जीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो वाईट वेळ ही अशी स्थिती आहे जी कोणाच्याही जीवनात कधीही येऊ शकते. तुमच्या जीवनात सुद्धा ही कधीना कधी वाईट वेळ आलीच असेल. वाईट वेळ आल्यावर आपण काय करायला हवे. वाईट वेळेसोबत आपण संघर्ष कसा करावा.

असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात येताच असतात. परंतु या प्रशांची उत्तरे आपल्याकडे नसतात. अश्याच प्रशांची उत्तरे स्वामी समर्थानी दिली आहेत. तर तुम्ही ही वाईट वेळे मुळे चिंतीत असाल, वाईट वेळेने त्रस्त आहात, तुमची ही वाईट वेळ तुम्हाला सोडत नाही. किंव्हा तुम्ही वाईट वेळेतून कसे बाहेर यावे याचा मार्ग तुम्ही शोधत आहात तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

मित्रांनो एक साधू असतो. तो साधू संपूर्ण भारतात भ्रमण करत असतो. आणि धर्माचा प्रचार, प्रसार करत असतो. एकदा तो साधू त्यांच्या शिष्यांसोबत जंगलातून जात असतात. खूप वेळापर्यंत भ्रमण केल्या नंतर त्या साधू चा गळा सुखायला लागतो. त्या साधूला पाणी हवे असते. मग साधू आपल्या एका शिष्याला जवळच्या गावातून पाणी आणायला सांगतात. गुरू ची आज्ञा मिळाली म्हणून तो शिष्य जवळच्या गावात पाणी आणायला जातो. गावात गेल्यानंतर त्या शिष्याला समजले की गावात फक्त एक नदी आहे. आणि तीच नदी गावाची जलश्रोत आहे.

जेव्हा तो शिष्य त्या नदीजवळ पोहचला तेव्हा त्याने बघितले की काही लोक त्या नदीमध्ये अंघोळ करत आहेत. काही जण आपले कपडे धुत आहेत. तर काही जण पशु प्राण्यांना त्या नदीत धुत आहेत. जा मुळे नदीचे पाणी खूप दुषित झाले होते. पाण्याचे असे हाल बघून शिष्याने विचार केला गुरू साठी हे पाणी घेऊन जाणे बरोबर नाही. आणि तो पाणी न घेता गुरू च्या दिशेने निघून गेला.

साधूने बघितले की शिष्याने पाणी आणले नाही. तेव्हा साधू ने आपल्या दुसऱ्या शिष्याला पाणी आणायला सांगितले. काही वेळ गेली… आणि तो दुसरा शिष्य मठामधून पाणी घेऊन आला. हे पाहून तो पहिला शिष्य आश्चर्यचकीत झाला. त्याने विचारले की गावातील नदीचे पाणी तर खूपच दूषित होते, अस्वच्छ होते, तर तुम्ही हे पाणी कुठून आणले.

प्रश्नांचे उत्तर देत तो दुसरा शिष्य म्हणाला जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हा खरच त्या नदीचे पाणी दूषित, अस्वच्छ, होते. पण सर्व तिथले लोक आपले काम करून निघून गेले. व काही वेळ मी तसच तिथे बसून राहिलो. काही वेळाने नदीतील सर्व माती तळाला गेली. आणि पाणी पुन्हा स्वच्छ झाले. आणि तेच स्वच्छ पाणी मी माठात घेऊन आलो.

आपल्या शिष्याचे उत्तर ऐकून साधू खूप प्रसन्न झाला आणि बाकी शिष्याने सांगितले की… जेव्हा आपल्या जीवनात संकटे, समस्या, वाईट वेळ येते तेव्हा आपले जीवन सुद्धा त्या नदीच्या पाण्यासारखे दूषित, अस्वच्छ, खराब जीवनापासून आणि आलेल्या वाईट वेळे पासून हार मानून बसू नये. परंतु धेर्य ठेऊन शांत मनाने त्या स्थितीचे आकलन करायला हवे. आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्या गोष्टी चे आकलन करावे. कारण “धेर्य, शांत मन, निर्णय घेण्याची क्षमता, आणि आत्मविश्वास” असेल तर वाईटामधील वाईट वेळ असुद्या आपण तिला हरवू शकतो. आणि पुढे जाऊ शकतो. या चार गोष्टी तुम्हाला कोणतीही वाईट वेळ दूर करण्यास मदत करतील.

मित्रांनो जसे त्या शिष्याने दूषित पाण्यातून स्वच्छ पाणी घेतले तसेच त्याच पद्धतीने आपण सुद्धा जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी, वाईट वेळ, सर्व अस्वच्छ झालेले आपले जीवन, सगळ्या समस्या या सगळ्यांसोबत संघर्ष करून आपण चांगले व स्वच्छ जीवन मिळवू शकतो. फक्त गरजेचे आहे या चार गोष्टींना आत्मसात करण्याची. तर मित्रांनो हा प्रेरणादायी प्रसन्न ज्यांना समजला ज्यांनी याला आत्मसात केला ते नक्कीच आपले वाईट वेळ दूर करू शकतात.

मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *