हाता-पायाला मुंग्या बधिरपणा यावर रामबाण उपाय?

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो साधारणपणे हात, पाय, खांदे यांना मुंग्या येतात. याच कारण झोपतांना, बसताना किंव्हा उभे राहताना शरीराच्या याच अंगांवर सर्वात जास्त प्रेशर पडत. बऱ्याच वेळा पाय दुमडून बसल्याने किंव्हा एकाच जागी जास्त वेळ बसल्याने हातपायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे मुंग्या येतात. हा त्रास आपण सर्वांनीच अनुभवला असेल.

हातापायांना मुंग्या येणं सामान्य बाब जरी असली तरी वारंवार जरी मुंग्या येत असतील तर त्यावर योग्य उपचार करणे देखील खूप गरजेचं असत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा आपल्या रक्तप्रवाह थांबतो तेव्हा शरीराच्या काही अंगाणा मुंग्या येतात. तर आज आपण जाऊन घेऊयात मुंग्या येण्याची काय कारणे असतात आणि त्याच सोबत काही सोपे घरगुती उपाय.

वारंवार हाता-पायांना मुंग्या येण्याची कारणे- प्रामुख्याने एकाच स्थितीत अनेक वेळ बसून राहिल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. हायपर, थायरॉईड चा त्रास असल्यामुळे देखील हाता-पायांना मुंग्या येतात. शरीरात व्हिटामिन B12 ची कमतरता असेल तर हाता-पायांना मुंग्या येतात. त्यामुळे वारंवार थकल्यासारखे वाटत. सारखा कंटाळा येतो. शिवाय आळस ही वाढतो.

संगणकावर सतत टायपिंग केल्याने मनघटाच्या नसा आखडत्या झाल्यामुळे हाताला मुंग्या येतात. तसेच सतत फोन हातळल्याने ही हा त्रास होऊ शकतो. मानेची नस आखडल्याने सुद्धा पायांपासून ते हातांपर्यंत मुंग्या येतात. चुकीच्या पद्धतीत बसल्याने मानेची नस आखडली जाते. रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हाता-पायांना मुंग्या येतात.

हाता-पायांना मुंग्या येऊ नयेत किंव्हा जर मुंग्या आले तर कशी काळजी घ्यावी- मित्रांनो जर तुम्हाला नेहमी मुंग्या येण्याची समस्या होत असेल तर सकाळी सुंठाचे काही तुकडे आणि लसणाच्या दोन पाकळ्या चाऊन खाव्यात.याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो.

मित्रांनो पिंपळाचे झाड खूप गुणकारी मानले जाते. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात. जर तुम्हाला नेहमी मुंग्या येण्याची समस्या होत असेल तर पिंपळाची तीन ते चार पाने मोहरीच्या तेलात गरम करून घ्या. ही पाने थोडी थंड झाल्यावर जेव्हा तुम्हाला मुंग्या येत असतील त्या जागेवर तुम्ही ही पाने लावू शकता.

मित्रांनो तूप सुद्धा या समस्यांवर खूप चांगला उपाय मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी थोडं तूप कोमट करून घ्या आणि ते तळपायांना लावा. तुम्हाला होत असलेली मुंग्या येण्याची समस्या नक्कीच दूर होईल. ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी गरम पाण्याचा शेक द्यावा. गरम पाण्याचा शेक दिल्यामुळे रक्तप्रवाह वाढून मुंग्या येण्याची समस्या ही कमी होऊ शकते.

या समस्या दूर करण्यासाठी योग्य आहार घ्यावा. व्हिटामिन B आणि प्रोटीन असणारे पदार्थ यांचा समावेश आहारामध्ये नक्की असावा. दूध व दुधापासून बनणारे पदार्थ, अंडी, मासे सोयामिल्क, या मध्ये व्हिटामिन B12 खूप जास्त प्रमाणात असत. तसेच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या, मोड आलेली कडधान्य, व विविध फळे यांचा समावेश आहारामध्ये नक्की करावा. तुम्ही हे छोटे छोटे आयुर्वेदिक उपाय नक्की करून पाहा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *