घाबरून न जाता घरातील या 4 पैकी कोणत्याही 1 पदार्थाचे सेवन करा, ऑक्सिजन नेहमी 100 राहील…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. सध्याच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला जर सुरक्षित राहायचे असेल, आपले फुफ्फुस स्वच्छ ठेवायचे असेल, आणि शरीरामधील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ द्यायची नसेल, तर आपल्याच घरांमधील या चार पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही आवश्य खा. ज्यामुळे तुमचे फुफ्फुस स्वच्छ राहील आणि ऑक्सिजनची पातळी कमी होणार नाही.

विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, अशा व्यक्तींसाठी खास एक पदार्थ सांगणार आहे. तो पदार्थ जर त्यांनी खाल्ला तर त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही. सध्या आपण पाहतोय किती बिकट परिस्थिती आहे. कारण आत्ता आपण पाहत आहोत की, लहान मोठ्या सर्व व्यक्तींना ऑक्सिजनची गरज लागत आहे.

कारण वातावरणामध्ये सुद्धा ऑक्सिजनची जी पातळी आहे ती कमी आहे. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की, एक तरी झाड अवश्य लावा. कारण झाडे ही आपल्याला वर्षभर कित्येक मेट्रिक टन ऑक्सिजन मोफत देतात. असे केल्याने वातावरणामध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात राहील. आणि त्यामुळे आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडणार नाही.

किमान तुळशीची दोन झाडे आपल्या गॅलरीमध्ये, कुंडीमध्ये असावीत. तुळस रात्रंदिवस आपल्याला ऑक्सिजन देण्याचे काम करत असते. असे केल्याने आपल्या घरामध्ये ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मानवी शरीर हे अत्यंत मजबूत असते. स्वतःचे आजार स्वतः बरे करण्यासाठी लागणारी इम्युन सिस्टीम खूप मजबूत असते.

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनला किंवा रोग जंतूला सहज हरवू शकेल, अशा प्रकारची रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीरामध्ये असते. म्हणून आपल्याला कोणतेही इन्फेक्शन झाले असेल तर घाबरू नका. घाबरल्यामुळे पेशंट जास्त क्रिटिकल कंडिशन मध्ये जात आहेत. घाबरल्यामुळे आपला श्वास व बीपी वाढतो. धाप लागते. आपले शरीर मग आपल्याला साथ देत नाही.

म्हणून घाबरून न जाता संकटाचा धैऱ्याने सामना करा. सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करा. तर आपले फुफ्फुस स्वच्छ राहावे यासाठी आज आम्ही तुम्हाला 4 पदार्थ सांगणार आहोत. यापैकी कोणताही एक पदार्थ आपल्याला खायचा आहे. ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढेल आणि आपण निरोगी आयुष्य जगू.

सर्वात पहिला पदार्थ म्हणजे कडीपत्ता. ज्यांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी कडीपत्ता वरदानच आहे. कडीपत्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. ही पाने कच्चीच घ्या. सकाळी उठल्यावर ब्रश केल्यानंतर चहाच्या आधी तुम्ही ही 5 ते 6 पाने खा. यामुळे तुमची शुगर म्हणजे शरिरातील साखर नियंत्रित राहते. फुप्फुसाचे आरोग्य चांगले राहते.

या पानांमध्ये असलेल्या ओयानिझिन नावाच्या ग्लुकोसाईड मुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. घरामधला दुसरा घटक जो तुम्ही आवश्य खाल्ला पाहिजे तो म्हणजे, कच्ची लसूण पाकळी. ही लसूण पाकळी प्रत्येकाने सकाळी कच्ची चावून खाल्ली पाहिजे. आयुर्वेदामध्ये लसूण हा निमोनिया च्या उपचारांवर वापरणार जाणारा खूप महत्वाचा घटक आहे. सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर तो देखील यामुळे नाहीसा होतो.

यामध्ये असलेल्या विविध घटकांमुळे फुफ्फुस स्वच्छ राहते, रक्त पातळ राहते, हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात आणि रक्ताभिसरण नीट प्रकारे होते. ऑक्सिजन सगळ्या पेशींपर्यंत चांगल्या प्रकारे पोहचला जातो. किमान एक लसूण पाकळी सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. तीन नंबर चा घटक आहे तो, म्हणजे लिंबू. लिंबू हे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.

व्हिटॅमिन सी ने भरपूर असणारे लिंबू विविध प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शन सोबत लढण्यासाठी मदत करते. लिंबामुळे कफ होत नाही आणि प्रतिकार शक्ती वाढते. सकाळी उठल्याबरोबर एक ग्लासभर कोमट पाणी घ्या आणि पूर्ण एका लिंबाचा रस या कोमट पाण्यात घालून प्या. यामुळे फुफ्फुसाचा आजार तुम्हाला होणार नाही.

चौथ्या नंबरचा घटक आहे तो म्हणजे तुळशीची पाने. तुळशीची 2 पाने उठल्याबरोबर चावून खा. ही स्वच्छ पाने तोंड धुण्याआधी चावून खा. तुळस हा असा घटक आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला आणि कफ अजिबात होणार नाही. शिवाय फुफ्फुसाची जी ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी ही पाने मदत करतात.

आपल्या सकाळच्या लाळेसोबत तुळशीची पाने चावून खाल्यामुळे तुमच्या छातीमध्ये कधीची कफ होणार नाही. या 4 घटकांपैकी कोणताही एक घटक तूम्ही या परिस्थिती मध्ये आवर्जून खा. यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढेल. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल. त्याचबरोबर सर्दी खोकला सारखे व्हायरल आजार होणार नाहीत.

तुमची फुफुसे स्वच्छ, निरोगी आणि सुदृढ राहतील. यातील कोणताही पदार्थ तुम्ही रोज खा आणि निरोगी आयुष्य जगा. काळजी घ्या. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *