आज आपण ‘बाई होताना’ ही कथा पाहणार आहोत. खरच खूप विचार करायला लावणारी आहे. खूप काही सांगून जाणारी आहे. नक्की तुम्हाला आवडेल… रात्रीचे नऊ वाजले असतील खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोक्यामुळे शरीरावर रोमान्स दाटला होता. त्यात बाहेर पडणारा हलकासा पाऊस. त्या पावसाचे काही थेंब गारवा म्हणून हवेसोबत खिडकीतून अंगावर पडत होते. सहजस का नसेना पण मला ते खिडकी बंद करू नकोसे झाले होते. म्हणून मी ती खिडकी तशीच उघडी ठेऊन बेडवर पडून होते.
जस काही खूप खूप वर्षानंतर मानवरुपी धर्तीवर पावसाचे थेंब पडले असावे आणि ध्येयरुपी धरती तृप्त झाली असावी. बाहेर वादळ सुद्धा सुटले होतं बरं का. पण वादळाच काही घेऊन बसलाय ती नेहमीच सुटतात. कधी भयानक तर कधी महाभयानक बनून. एरवीचे भयान नाही त्याला वादळ तरी कसं म्हणायचं ना. काही वादळं खूप निरागस असतात. पत्ता लागू देत नाहीत. ती कधी आली, कधी त्यांनी आपल्या आयुष्यात ढवळाढवळ केली आणि कधी ती क्षमून गेली.
इतकंच नव्हे तर काही इतकी भयंकर असतात की त्या वादळात काही शिल्लक राहिलं असेल हे पाहायला कुणीच उरत नाही. जीवनात एवढी सारी प्रलयकरी वादळं आधीच असल्यावर या वादळाची तशी काही गरज नव्हती. पण ते आल्यावर त्याला क्षमवणार तर कोण. असच काहीसं वादळ खिडकीच्या बाहेर सुटत होतं. खिडकीचे पडदे त्या अंधाऱ्या खोलीत हलताना भयंकर वाटत होते. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोक्याने छताला लटकून असलेलं व्हील सुद्धा झुलत होतं. एवढ्या मोठ्या घरात त्यावेळी मी एकटीच होते. घरात फक्त सोबतीला हँगिंग व्हील तेवढंच काय. तसंही घरात आम्ही दोघंच असायचं.
घर कसलं भूत बंगला वाटायचा तो. एवढं मोठं घर सभोवताली लावलेली मोठी झाडं जस काही मध्यरात्रीतून उठून बघितलं तर सैतान उठून उभी असलेली वाटायची. हवेच्या झुळुकीने पानाची सळसळही झाली तरी कुणी आपल्या मागावर तर नाही ना अशी मनात धडकी भरायची. घरचा लाईट तेवढा चालू ठेवला तर बरं नाही तर सगळी स्मशान शांतता आणि घरात मी एकटीच. तसा दवाखाना नऊ दहा वाजता बंद होऊन जायचा पण नेहमीच पार्टी वगैरे करून अर्ध्या रात्रीच यायचा. तोपर्यंत मी जेवण करून झोपी गेलेली असायची. तसं झोपी गेलेली म्हणण्यापेक्षा अर्धचित्ती असायची.
कारण सांगायला तशी गरज वाटत नाही आणि एकटीच झोप यायला विधवा अथवा सोडलेली नव्हतीच. अर्ध्या रात्रीपर्यंत तो येईल, नंतर येईल अशी माझी अर्ध्यापेक्षा जास्त रात्र आहे ना ती निघून जायची. मला हवा असलेला सहवास, मला हवा असलेला स्पर्श, मला क्षमवायची असलेली वा स ना सर्वच तऱ्हेने मी बेदखल होते. माणूस असता तर त्याला सांगितले ही असते की ही बाई मला सुख नाही देऊ शकत, ही बाई माझ्या गरजा नाही पुर्ण करू शकत. पण मी कुठं जायचं कोणाला सांगायचं? की माझ्यासोबत असं होतं किंवा माझ्यासोबत तसं काहीच होत नाही. रात्रीचे बारा वाजत असताना माझी कशाने तर झोपमोड झाली. अजून मी अर्धचित्तीत झोपले होते. त्याने यावं मला स्पर्श करावा, माझ्या गरजा पुर्ण कराव्या असं मलाही वाटायचं.
पण काहीच फायदा नव्हता आणि मी त्याला सांगूही कसं मला हे हवंय, मला ते हवंय. दरवाज्याची एक चावी त्याच्याजवळ असायची नेहमी. मध्यरात्री काय तो आला. कदाचित कुणी त्याला बाईक वरून सोडून गेलं होतं. दरवाज्याची कटकट आणि किर्रर्रर्र असा आवाज काही मला ऐकू आला नव्हता. पण फक्त काही काचेचा आवाज आला होता. जस काही काचेची शिशी जमिनीवर घंघळत उताराच्या दिशेने जात असावी अशाप्रकारची. कदाचित ती दारूची शिशी असावी आणि दरवाजा उघडताच ती त्याने ती फेकून दिली असावी किंवा त्याच्या हातून सुटून गेली असावी. डोळे उघडून ते पाहण्याची माझी काही हिम्मत झाली नाही.
मला त्या परिस्थितीत काही गोष्टीही करायच्या नव्हत्या. कारण मला माहिती होतं त्यांन अर्ध्या रात्री माझ्यासोबत भांडण केलं असतं. मला याची पूर्णता खात्री होतीच. परंतु कानाने मी त्याच्या प्रत्येक हालचालींची अंदाज घेत होते. तो बूट न काढता तसाच सोप्यावर झोपी गेला होता. कदाचित त्याला लवकरच झोप आली असावी. नेहमीचंच होतं त्याचे. म्हणून मला काही वेगळं वाटलं नाही. सवयच झाली होती मला तशी. तशीच झोपल्या झोपल्याच कूस बदलून बघितलं तर तो झोपी गेला होता. दीड वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये काही संबंध नव्हता. एकतर त्याला माझ्यात इंट्रेस्ट उरला नव्हता किंवा त्याला दुसरं कुणीतरी भेटली असावी.
कदाचित त्याच्या सर्व गरजा बाहेरच पूर्ण होत असाव्यात. पण माझं काय? त्यानं कधीच विचार केला नसावा. एवढं असूनही त्याच्यावर मला निस्वार्थ प्रेम येत होतं. त्याच्याशी माझे असलेले संबंध पवित्र होते. हे मला राहून राहून सुचत होतं. पण कुठेतरी मला खंत होतीच. मी सकाळी चहा घेऊन बेडरूममध्ये गेले अजून तो झोपलाच होता. त्याच्या गालावर डोक्याचे केस आले होते. त्याचे ओठ सुखून कोरड्या सुपारीसारखे झाले होते. त्याचे डोळ्याचे रिंगण काळवटले होते. पण तरीही तो खूप सुंदर वाटत होता मला. वाटत होतं की त्यानं त्याच्या खुशीत घ्यावं मला आणि मनसोक्त त्याच्यावर प्रेम उधळाव. पण काहीच फायदा नव्हता.
मी चहा टेबलवर ठेवला आणि परत किचनमध्ये आले. माझ्या डोळ्यात अलगद तळ साचलं होतं. मला ते सर्व हवं होतं जे इतर स्त्रियांना मिळत असतं आणि त्याची दावेदार ती असते. संसार करणं म्हणजे फक्त चार भांडी रचून एखादं खोपट बांधणे आणि चिमना चिमणीचे रोज सकाळ संध्याकाळ काम करून पोट भरणं एवढंच नसतं ना. माणसाच्या आयुष्यात निसर्गाच्या सर्वच गोष्टी महत्वाच्या असतात. जिथं संसार आला तिथं उत्पत्ती आली आणि उत्पत्तीसाठी वासना, शरीरसुख गरजेचं असतं.
जेव्हा पुरुष या गोष्टी मनमोकळेपनाने समजतात, बोलू शकतात तर महिला का नाही. स्वतःला जाळत, स्वतःच्या भावना दाबत तडपून मरणे का म्हणून आमच्या नशिबात येतं. पुरुषांना आपल्या वासना भागवण्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत पण आमच्यासाठी का नाही. पुरुषांना रं डी खा ना आणि मग आम्हाला??? असा प्रश्न चिन्ह कथेतील नायिकेने ठेवला आहे. धन्यवाद.