S अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये…

नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ग्रह नक्षत्रांची स्थिती कशी आहे, यानुसार जोतिषशास्त्र हे ठरवत की आपली रास कोणती असेल. आणि त्या नुसार आपलं नाव ही ठेवलं जातं. मित्रांनो जेव्हा हे नाव ठेवलं जातं तेव्हाच आपलं भविष्य ही ठरलेले असत. आपण भविष्यात काय बनणार, आपला स्वभाव कसा असेल, आपलं व्यक्तिमत्व कसं असणार आहे, या सर्व गोष्टी या नावावरूनच ठरतात.

मित्रांनो आज आपण ‘S’ नावाच्या व्यक्ती म्हणजे ज्यांच नाव ‘S’ अक्षरापासून सुरू होत त्यांचा स्वभाव कसा असेल, या व्यक्ती दिसायला कश्या असतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असत, याबद्दल माहिती घेणार आहोत. S नावाच्या ज्या व्यक्ती असतात या बहुमुखी प्रतिमेच्या असतात. म्हणजेच All rounder असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये अगदी सहज प्रगती करतात. त्यांना अशी कोणतीही गोष्ट नसते की जी जमत नाही.

मात्र त्यांचा स्वभाव थोडा क्रोधी असतो. खूप लवकर राग येतो. अगदी छोट्याशा गोष्टींवरती रागावणारे असे ‘S’ नावाचे व्यक्ती असतात. या व्यक्तींना जीवनामध्ये पैसा, मानसम्मान, प्रतिष्ठा भरपूर मिळते. ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असले तरी तिथे सुद्धा पैसा कमावतात. कदाचीत त्यांना पैसा कमावण्यात वेळ लागू शकतो, मात्र पैसा, धन, मान सम्मान नक्की येतो.

पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांच्याकडे व्यावहारिक ज्ञान देखील आहे. याचा अर्थ ते कोणत्याही व्यक्तीशी खूप चांगलं नातं व मैत्री राखू शकतात व त्यांना कोणाशी कसे वागायचे हे बरोबर माहित असते. हे लोक खूप परिश्रम करतात. ते कोणत्याही गोष्टीपासून घाबरत नाहीत व जिद्दीने कोणतेही कार्य तडीस नेतात. ह्या व्यक्ती बोलण्याच्या बाबतीत इतक्या धनाढ्य असतात की समोरची व्यक्ती आपसूकच त्यांच्याकडे आकर्षित होते. कोणत्याही व्यक्तीला हे आपल्या वाक्चातुर्याने आपलंसं करून घेतात आणि त्यांना आपल्या नियंत्रणातही ठेवतात.

तसेच समाजात यांना मान सम्मान दिला जातो. या व्यक्तींचा स्वभाव असा असतो की जे त्यांच्या स्वतःच्या वस्तू असतात या सहजपणे कोणालाही देत नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांच्या प्रेमाबद्दल पण लागू पडते. या व्यक्ती ज्या व्यक्तींवरती प्रेम करतात त्याने दुसऱ्यांसोबत बोललेले सुद्धा यांना चालत नाही. सत्य आणि आपल्या तत्त्वांसाठी, ते कोणाशीही सामना करण्यास तयार होतात. ते कोणालाही घाबरत नाहीत किंवा कोणापासून लाजतही नाहीत. यांना सत्याची कास धरण्यास आवडते. ते स्वत: ला कोणत्याही परिस्थितीत श्रेष्ठ सिद्ध करू इच्छितात. सामाजिक जीवनात हे  हसतमुख व दिलखुलास असतात.

थोडक्यात काय आपला जो प्रेमी आहे आपली जी कोणी प्रेमिका आहे ती फक्त आपलीच असावी, तिने तीच प्रेम कोणालाही वाटू नये अस ‘S’ नावाच्या व्यक्तींना वाटत असत. आणि कदाचित याचाच त्रास यांच्या प्रेमिकेला किंव्हा प्रियकरेला होत असणार .पती पत्नी मध्ये सुद्धा याच गोष्टी घडतात.

हे लोक खूप सर्जनशील असतात. कोणतेही काम स्वतःच्या पद्धतीने करण्यास त्यांना आवडते. ते कोणाच्याही बोलण्यात न येता नेहमी स्वतःच्या मनाचंच ऐकतात. त्यांना जमावाबरोबर चालणे आवडत नाही. S नावाच्या व्यक्ती  प्रेमाच्या बाबतीत लाजाळू असतात. हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात, ते मनापासून प्रेम करतात. हे लोक प्रेमात पुढाकार घेण्याआधी फार विचार करतात.

मात्र लक्ष्यात ठेवा ‘S’ नावाच्या व्यक्ती अत्यंत प्रेमळ असतात तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारे असतात. ‘S’ नावाच्या ज्या व्यक्ती असतात त्या स्वभावाने थोड्याशा कंजूस असतात. म्हणजे पैसा खर्च करायला थोडे मागे पुढे करतात. मात्र तुम्ही पाहिलं तर अतिशय प्रेमळ असतात कोणाबद्दल ही यांच्यामध्ये वाईट भावना नसते. मात्र यांचा जो तेज स्वभाव आहे त्यामुळे ते वेगाने गोष्टी करतात.

विवाहित जीवनात ते आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या जोडीदाराला वर्चस्वाखाली ठेवू पाहतात ज्यामुळे वैवाहिक जीवनात ताळमेळ नसतो. हे महिलांसाठी अधिक लागू आहे. विवाह झाल्यानंतर, एस नावाच्या  महिलांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, तर लग्नानंतर पुरुष जीवन अधिक सुखी बनते.

याव्यक्ती अत्यंत मेहनती असतात .खूप मेहनत करतात. आणि मेहनतीच्या बळावरती ते काहीही कमावू शकतात. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल ज्याचं नाव S नावावरून सुरू होत असेल तर कदाचीत तुम्हालाच पुढे होऊन त्या व्यक्तीला प्रपोज करावं लागेल. कारण या व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. तर मित्रांनो हा होता S नावावरून सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव…..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *