवन करू नये.

जेवणाला बसण्यापूर्वी सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे अशी प्रार्थना भगवंतांकडे करावी. स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा व्यक्तीने सर्वात आदी स्नान करून च स्वयंपाकाला सुरवात करावी.अग्नी देवतेला नैवैध अर्पन करून मगच घरातील सर्वांनी भोजन करावे. दक्षिण दिशेला मुख करून भोजन केल्यास ते जेवण राक्षसांना मिळते, पश्चिम दिशेला मुख करून जेवण केल्यास आपल्याला रोग जडतात. म्हणून पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करूनच जेवायला बसावे.

जेवण कधीही पलंगावर किंवा सोप्यावर बसून करू नये. तसेच पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली बसूनही कधीच जेवण करू नये. उभे राहून जेवण करणे अनुसूचित समजले जाते. कोणी उष्ठे सोडलेले अन्न कधीही खाऊ नये. जेवण करताना कोणत्याही प्रकारच्या अडचण किंवा संकटांन वरती चर्चा करू नये. जर बोलायचे असेल तर चांगले व सकारात्मक बोलावे. जेवण करताना आदी गोड त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थांचा अस्वाद घ्यावा. जेवल्यानंतर लगेच पाणी पियू नये.

भोजन झाल्यानंतर कमीतकमी शंभर पावले तरी चालावे. याला शतपावली म्हणतात. जेवण झाल्यानंतर एका तासाने साखर घातलेले दूध किंवा फळ खाल्यास जेवण पचायला मदत होते. भीष्मपिता महानी महाभारतात सांगितले आहे की ज्या ताटाला कोणाच्या पायाचा स्पर्श झाला असेल तर अशा ताटातील भोजन कधीही खाऊ नये. जेवण करत असताना जर कोणी ताटाला ओलांडले असेल तर अशा ताटामधील सुद्धा जेवण करून नये.

भीष्म पिता महान म्हणतात एकाच ताटात दोन भावांनी जेवण केल्यास ते ताट अमृतासमान बनते. त्या भोजनामुळे धन, धान्य, आरोग्य संपत्ती ची प्राप्ती होते. भीष्मपिता महान नुसार पती-पत्नीनी कधीही एकाच ताटात जेवन करू नये, जर पती-पत्नीनी एकाच ताटात जेवण केले तर ते ताट मादक पादार्थानी भरलेले ताट बनते. लग्नापूर्वी कुमारी किंवा मुलीने व वडिलांनी एकाच ताटात जेवण केल्यास वडिलांच्या आयुष्यात वृद्धी होते. मित्रानो या आहेत त्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या जेवण करताना सर्वांनी लक्षात ठेवाव्यात व त्याप्रमाणे जेवणाचे नियम पाळावेत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *