पती पत्नीच्या भांडणात चुकूनही कधी पत्नीला असं बोलू नका नाहीतर….

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आज आपण एक हृदयस्पर्शी कथा पाहणार आहोत. त्या कथेचे नाव आहे मी आश्रित नाही. काल रात्री आपल्या घरगुती विषयावरून मतभेद काय झाले रागाच्या भरात सहज बोलून गेलास रे तू माझ्या घरातून चालती हो आणि ही सगळी नाटकं तु तुझ्या घरी करायची. एवढं बोलून तो तोंडावर पांघरूण घेऊन झोपी गेला.

पण हे बोलताना तु माझ्या मनाचा विचार केल्यास का तू. माझ्या घरातून तुझ्या घरी हे कसले रे वाक्य म्हणजे हे घर माझं नव्हतंच का कधी कानात अगदी सुया टोचलेला भास आणि मेंदूला येत असलेल्या असंख्य झिणझिण्या मी डोक्याला हात लावून ती काळी रात्र एका कोपऱ्यात बसून रडून काढली. डोळ्यातले अश्रू अनावर होते. अंगातला कंप, ओठांची थरथर थांबतच नव्हती.

विचारांच्या थैमानात आपल्या लग्नानंतरची ती पहिली रात्र माझ्या डोळ्यासमोरून दरवळून गेली. तुझ्या स्पर्शाने शरीराला आलेली पहिली शिरशिरी, अनामिक भीतीने झालेली ती ओठांची थरथर काय गोड क्षण होते ना ते! गोड क्षण कधी कडू झाले समजलेच नाही. काय चुकलं होतं रे माझं? तू चुकला होतास असंही मी म्हणणार नाही. मान्य आहे मला तुला सर्व बाजू सांभाळाव्या लागतात.

आई, वडील, भाऊ, बहीन, बायको या सर्वांमध्ये समतोल राखताना तुझी कसरत होती. तू कित्येकदा मला म्हणतोस ही जरा मला समजून घे. केलं ना रे तुझ्यासाठी ऍडजस्ट. नाही केलं का. कित्येकदा मला हे सांगताना तुझी झालेली ही गळचेपी चेहऱ्यावर स्पष्ट दिसली आहे, पण माझी कुचंबना तुला कधी दिसली का रे? माझी कुचंबना. बोल ना रे त्याच काय. माझी होणारी कुचंबना तुला नाही सांगणार तर कुणाला सांगू. सांग ना.

खदखदणारी गोष्ट तुला सांगितली की माझं मन पिसासारखं हलकं होईल असं वाटत होतं. एक मोकळेपणाचा अनुभव घेईल अशी वेडी आशा होती रे माझी. मात्र माझ्या अपेक्षांची इमारत पत्यांच्या बंगल्यासारखी कोसळली बघ. कालचे तुझे बोचरे शब्द भरल्यासारखे काळजात घुसले किंबहूना रुतले. कसं काय बोलू शकतोस रे हे जहाल वाक्य. फक्त तुम्हा सर्वांसाठी खास करून तुझ्यासाठी घर सोडलं. माझं राहतं घर सोडलं रे.

जिथे मी लहानाची मोठी झाले खेळले, बागडले, माझ्या मैत्रिणी, माझे आई वडील, माझा भाऊ, माझी बहिण सर्व मागे सोडून आले कायमची. फक्त तुझ्यासाठी. राहून बघ कायमचं बाहेर. हो कायमचं. मी आले तुझ्याकडे तसं. अगदी तसं ते ही एकटं. सर्व सोयींयुक्त एका पेटीच्या पिंजऱ्यात पावलोपावली अपमान करून घेत कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, राहू शकशील! जमेल. सोपं नसतं रे ते. माझ्यासाठी तर ते नक्कीच नव्हते.

तरी मी आले सर्व आले सोडून फक्त आणि फक्त तुझ्यासाठी पण हे सर्व सोडताना आणि एक महत्वाची गोष्टही सोडून आले ते तुझ्या नजरेखाली कधी आलेच नाही रे. माहिती आहे कोणती? माझा स्वाभिमान. ठेवलंय ते काढून कायमचा पण तुझ्या घराबाहेर. कधीतरी जाऊन शोध घे त्याचा. बघ सापडतेय का तुला? आणि हो जरा बघ कुठून मळून फाटलाय ते की ते घाण झालंय अपमान चेष्टा थट्टा यांसारख्या असंख्य शितड्यांनी. बघशील ना रे एकदा माझ्यासाठी. आणि हो जमल तर आणि एक कर मला या घरात बायको म्हणून स्थान दे आश्रित म्हणून नाही कारण मी आश्रित नाही. खरच मी आश्रित नाही.

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. लेखन : श्री मयूर किरण सिँहासने…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *