वास्तुशास्त्रा नुसार घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ?

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार ही झाडे आपल्या घरांसाठी शुभ असतात. ही झाडे आपलं नशीब, आपलं भाग्य उजळू शकतात. तस तर पर्यावरणाचा विचार केला तर प्रत्येक झाड हे पर्यावरणाचं संतुलन राखण्यास महत्वाची भुमिका पार पाडत असत. मात्र मित्रांनो वास्तुशास्त्रात काही झाडांचा अगदी आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्यापैकीच एक झाड म्हणजे “नारळाचं झाड”… नारळ ज्याला हिंदी मध्ये नारियल आणि इंग्लिश मध्ये Coconut tree अस म्हणतात. हे झाड वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ आहे आणि ते आपल्या घराशेजारी असावं का? या संबंधी आपण आज जाणून घेणार आहोत.

पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांची रास वृषभ आहे किंव्हा तुळ आहे अश्या राशींच्या लोकांनी कोणताही विचार न करता आपल्या घरासमोर नारळाचं झाड अगदी अवश्य लावा. आता अवश्य लावा अस म्हणतोय तर ते कोणत्याही बाजूस लावून चालणार नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीच प्रत्येक वस्तूच एक स्थान निश्चित केलेलं आहे. जर ती वस्तू ती गोष्ट त्या विशिष्ट दिशेला असेल तर त्या वस्तू पासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी लाभदायक ठरते आपल्यासाठी फायदेशीर ठरते. आणि या सकारात्मक ऊर्जेच्या बळावरच आपलं नशीब आपलं भाग्य चमकत असत.

मित्रांनो घराची बरकत होण्यासाठी नारळाचं झाड हे आपल्या घराशेजारी कुठे असावं या संबंधी आपण अचूक माहिती घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट आम्ही आपल्याला सांगितली जर तुमची रास जर वृषभ असेल किंव्हा तुळ असेल तर या दोन राशींच्या लोकांसाठी नारळाचं झाड अत्यंत शुभदायी आहे. आता तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे मुख्य व्यक्ती आहे ज्या व्यक्ती कडून धन, पैसा तुमच्या घरात येतो. त्या व्यक्तीची रास वृषभ किंव्हा तुळ असायला हवी. इतर व्यक्ती या मध्ये चालणार नाहीत.

मित्रांनो दुसरी गोष्ट नारळाचं झाड जर तुमच्या घराशेजारी आहे आणि जर तुमच्या घराची प्रगती होत नाही किंव्हा तुमच्या घरावर वारंवार संकटे येत असतील. दोन प्रकारची संकटे येतात पहिले संकट मोठ्या प्रमाणात धन हानी होते. अगदी कोणत्याही कारणाने पैसा निघून जातो. अगदी आजारपणामध्ये वाया जाईल किंव्हा कोणत्याही गोष्टीत.. दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणात जर घरात वाद विवाद होत असतील, घरामध्ये सतत भांडणे होत असतील, सतत आजारपण असेल, थोडक्यात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जर वाढली असेल तर लक्षात घ्या तुमच्या घराशेजारी असणार नारळाचं झाड हे चुकीच्या दिशेस लावण्यात आलेलं आहे.

मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्रामध्ये आम्ही तुम्हाला चार ते पाच झाडांची नावे सांगतो जर अश्या प्रकारचे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील आजूबाजूला असतील तर ही पाच झाडे आवर्जून लावा. पाहिलं झाड तुळस, दुसरं हळद, तिसरी नारळ, चौथ दऊना,आणि पाचवं लाजाळू… ही जी पाच झाडे आहेत यांना वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटअसे म्हंटलेले आहे. म्हणजे भारतीय परंपरेनुसार ही झाडे ज्या घरासमोर असतील त्या घराची प्रगती होतेच होते. मात्र ही झाडे लावताना दिशेचा विचार फार निश्चित आहे. इतर झाडांविषयी आपण नंतर कधीतर पाहू पण आता आपण नारळाविषयी बोलणार आहोत.

मित्रांनो तुम्ही तुमच्या घराशेजारी झाडे लावता तेव्हा लक्षात घ्या शुभ आणि पवित्र झाडे लावताना जी खड्डा तुम्ही तयार कराल त्या खड्यामध्ये गाईचे कच्चे दूध, कच्चे दूध म्हणजे न तापवलेलं अस गो मातेचं दूध तुम्ही त्या खड्या मध्ये टाका. आणि सोबतच थोडासा मध टाका. आणि त्या नंतर हे झाड आपण लावायचं आहे. झाडे व्यवस्थित उगवतात सुद्धा आणि त्या पासून आपल्याला चांगले परीणाम सुद्धा मिळतात. मित्रांनो नारळाचं झाड ज्यांच्या घरासमोर असेल त्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात मानसम्मान मिळतो. त्यांना समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा असते. तुम्ही पाहू शकता ज्यांच्या घरासमोर नारळाचं झाड आहे त्यांना समाजात मानसम्मान आपोआप मिळू लागतो.

नारळाचं झाड कुठे असावं..? वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड हे आपल्या घराच्या पाठीमागे जी पारस बाग आहे त्या ठिकाणी अति उत्तम मानलं जातं. किंव्हा घरा जवळील जी गार्डनची जागा आहे त्या ठिकणी सुद्धा आपण नारळाच झाड लावू शकतो. दिशांचा विचार करता वास्तुशास्त्रा अस मानत की नारळाचं झाड लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात चांगली आहे. दुसरी दिशा आहे पश्चिम दिशा.. ज्या दिशेला सूर्य मावळतो सूर्यास्त होतो ती पश्चिम दिशा सुद्धा नारळाचं झाड लावण्यास सर्वात अतीउत्तम आहे. दोन दिशा आम्ही सांगितल्या एक दक्षिण दुसरी पश्चिम दिशा..

मित्रांनो या दोन दिशेना जर नारळाचं झाड असेल तर आपल्या घराला स्थायित्व लागत. स्थायित्व म्हणजे काय तर तुमच्या घरात जर पैसा येत असेल तर तो पैसा टिकून राहतो. त्या पैश्यामध्ये वाढ होऊ लागते. घराची बरकत होऊ लागते. घराचा स्थायि विकास होतो. बऱ्याच वेळी अस होत की आपला उद्योग चांगला चालू लागतो पण मध्ये काही अशी संकटे येतात अश्या काही अडचणी येतात की मोठ्या प्रमाणात नुकसान होत. आणि मग पुन्हा एकदा तेच दृष्टी चक्र चालू होतं पुन्हा गरिबी, पुन्हा कंगाली, पुन्हा दारिद्रय, या सर्व गोष्टी होऊ लागतात. म्हणजेच स्थायि विकास होत नाही. जर तुम्हाला स्थायि विकास सिद्ध करायचा असेल तर नारळाचं झाड हे नक्की या दोन दिशेला लावा.

आता नारळाचं झाड जर तुमच्या पूर्व दिशेला असेल ज्या दिशेला सूर्य उगवतो या पूर्व दिशेला जर नारळाचं झाड असेल किंव्हा जर उत्तर दिशेला असेल किंव्हा या दोन दिश्यांची जी मधली दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा.. मित्रांनो जर या तीन दिशेना जर नारळाचं झाड लावलं असेल तर लक्षात घ्या नारळाचं असेल किंव्हा कोणतही झाड असेल तर ही झाडे जर तुमच्या घराच्या उंचीपेक्षा मोठी असतील तर…. कारण अशी झाडे जर या तीन दिशेला असतील तर बरकत होत नाही. घराची प्रगती होत नाही. घरामध्ये सातत्याने भांडणे, वादविवाद, आणि आजारपण निर्माण होत.

मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगितलं की अशुभ दिशेला जर झाडे असतील तर टलवायला हवं. याच अर्थ कधीही झाडे तोडू नये. झाडे तोडण्यासाठी काही विशिष्ट दिवस आहेत. हिंदुशस्त्राप्रमाणे भाद्रपद महिना आणि माघ महिना या दोन महिन्यांमध्ये चुकून सुद्धा झाडे तोडू नयेत. मित्रांनो उंच झाडे लावण्यासाठी पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानली जातात. आणि या दोन दिशा नारळाच्या झाडांसाठी अतीउत्तम आहे. वृषभ राशीच्या आणि तुळ राशीच्या लोकांनी अगदी आवर्जून नारळाचं झाड लावायला हवं…

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *