घरात घड्याळ चुकूनही या दिशेला लावू नका- जीवनभर दू:ख भोगावे लागेल…

मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. मित्रांनो, आपल्या जीवनात वेळेचे खूपच महत्व आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. कारण निघून गेलेला एक क्षणही आपल्या जीवनात कधीही परत येत नाही. याच कारणामुळे आपण वेळेची किंमत करायला शिकवले जाते. वेळेची किंमत करण्यासाठी वेळेची माहिती असणे आवश्यक असते व वेळ आपल्याला कळते आपल्या घड्याळामुळे.

ज्या लोकांना आपले प्रत्येक काम वेळेत करायची सवय असते, त्यांना परत परत घड्याळ बघण्याची सवय असते. तसेच रोजची काही कामे अशी असतात, जी आपल्याला घड्याळाच्या काट्यानुसार करायची असतात. खास करून घरातील महिलांना घरातील सगळ्याचे जेवणखाण, औषधे, इत्यादीकडे लक्ष द्यायचे असते. दिवसभरात अशी किती कामे असतात ज्यासाठी आपण दिवसभरात कितीतरी वेळा घड्याळ बघतो.

आपल्या भिंतींवर टांगलेली किंवा लावलेली हे घड्याळे तसे म्हणायला एक मशीन आहे, पण हे असे मशीन आहे ज्यामध्ये आपले भाग्य लपलेले असते. हो, मित्रांनो, आपण परत परत वेळ बघत असतो, कारण आपण वेळेच्या बरोबर चालू शकू., नियमित होऊ शकू, आपण आपल्या जीवनात प्रगति करू शकतो. अशा प्रकारे आपण वेळेप्रमाणे बदलत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, की ज्याप्रमाणे आपल्या शास्त्रांमध्ये म्हणजे मुख्यत: वास्तुशास्त्रामध्ये आपल्या उपयोगाच्या प्रत्येक वस्तूला ठेवायला एक निश्चित स्थान सांगितले गेले आहे.

ज्यामुळे आपल्याला त्या वस्तूचे शुभ फळ मिळू शकेल. त्याचप्रमाणे वेळ दाखवणारे कोणतेही उपकरण ठेवायची एक दिशा किंवा जागा स्थान निश्चित असते. म्हणून, आम्ही सांगतो आहोत, की आपल्या घरातील भिंतींवर टांगलेल्या या घड्याळांमध्ये आपले भाग्य लपलेले असते. म्हणून घड्याळाला एक सामान्य मशीन न समजता त्याला पण वास्तूच्या दृष्टिकोनातून आपले भाग्य बदलणारे कालचक्र समजू शकतो.

वास्तुशास्त्रामध्ये दिशांचे खूप महत्व आहे. प्रत्येक दिशा ही महत्वपूर्ण असते व प्रत्येक दिशेची काही ना काही गुणधर्म व दोष असतात. म्हणून, तुम्ही प्रत्येक वस्तु नाही, पण रोजच्या काही महत्वपूर्ण वस्तु वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवल्यात तर त्यातून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल. तुमच्या जीवनात असलेली आर्थिक समस्या समाप्त करण्यात तुमची मदत करेल व तुमचे जीवन सुखसमृद्धि व धनसंपत्तिने भरून जाईल.

वास्तूच्यानुसार, भिंतीवर लावलेले घड्याळ जर चुकीच्या दिशेला असेल, तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून तुम्ही पण तुमच्या घरात भिंतीवर घड्याळ लावताना वास्तुशास्त्राच्या या नियमांचे पालन अवश्य करा. चला तर मग जाणून घेऊया, घड्याळ व कॅलेंडरच्या संबंधित वास्तुनियम.

सगळ्यात पहिले आपण घड्याळाच्या बाबतीत जी चूक करतो ती म्हणजे वेळ. आपण वेळ आपल्या सोयीनुसार पुढे किंवा मागे करून ठेवतो. घड्याळ नेहमी योग्य वेळेतच लावून ठेवावी. घड्याळाची वेळ मागे लावून ठेवू नये त्यामुळे संकटे येतात. दुसरी गोष्ट तुटलेले घड्याळ किंवा काच व काटा निघलेले घड्याळ तर ते घरात लावू नका. त्यामुळे घरातील परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो. असे घड्याळ मनुष्याचे भाग्य झोपवून ठेवते.

तिसरी गोष्ट घड्याळ कधीही मुख्य दरवाजाच्या समोर लावू नये. घराची पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा आहे. या दोन्ही दिशा सकारात्मक ऊर्जा देणार्‍या मानल्या जातात. पूर्व दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम मानले गेले आहे. ते मनुष्याच्या जीवनात उन्नती करते. चौथी गोष्ट म्हणजे आपण वेळ बघण्यासाठी परत परत घड्याळात बघतो त्यामुळे दक्षिण दिशेकडे घड्याळ कधीही लावू नये. ती यमाची दिशा आहे व ती नकारात्मक ऊर्जेची दिशा आहे. त्यामुळे आपली प्रगति होत नाही.

पाचवी गोष्ट म्हणजे, आपण जुने कॅलेंडर आपल्या नवीन कॅलेंडरच्या खाली ठेवतो. पण असे वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे. तुमच्या जीवनात क्लेश घेऊन येते असे कॅलेंडर. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *