कोमट पाणी पिणारे हे माहीत आहे काय, हे माहित असणे काळाची गरज आहे…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्या सर्वाना कोणतं किंव्हा गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे आणि प्रत्येक जण कोणताही विचार न करता कोमट पाणी पित आहे. परंतु अशा काही व्यक्ती असतात ज्यांनी अजिबात कोमट पाणी पिऊ नये.

कोमट पाणी सर्वानाच लाभदायक आहे का? सर्व जण कोमट पाणी पिऊ शकतात का? दिवसातून किती वेळा कोमट पाणी प्याव आणि किती प्रमाणात प्याव हे कोणालाच माहिती नसेल. प्रत्येकाला कोमट पाणी पिता येत नाही. तर काही अशा व्यक्ती असतात ज्यांनी कोमट पाणी अजिबात प्यायचं नसत. तर या कोणत्या व्यक्ती आहेत यामध्ये आपण तर नाही ना. हे माहिती करून घेणं सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ही माहिती नक्की वाचा.

मित्रांनो सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊयात की या काळात तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला का दिला जातोय. मित्रांनो कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे तुमची किडनी स्वच्छ राहते आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहते.

कोमट पाणी पिल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रमाणात वाढते. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचं सांगितलं जातं. सध्याच्या वातावरणामध्ये 3500 हजार प्रकारचे वायरस आहेत. त्याच्या विरुद्ध कोमट पाण्यात तुम्ही लिंबू पिळून जर तुम्ही ते पाणी प्यायला तर जवळजवळ यामधील 80% वायरस विरुद्ध लढण्याची ताकद तुमच्या तयार होते. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पोटाचे अनेक आजार हे कोमट पाणी पिल्याने निघून जातात. तुमची पचनशक्ती चांगली होते आणि ज्यांचं पचन चांगलं असत त्यांचं आरोग्य उत्तम राहत. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी पिल्यामुळे मेंदूमधील 80% पेशी या ऍक्टिव्ह राहतात. कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील जे टॉक्सिक घटक असतात ते सहज बाहेर फेकले जातात. याचे शरीराला जरी फायदे असले तरी सर्वाना कोमट पाणी पिता येत नाही. तर अशा काही व्यक्ती आहेत किंव्हा असे काही आजार आहेत ज्यांनी कोमट पाणी पिऊ नये. किंव्हा कमी प्रमाणात पिले जावं.

कोणत्या लोकांनी कोमट पाणी पिऊ नये किंव्हा थोड्या प्रमाणात प्यावे. मित्रांनो ज्यांचे बायपास झालेलं आहे म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे अशा व्यक्तींनी कोमट पाणी प्यायचं नाही किंव्हा थोड्या प्रमाणात प्यावे. दिवसातून फक्त 1 ते 2 वेळेस हे लोक पाणी पिऊ शकतात. ज्यांचे केस खूप गळतात अशा व्यक्तींनी सुद्धा कोमट पाणी प्यायचं नाही.

जर अशा लोकांनी खूप जास्त कोमट पाणी पिले तर आणखीन जास्त त्यांचे केस गळतात. अशा व्यक्तींनी जास्त पाणी पिले पाहिजे पण नॉर्मल पाणी पिले पाहिजे. उन्हातून आल्यानंतर लगेच कोमट पाणी पिऊ नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवण केल्यानंतर लगेच कोमट पाणी पिऊ नये. थोड्या वेळाने पिले तरी चालेल.

कोणत्या लोकांनी कोमट पाणी आवर्जून पिले पाहिजे : मित्रांनो ज्यांना सतत सर्दी आणि खोखला होतो, सतत आजारी पडतात अशा व्यक्तींनी कोमट पाणी हे आवर्जून प्यायले पाहिजे. त्याचबरोबर ज्यांना सतत फंगल इन्फेक्शन होत, त्वच्या सतत होतो अशा व्यक्तींनी सुद्धा कोमट पाणी प्यायचे आहे. चेहऱ्यावर ज्यांच्या जास्त प्रमाणात मुरूम येतात अशा व्यक्तींनी सुद्धा कोमट पाणी पिणे खूप गरजेचे आहे. ज्यांना युरिन इन्फेक्शन सतत होत असत, लघवी मध्ये जळजळ होणं अशा व्यक्तींनी सुद्धा कोमट पाणी पिणे गरजेचं असत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी देखील कोमट पाणी पिणे महत्वाचं आहे.

मित्रांनो कोमट पाणी कोणत्या वेळेवर प्यावं आणि किती प्रमाणात प्यावं : कोमट पाणी हे नेहमी पिले तरी चालत परंतु सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी 30 मिनिटे कोमट पाणी पिणे खूप लाभदायक असत. एका वेळेस साधारणता एक ग्लास पेक्षा जात पाणी पिऊ नये. एक ग्लास पेक्षा तुम्ही जास्त पाणी प्यायले तर तुम्हाला याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत,पण हळूहळू परिणाम दिसून येतील. मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *