विनंती करतो जेवणासोबत प्रत्येक जण पदार्थ खा, फुफ्फुसे स्वच्छ, छातीतील कफ जळेल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो शारीरिक रोगप्रतिकारशक्ती आपल्या पाचन तंत्रावर 100% अवलंबून असते. आपण जे खातो त्याचं व्यवस्थित पचन न झाल्यास गॅसेस होणे, पोटाचे विकार, पोट साफ न होणे, उष्णता वाढणे, पित्त, असे असंख्य विकार पाहायला मिळतात.

ज्याचा परिणाम आपल्या फुफुसांवरती होत असतो. ज्याद्वारे ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, स्वास घेताना त्रास होणे, दम लागणे, असे होते. शरीरामधील ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याची इतरही कारणे आहेत , त्यामध्ये दमा, व्यसन, थकवा, पचन संस्थेचे विकार.

मित्रांनो आपल्या शरीरातील ph नेहमी अल्कलाईन राहायला हवा ना की ऍसिडिक. Ph ऍसिडिक झाल्यास ऑक्सिजन लेव्हल कमी होते. म्हणून ऍसिडिक लेव्हल सुरळीत होण्यासाठी, पाचनशक्ती चांगली करण्यासाठी आपण जो आज हा पदार्थ बनवणार आहोत याने 100% तुम्हाला फरक मिळेल. चला तर पाहुयात हा उपाय करण्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत व हा पदार्थ कसा बनवायचा?

मित्रांनो सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये घाबरू नका, धेर्याने सामोरे जा. घराच्या बाहेर पडताना मास्क चा वापर करा. गरज असेल तरच घरच्या बाहेर पडा. गरज नसताना जास्त काढे घेऊ नका. कारण जास्त काढे घेतल्याने उष्णता वाढते. मित्रांनो अशा या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे लसूण. लसणामध्ये असलेला औषधी गुणधर्मामुळे पोटातील मेंटाबॉलीजम सुधारते.

लसणामध्ये असणारे व्हिटामिन A,B, C , कॅल्शिअम, पोटॅशियम, सल्फर, लोह, हे घटक संसर्गजन्य आजरापासून बचाव करतात. तसेच ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रीत राहण्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त मानला जातो.म्हणून आजच्या उपायासाठी लसूण लागणार आहे साधारण 50 ग्राम. हा 50 ग्राम लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे.

यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे आले, अद्रक. अद्रक ला आयुर्वेदामध्ये महाऔषध असे म्हटले जाते. कारण या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटामिन C, व्हिटामिन B केरोटीन, थायमिन भरपूर असते. ज्याद्वारे मित्रांनो शरीरातील वातकफ नष्ट होतो. अपचन, तोंडाला चव नसणे, जेवण न करू वाटणे, पोटात गॅस धरणे अशा समस्येवरती आदरक अत्यंत उपयुक्त ठरते.

म्हणून आजच्या उपायासाठी आपणास अदरक लागणार आहे. असे बारीक कापे केलेले वीस ग्रॅम अदरक लागणार आहे. असे हे वीस ग्रॅम अदरक घेतलेच्या नंतर पुढील घटक लागणार आहे ते म्हणजे काळे मिरे. अँटीबोयोटिकचे काम करणारे काळे मिरे अत्यंत उपयुक्त ठरतात. पाचनशक्ती सुधारण्यासाठी, घशातील त्रास सुधारण्यासाठी, हे काळे मिरे अत्यंत उपयुक्त ठरतात. असे के 20 ग्राम काळे मिरे चूर्ण आपण या उपायासाठी घ्यायचे आहे.

पुढील पदार्थ आपणास या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे गूळ. गूळ हा पाचक असतो. पोटातील सर्व विकारावरती गूळ अत्यंत फायदेशीर ठरतो. गुळामधील लोह आणि कॅल्शियम मुळे स्नायु आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. म्हणून हा उपाय बनवण्यासाठी गूळ लागणार आहे 100 ग्राम. यानंतर या मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे आहे.

असे हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर हे सर्व मिक्सर च्या साहाय्याने बारीक करून घ्या. असे हे बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण जेवणासोबत 20 ग्राम घ्यायचे आहे. तुम्ही हे मिश्रण चटणी म्हणून खाऊ शकता. अशी ही चटणी खाल्याने छातीतील कप, स्वास घेण्यास होणार त्रास कमी होण्यासाठी ही चटणी खूप फायदेशीर ठरते. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *