पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते तेव्हा…

मित्रानो तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. या कथेचे संपूर्ण श्रेय लेखिका अश्विनी दंडवते खांदवे, यांना जाते, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयस्पर्शी कथा, या कथेचे नाव आहे “वाटा”. आणि लेखन केले आहे अश्विनी दंडवते खांदवे म्याडम यांनी. लेखिकेचे लेखन खुप अप्रतिम आहे. ही कथा तुम्हा सर्वाना नक्की आवडेल. आवडल्यास लाइक करा. आणि तुमची मते कमेंट मध्ये नक्की कळवा. चला तर मग कथेला सुरवात…

चला तर कथेला सुरवात करूयात. आंतरजातीय विवाह करून घरच्यांचा विरोध पथकरून पळून जाऊन लग्न केलेली आरती दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी होती. हातात एक लिफाफा घेऊन. दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभे राहताना डोळ्यात पाणी आणि मनात भीती होती.

घरात आरतीचा भाऊ सुजय, मेघा सुजय ची बायको आणि आई जरा टेंशन मध्ये बसले होते. आरती च्या बाबांना हार्टचे ऑपरेशन करण्यास सांगितले होते. ऑपरेशनला किमान पाच सहा लाख रुपये खर्च येणार होता. सुजय ने ही शिक्षण पूर्ण केले नव्हते. नोकरीत सुद्धा धरसोड वृत्ती होती. त्यामुळे पगार कमीच….इतके दिवस बाबांच्या जीवावर घर चालत होते.

घरात तीच चर्चा चालू होती की पैसे कसे जुळवाजुळव करायची. सगळे हातबल झाले होते. तेवढ्यात दारात आरती उभी होती. हातातला लिफाफा पुढे करत दादा माझा वाटा. आरतीचे शब्द ऐकताच सुजयचा राग अनावर झाला. त्याने खाडकन आरतीच्या कानाखाली वाजवीली. अग.. आमची बदनामी करून पळून गेलीसच आणि इथे बाबा दवाखान्यात आहेत.

आम्ही कोणत्या परिस्थितीतुन जात आहे हे कळतंय का तुला? बाबांना कल्पना होतीच या लोकांनी तुला पैश्या साठीच फसवलंय. आरती तशीच रडत दारात उभी होती. आई पुढे येऊन म्हणाली तू घरात लहान, हुशार म्हणून तुझ्या शिक्षणासाठी किती कष्ट करून बाबांनी पैसे भरले. आणि तू आता अश्या त्यांच्या अवस्थेत वाटा मागतेस. चांगलेच पान फेडलेस तू आमचे. हात जोडून तळतळ पणे आई बोलत होती.

आरती मात्र निशब्द पणे रडतच होती. सगळ्यांच बोलुन झाल्यावर ती हिम्मत करून बोलायला लागली. आई, वहिनी, दादा मला माफ करा मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलं. पण मला माहिती आहे तुमचा विरोध राहुलला नव्हता. त्याच शिक्षण नोकरी पाहून पसंती दाखवली होती. विरोध होता तो त्याच्या जातीला. जात कळल्यावर तुम्ही नकार दिला. पण दादा तिथुन मागे येणे मला जमलं नसते रे..मान्य आहे तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे.

पण त्यावेळी तुमच्या मनात जे होत ना राहुल पैसे साठी माझ्याबरोबर लग्न करतोय ते मी तुम्हाला किती समजावलं तर तुम्ही नव्हता समजावून घेतले. या दहा वर्ष्यात राहुलने माझ्या कमाईचा एक ही रुपया मागितला नाही. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा कधी विचारले नाही. हातात ला लिफाफा पुढे करत आरती म्हणाली दादा याच रक्कम न टाकलेला चेक आहे. बाबांच्या ऑपरेशनला जेवढे पैसे लागतील तेवढे टाक. पण बाबांना बरं कर. आरतीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं.

बाबांचं ऑपरेशन सकाळी आहे अस मला समजलं. तुम्ही मला दिलेले संस्कार, शिक्षण, प्रेम याची परत फेड तर नाही करू शकत. पण..माझ्या माणसांच्या संकटाच्या वेळी खारीचा वाटा मागायला आलो आहे. दादा हे पैसे नाही म्हणू नको आणि हे पैसे मी घरातल्यांना विचारूनच देत आहे. त्यांनीच सांगितले आहे सुखा पेक्ष्या दुःखातला वाटा आयुष्यभर पुरेल.

उद्या माझ्यावर वेळ आली तर.? आरतीचे हे शब्द ऐकून आता सगळ्यांनाच रडू आलं. सुजय ने तिला जवळ घेतलं. एवढी मोठी झालीस का ग तू आरती..!आज मलाच चार चांगल्या गोष्टी शिकवल्यास तू.माफ कर मी तुझ्या घरच्यांना चूकच समजलो. मित्रानो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की आम्हाला कळवा…

One Comment on “पळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते तेव्हा…”

  1. वादळी वार्र्याने अथांग सागराच्या लाटा आकाशाला भिडन्याचे प्रयत्न करतात नेमके मण तसेच हेलकावे खाते. कीमान माझे तरी…….. उत्क्रुष्ट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *