किचनच्या भिंतीवर लिहा अन्नपूर्णा देवीचा हा मंत्र घरात आरोग्य सुख शांती येईल…

मित्रांनो आपल्या घरातील महत्वाची जागा म्हणजे आपलं स्वयंपाक घर याला किचन असेही म्हटले जाते. आज आपण पाहणार आहोत की या स्वयंपाक घरामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील जे लोक आहेत त्यांचे स्वास्थ, आरोग्य चांगले राहिल. तसेच त्याच्यामध्ये प्रेमाचे संबंध टिकून राहतील.

मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट की आपल्या स्वयंपाक घरातील शेगडी असेल किंवा चूल असेल आणि जो पाण्याचा साठा आहे… जसं की हंडा असेल, माठ असेल, फिल्टर असेल. तर मित्रांनो यामध्ये जितकं अंतर असेल तितकं अंतर ठेवायला हवं. याच कारण आहे की अग्नी आणि जल एकत्र येता काम नये. जर आपल्या गॅसच्या शेगडी जवळ एखादा पाण्याने भरलेला हंडा असेल तर मित्रांनो त्यामुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होतात. शक्यतो पतीपत्नी मध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात म्हणून आपण सुद्धा लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा हा अग्नी जवळ म्हणजे गॅस ची शेगडी असेल, चूल असेल याच्या जवळ ठेवू नका. शक्य असेल तितके अंतर ठेवा.

मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये जी भांडी आहेत त्यांचा शक्यतो कमीत कमी आवाज होईल असा प्रयत्न करा. बऱ्याचश्या घरामध्ये ऐकतो की भांड्यांची अगदी आदळ आपट चालू असते. मित्रांनो जितका जास्त या भांड्यांचा आवाज निर्माण होईल. मित्रांनो तितका तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल. म्हणजे या भांड्यांच्या आवाजातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा की ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही.

मित्रांनो तिसरी गोष्ट आपल्या स्वयंपाक घरामध्ये जी गृहिणी आहे तिने स्वयंपाक करताना आपलं जे तोंड आहे ते पूर्व दिशेला कसं राहील याची काळजी घ्यावी. थोडक्यात काय तर आपली जी शेगडी आहे ती अशा प्रकारे मांडून घ्यावी की आपले तोंड पूर्वेकडे येईल. मित्रांनो जर एखाद्या गृहिणीने पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकामध्ये एक प्रकारची गोडी निर्माण होते. सूर्याचं तेज त्या स्वयंपाकमध्ये निर्माण होते आणि म्हणून असा स्वयंपाक खाणाऱ्या व्यक्ती सुद्धा तेजवान बनतात तेजस्वी बनतात.

मित्रांनो शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पूर्व दिशेला तोंड करून जो जेवतो त्याला बुद्धी आणि दीर्घायुचा लाभ होतो. म्हणजे अशी व्यक्ती ती बुद्धिवान बनते. तसं तीच आयुष्य सुद्धा वाढते. मित्रांनो अग्निपुरणामध्ये सुद्धा याच उल्लेख आढळतो. ज्यावेळी तुम्ही जेवायला बसाल त्यावेळी जेवण करताना शक्यतो काहीही बोलू नका, मौन बाळगा. कारण जेवण करताना जो व्यक्ती मौन बाळगतो त्याच्या सर्व इंद्रियांना प्रसन्नता आणि मनःशांती लाभते आणि जेवणाचा मुख्य उद्देश हाच असतो.

केवळ पोट भरण्यासाठी नाही तर आपले इंद्रिये तृप्त व्हायला पाहजेत, प्रसन्न व्हायला पाहिजेत आणि मनःशांती लाभायला पाहिजे. असं झालं तरच आपण आपली दैनंदिन कार्ये सुखसमाधानाने पार पाडू शकतो. मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या स्वयंपाक घरामध्ये सिरॅमिक टाइल्स जर लावणार असाल तर या सिरॅमिक टाइल्स लावत असताना त्या आपल्या स्वयंपाक घराच्या पूर्वेला तसेच पश्चिमेला लावाव्यात. या दोन बाजूंना नक्की लावाव्यात आणि त्या लावताना सौम्य रंगाच्या असतील याची काळजी घ्यावी. मित्रांनो या टाइल्स वरती “ओम अन्नपूर्णा देवतः नमः” अशा प्रकारे हा मंत्र आपण लिहू शकता.

मित्रांनो या मंत्राचा खूप मोठा महिमा आहे. ओम अन्नपूर्णा देवतः नमः अशा प्रकारचा मंत्र हळदी कुंकवाने जर आपण लिहला तर त्या घरावर अन्नपूर्णा देवीचा वर्धहस्त राहतो. जी गृहिणी असते तिच्यावर अन्नपूर्णा देवीची कृपा राहते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अचानक कितीही पाहुणे आले त्या घरातले सदस्य वाढले तरीसुद्धा अन्नपूर्णा देवीच्या कृपेने तुमच्या घरातील अन्न कधीसुद्धा संपत नाही. हे अन्न कमी पडत नाही.

मित्रांनो अशा प्रकारची काळजी सुद्धा तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला दिसेल की अन्नपूर्णा देवीचा वर्धहस्त तुमच्यावर आहे. तर हा मंत्र तुम्ही नक्की तुमच्या स्वयंपाक घरात लिहून पहा. नक्की तुम्हाला चांगले फरक जाणवतील.. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा…

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *