हा 1 तुकडा चहात टाका, तुमचे फुफ्फुस संपूर्ण स्वच्छ! रोग प्रतिकारशक्तीत प्रचंड वाढ, सर्दी, खोकला चुटकीत,…

मित्रांनो सध्याच्या या वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला पाहायला मिळत आहे. यासोबतच लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच व्यक्तींना घरी बसून नेहमी राहिल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना संधीवात, गुढघेदुखी, कंबरदुखीचा त्रास, वजन वाढलेले आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे, पोटाच्या तक्रारी आहेत.

या पोटाच्या तक्रारींमध्ये वारंवार गॅस होणे, खाल्लेलं पचन व्यवस्थित न होणे, सकाळी उठल्याबरोबर पोट साफ न होणे या समस्या, तोंडाचा वास येणे, दाताच्या सर्व समस्या तसेच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी आपण आज एक चहा बनवणार आहोत. यांसाठी हा चहा अत्यंत उपयुक्त आहे. या चहाने या सर्व समस्या कमी होतात.

असा हा चहा बनवण्यासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते सहज उपलब्ध होतात. बऱ्याच व्यक्तींचं वजन वाढलेलं आहे, बऱ्याच व्यक्तींना नेहमी ताप असतो. या उपायासाठी चार कप पाणी घ्या. या उपायासाठी पहिला घटक लागणार आहे तो गवती चहा. गवती चहा सर्वत्र पाहायला मिळतो. शरीरातील ताप कमी करण्यासाठी, शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी, पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी हा गवती चहा अत्यंत उपयुक्त असतो.

याचे प्रमाण घेताना पाच ग्रॅम किंवा दहा ग्रॅम जास्तही घेतले तरी याचा कसलाही साईड इफेक्ट होत नाही. असा हा गवती चहा आणून याची पावडरही बनवू शकता किंवा याला वाळवुनही घरी ठेऊ शकता. दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सुंठ. सुंठ प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. नाही मिळाली तर अदरकही वापरू शकता. पोटाच्या समस्या ठीक करण्यासाठी मदत करते. पाचनशक्ती मजबूत होते.

तसेच हृदयासंबंधीच्या आजाराचा धोका कमी करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. म्हणून मासिक पाळी, सर्दी, खोकला, कणकण, ताप आल्यावर आलं टाकून चहा देतात. मित्रांनो आल्यामध्ये असलेले ऍक्टिव्ह कंपौंडस इन्सुलिन आणि मेटाबोलीज म उत्तम होण्यासाठी मदत करते. यामुळे मधुमेहाचा धोका कामी होण्यासाठी हे आदरक अत्यंत उपयुक्त असते.

सर्दी, घशासंबंधीच्या तक्रारीमध्ये सुंठ अत्यंत उपयुक्त असते. म्हणून यासाठी आपण छोटा एक चमचा सुंठ वापरणार आहोत. पुढचा पदार्थ लागणार आहे दालचिनी. सहज घरामध्ये उपलब्ध होते. दलचिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन A आणि C भरपूर प्रमाणात असते. दालचिनी चवीला तिखट गोड असते. मनाची अस्वस्थता कमी करते. तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून या उपायासाठी दालचिनी वापरणार आहोत. दालचिनी एक चमचा घेणार आहोत.

मित्रांनो पुढचा पदार्थ लागणार आहे साखर. साखर एक चमचा लागणार आहे. ज्या लोकांना डायबेटीस आहे त्यांनी अगदी थोडीशी वापरा. यासाठी पुढचा पदार्थ लागणार आहे चहापावडर. मित्रांनो चहा पावडर यामध्ये थोडी टाका. साधारणतः जो चमचा आहे त्यापेक्षा अर्धी टाका आणि हा चहा आहे तो उकळायला ठेवा. साधारणतः चार कपाचे एक कप होईपर्यंत उकळून घ्या.

असा हा तयार झालेला चहा मित्रांनो गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा आहे. ज्या व्यक्तींना सर्दी, पडसे, खोकला, ताप आहे अशा व्यक्तींनी हा चहा घेतल्यानंतर जाड कापड अंगावर घ्या आणि तसंच थोडावेळ झोपून राहा. अंगातील घाम निघेल. घाम निघल्यानंतर अंगातील ताप कमी होतो. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *