कसलाही भयानक त्वचारोग गजकर्ण, नायटा, खरूज दोन दिवसात बरा…

मित्रांनो आजचा उपाय हा खास आहे. त्वचा रोग ही समस्या हल्ली अनेक जणांना भेडसावत असते आणि त्वचा रोगावर कायमस्वरूपी उपाय आहे तो आपण पाहणार आहे. बाजारामध्ये अनेक क्रीम मिळतात, अनेक औषधांचा तुम्ही वापर करता परंतु त्याने तुम्हाला तात्पुरता फरक पडतो. परंतु हा आजार परत उद्भवतो. त्वचारोग शरीराच्या अशा भागावर होतात की तिथे हवा लागत नाही आणि मग आत आद्रता कमी असते आणि ओलसरपणा तसाच राहिल्यामुळे आपल्याला हे त्वचारोग होत असतात.

असे त्वचारोग तुमच्या काखेत, जांघेत, मानेवर शरीराच्या कुठल्याही भागावर होऊ शकतात आणि हे जर कायमचे नष्ट करायचे असतील तर त्यासाठी अतिशय सुंदर, साधा उपाय तुम्ही आज आपण करणार आहे. तो लेप फक्त पाच दिवसपर्यंत लावायचा आहे. कसलेही खरूज, गजकर्ण, नायटा असुद्या, तुमचा कसल्याही प्रकारचा त्वचारोग असुद्या कायमस्वरूपी बरा होईल आणि परत उद्भवणार नाही. यासाठी आपल्याला कडुलिंबाची पाने लागणार आहेत.

कडुलिंब आपल्याला सहज उपलब्ध होतो. कोणत्याही प्रकारचा पैसा आपल्याला खर्च न करता मिळतो. तर या कडूलिंबची पाने साधारणतः दोन ते तीन चमचे रस निघेल इतके घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरच्या साहाय्याने याचा रस काढू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध होईल त्याच्या आधारे रस काढू शकता. दुसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे तुळशीची पाने. तुळशीची पाने सहज उपलब्ध होतात. तर आपल्याला पाच ते सहा तुळशीची पाने घ्यायची आहेत.

तिसरा महत्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे दूध. शेवटचा घटक लागणार आहे ते म्हणजे डोक्याला लावतो ते खोबरेल तेल. ते कोणत्याही प्रकारचे असुद्या त्यात कोणतीही व्हरायटी असुद्या त्यात काही अडचण नाही. तर साधारणतः दूध आपल्याला पाच ते सहा चमचे घ्यायचे आहे. दूध घेतल्यानंतर याच्या निम्मे म्हणजे आपण जो कडुलिंबाचा रस काढलेला आहे तो तीन चमचे यामध्ये मिक्स करायचा आहे. यानंतर यामध्ये तुळशीची सहा पाने टाकायची आहेत. यानंतर खोबरेल तेल दोन चमचे घ्यायचे आहे.

असे हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला साधारणतः दोन मिनिटापर्यंत व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तर मित्रांनो पाच मिनिटानंतर हे मिश्रण घट्ट होईल. घट्ट झालेलं मिश्रण लावण्याअगोदर आपल्याला डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड मिळते, हे व्यवस्थितपणे आपल्याला ज्या ठिकाणी खरूज, गजकर्ण, नायटा झालेला आहे त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे कापडाने पुसून घ्यायचं आहे.

पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ह्या लेपचा किंवा पेष्टचा वापर करायचा आहे. जे काळे डाग पडलेले असतात त्वचा रोगामुळे झालेले असतात, जसे की गजकर्ण किंवा नायटा तर याचे काळसर डाग पडतात तर हे काळसर डाग जाण्यासाठी नारळाच्या तेलाचा फार उपयोग होतो. यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे. त्यामुळे तुमची की त्वचा आहे ती एकदम मऊसर होण्यास मदत होते. तर मित्रांनो तुम्ही याचा वापर करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला नायटा गजकर्ण, खरूज, नायटा झालेला आहे. साधारणतः दोन मिनीटापर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचं आहे.

लावल्यानंतर हे तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटापर्यंत असेच ठेवायचे आहे. जर हा उपाय रात्री झोपताना केला तर अतिउत्तम. रात्रभर असच ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचा गजकर्ण असुद्या, नायटा असुद्या कोणताही त्वचारोग असुद्या तो निघून जाण्यास अतिशय प्रभावी हा उपाय आहे. तर मित्रांनो त्वचारोग लपवण्यापेक्षा हा उपाय केला तर तुमचा त्वचारोग निघून जाण्यास मदत होईल. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *