लांबसडक आणि दाट केस हवे आहेत मग हे घरगुती उपाय नक्की करा…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत केस घनदाट होण्यासाठी घरगुती उपाय. तुम्हाला जर तुमचे केस लांब सडक, चमकदार आणि सुंदर दिसावेत असे वाटत असेल तर हे उपाय नक्की करा. चला तर पाहुयात हे उपाय.

मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहुयात केस न वाढण्याची अथवा केस गळतीचे कारणे : आपल्या रोजच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात ताण-तणाव असल्यामुळे केस गळती आणि केस न वाढण्याच प्रमाण हे वाढलेल आहे. त्याचप्रमाणे औषधांचे अधिक सेवन हे देखील केस गळतीचे महत्वाचे कारण असू शकते. या औषधांचे बरेच दुष्परिणाम ही आहेत.

जे सर्वात पहिले आपल्या केसांवरच होत असतात आणि त्यामुळेच केस गळती होऊ शकते. त्याचप्रमाणे आपले जेवण बऱ्याच अंशी केस चांगली होण्यासाठी मदत करत असते. पण जर खाण्यामध्ये फास्ट फूड,जंक फूड आणि आरोग्याला अपायकारक असे पदार्थ जास्त प्रमाणात खात राहिल्यास केस गळती जास्त प्रमाणात होते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या आहारात पोषक आहाराचे पदार्थ वाढवावे.

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय : पहिला उपाय सर्वप्रथम केसांच्या वाढीसाठी २-३ बायोटिन्सच्या गोळ्यांची पावडर करून खोबरेल तेलामध्ये मिक्स करावे. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लावावं आणि हे मिश्रण रात्रभर तसाच लावून ठेवाव. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपले केस टाका. तुम्हाला या उपायाचा नक्की फायदा होईल. आठवड्यातून २ वेळा तुम्ही हा उपाय करा. बायोटिन्समध्ये हिरव्या पालेभाज्यामधील व्हिटामिन ई च प्रमाण जास्त असत. त्यामुळे केसगळती थांबवण्यासाठी याची खूप मदत होते.

दुसरा घरगुती उपाय म्हणजे २ लहान कांदे व्यवस्थित कापून घेऊन त्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या. केसांच्या मुळांना कापसाच्या साहाय्याने हा कांद्याचा ज्युस केसांना लावा. हा ज्युस साधारणपणे 15 मिनिटे केसांवर लावून ठेवा. त्या नंतर शॅम्पूने केस स्वच्छ दुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय तुम्ही करून पाहा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कांद्याच्या ज्युस मध्ये असलेल्या सल्फर मिळे केसांच्या वाढीला वेग मिळतो. केस वाढवण्यासाठी हा अत्यंत जुना आणि उपयोगी उपाय आहे.

तिसरा उपाय म्हणजे कोरफड चिरून त्यामधील जेल काढून घ्या. ते जेल केसांच्या मुळांपासून लावा आणि एक तास हे जेल केसांवर असच राहु द्या. त्यानंतर केस शॅम्पू ने स्वच्छ दुवा. आठवड्यातून २-३ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. केसांमधील कोंडा काढून टाकण्यासाठी कोरफडीच्या जेल चा खूप उपयोग होतो. कोरफडीमध्ये केसांना लागणारे आवश्यक घटक असतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास खूप मदत होते.

चौथा उपाय म्हणजे केस वाढवण्यासाठी २ कप गरम पाण्यामध्ये ७-८ मिनिटं १ ग्रीन टी बॅग ठेऊन द्या. त्यानंतर हे पाणी केसांच्या मुळांना लावा. एक तासांसाठी हे केस असेच राहु द्या. त्यानंतर गार पाण्याने केस स्वच्छ धुऊन टाका. केस गळती थांबवण्यासाठी ग्रीन टी मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट खूप मदत करतात. याचा केसांवर खूप चांगला आणि सकारात्मक परिणाम होतो.

पाचवा उपाय म्हणजे १ कप मेहंदी आणि अर्धा कप दही एकत्र करून भिजवून घ्या. केसांच्या मुळांपासून हे मिश्रण लावाया आणि हे मिश्रण केसांना सुखेपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ धुऊन टाका. महिन्यातून एकदा हा उपाय तुम्ही करून पाहा. मेहंदीचा वापर केसांसाठी पूर्वीपासून करण्यात येत आहे. मेहंदी मुळे तुमचे कोरडे केस मऊ आणि मुलायम होतात. त्याचप्रमाणे तुमच्या केसांना या मेहंदी मुळे एक वेगळाच रंग येतो.

मित्रांनो केस लांबसडक, मुलायम, कोंडा मुक्त करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करून पाहा. या उपायांचा फायदा तुमच्या केसांना नक्की होईल. मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *