एक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल!

मित्रांनो ही सत्य घटनेवर आधारित गोष्ट आहे. ही गोष्ट आहे गरीब घरातील एका छोट्या मुलाची त्यांच्या कुटुंबाकडे ज्यास्त पैसे नव्हते छोटा मुलगा लहान सहान खेळणी विकून पैसे कमवत होता. त्याच पैश्यानी तो आपल्या शाळेची फी भरत होता. एके दिवशी तो असाच विक्रीसाठी निघाला होता आणि सकाळ पासून त्याने काहीही खाल्ले नव्हते. त्याला जोराची भूक लागली होती.

त्याने विचार केला आपण ज्या घरासमोर समान विक्रीसाठी जाऊ त्यावेळेस समान विक्रीनंतर पैशाच्या बदल्यास जेवायला मागू तो एका घरी गेला बेल वाजवली आणि घरातून एक मुलगी समोर आली. आता तो हैराण झाला आणि गडबडीत त्याने त्या मुलीला पाहून एक ग्लास पाणी मागितले. मुलगी किचन मध्ये गेली आणि विचार करु लागली हा मुलगा खूप हैराण झाले आहे. प्रत्येक घरी जाऊन सामान विकतो बहुतेक त्याला भूक लागली असेल म्हणून त्या मुलीने एक ग्लास पाण्या ऐवजी एक ग्लास दुध घेतले. आणि तो दुधाचा ग्लास त्या मुलाला दिला.

मुलगा ते दूध हळू हळू पिऊ लागला आणि मनामध्ये विचार करू लागला खरच ह्या जगात चांगली माणसे जरूर आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे दूध पिऊन झाल्यावर त्याने तो ग्लास मुलीला माघारी दिला आणि तो मुलगा त्या मुलीला म्हणाला ह्या एक दुधाच्या ग्लासचे किती पैसे मी तुम्हाला देऊ. त्यावर ती मुलगी त्याला म्हणाली नाही नाही माझ्या आईने मला शिकवले आहे कोणाची ही मदत केली तरी त्याच्याकडून पैसे घेऊ नकोस मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत. त्यावर तो मुलगा म्हणाला ठीक आहे मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तो मुलगा तेथून निघून गेला.

मुलगा ज्या वेळी तेथून घरी जात होता त्या वेळी त्याच्या मनामध्ये विचार येत होता की दुनियेत अजून माणुसकी अजून ही जिवंत आहे. त्या नंतर त्याने अनेक वर्ष मेहनत केली समान विकत राहिला शाळेची फी देत तो शिकत राहिला त्या नंतर कॉलेज ही असेच पूर्ण केले. तो शिकून डॉक्टर झाला आणि थोड्याच वर्ष्यात तो एक चांगला डॉक्टर बनला. आता तो मोठ्या शहरात एक नामांकित डॉक्टर झाला होता. त्या मुलाचं म्हणजेच त्या डॉक्टरच नाव होतं हॉवर्ड केली, एके दिवशी ते हॉस्पिटलमध्ये बसेल असताना त्यांना कळले एक मुलगी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली आहे.

तिची कंडिशन खूप सिरीयस होती. तिचे नाव व तिचा पत्ता पहिल्या नंतर त्यांना कळून चुकले की ती मूलगी त्याच गावची आहे जिथे मी राहत होतो त्या गावच्या गल्ली बोळातून मी समान विकायचो. त्याला सगळे एक झटक्यात आठवले मग त्याला कळाले त्या मुलीच्या आयुष्यात काय चांगले झाले नाही. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती बिघडली होती तिची तब्येत ही खराब झाली होती. त्या मुलीला तिथल्या डॉक्टरानी ह्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी पाठवले होते.

ह्या हॉवर्ड केली डॉक्टरानी पूर्ण ताक्तिनिशी मोठ्या एक्सपर्ट डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्या मुलीची ट्रीटमेंट केली आणि ती मुलगी ठीक ही झाली. आता ती एकदम ठणठणीत बरी झाली होती आता त्या मुलीजवळ ट्रीटमेंटचे बिल जाणार होते. बिल ज्या वेळेस देणार होते त्या वेळेस डॉक्टरानी त्या बिलाच्या वर लिहलेला एक कागद लावला आणि तो कागद आणि बिल एक लिफाफ्यात घालून पाठवून दिले तो लिफाफा नर्स ने त्या मुलीच्या हातात दिला व म्हणाली हे ट्रीटमेंट चे बिल आहे आता ती मुलगी विचार करत होती की आता मी पूर्णपणे बरी झाली आहे पण हे बिल मी आता कसे भरू आता हा मोठा प्रश्न त्या मुली समोर उभा होता.

आता तो लिफाफा ती मुलगी हळू हळू उघडून पाहू लागली त्यातील एक एक कागद पाहू लागली त्या मधील काही रिपोर्ट ट्रेटमेंट संदर्भातील कागदपत्रे होते आणि त्या रिपोर्ट च्या वर एक लहान कागद चिटकवला होता त्या कागदावरती काय तरी लिहले होते ते तिने काळजीपूर्वक वाचले त्यावर असे लिहले होते घाबरण्याचे काही कारण नाही तुमच्या ट्रीटमेंट चे सगळे बिल खुप वर्ष्यापूर्वी एक ग्लास दुधाने भरले गेले आहे.

त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले होते डॉक्टर हॉवर्ड केली तिच्या समोर येऊन उभे राहिलेआणि तिला बोलले खूप वर्ष्या पूर्वी तुमच्या गल्लीत समान विकण्यासाठी आलो होतो त्या वेळेस खरच मला खूप भूक लागली होती आणि तुम्ही मला एक ग्लास दूध दिले होते आणि माझी भूक भागवली होती. मित्रानो ही छोटीशी घडलेले घटना आपल्याला खुप काही शिकवून जाते. आयुष्यात जर तुम्ही चांगले काम कराल तर तुमच्यासोबत चांगले होईल जर तुम्ही वाईट केले तर तुमच्या सोबत नक्कीच वाईट होणार कर्म सगळ्यांत मोठी गोष्ट आहे . जय हिंद जय महाराष्ट्र..

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *