जेव्हा लोक एकाच ठिकाणी बराच वेळ एकाच स्थितीत (पोजिशनमध्ये) बसतात, तेव्हा त्यांचे हात आणि पाय सुन्न होतात. त्यानंतर हातापायाला झिणझिण्या येऊ लागतात. त्या काळात हातपाय कोणतेच काम करू शकत नाहीत आणि त्यावर आपला ताबा राहात नाही. म्हणजेच, तुम्ही जर पाय हलवायचा प्रयत्न केला, तरी पाय हलत नाही. शरीराच्या कोणत्याही अवयवाचे सुन्न होणे, म्हणजेच त्या जागी होणारा रक्तप्रवाह कमी होणे.
जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागावर दाब पडतो, तेव्हा त्या जागी आवश्यक असा ऑक्सीजन आणि रक्तप्रवाह होऊ शकत नाही, त्यामुळे झिणझिण्या होत आहेत असा भास होतो. तसे तर ही अगदी सामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येकाने कधीतरी या स्थितीचा अनुभव नक्कीच घेतला आहे.
परंतु, जर तुम्हाला परत परत अशा स्थितीचा अनुभव येत असेल, तर मात्र तुम्हाला तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ही गोष्ट गांभीर्याने घेणे जरुरीचे आहे. तसे तर तुम्ही काही टिप्स वापरुन या समस्येपासून स्वत:ला वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत या टिप्स /सूचना ज्या गंभीरपणे आत्मसात करणे जरूरी आहे:
कारण जाणून घ्या: जर तुम्हाला असे वाटत असेल, की हात पाय सुन्न होण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, तर तुम्हाला प्रथम याचे कारण जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही वेळेला काही आजारांमुळे जसे की, थायरोईड, मधुमेह, हृदयरोग, किंवा इतर काही आजारांमुळे ही हात पाय सुन्न होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
म्हणूनच, तुम्हाला वारंवार जर असे होत असेल, तर एकदा जरूर तपासून घ्या. जर तुम्हाला याचे खरे कारण समजले, तर तुम्हाला या स्थितीचा सामना करावा लागणार नाही. तसेच, तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करू शकता.
खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा: हात पाय सुन्न होण्यापासून वाचण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे. खरे म्हणजे, हातपाय वारंवार सुन्न होण्याचे कारण, शरीरात पोषक तत्वांची कमी हे ही असू शकते. जर तुमच्या शरीरात विटामीन बी १२, पॉटेशियम, कॅल्शियम, आयर्न, मैग्नेशियम यांची कमतरता असेल, तर त्याचा परिणाम तुमचे हातपाय सुन्न होणे असा होऊ शकतो. म्हणूनच, तुम्ही तुमच्या आहारात या सर्व पोषक तत्वांचा समावेश जरूर करा.
मालीश तुम्हाला उपयोगी पडेल: जर तुमच्या शरीरातील ठराविक भाग वारंवार सुन्न पडत असतील, तर अशावेळी तुम्ही मालीशची मदत घेऊ शकता. नियमितपणे मालीश केल्यामुळे, रक्तप्रवाह व्यवस्थित होतो आणि आपल्या मासपेशींना मजबूती मिळते, ज्यामुळे हात पाय वारंवार सुन्न पडत नाहीत.
नियमित फक्त १५ मिनिटे व्ययाम केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत. व्यायाम केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत राहतो. आठवड्यातून तीस मिनिटे अॅरोबिक्स, सायकलींग, धावल्याने, पोहोल्याने हात पाय सुन्न होत नाहीत. हळदीमध्ये अॅन्टी इन्फ्लेमेंटरी सारखे तत्वे असतात प्रभावित भागाचे दुखणे काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
जर तुम्हाला कोणतीही स्वास्थ्याविषयी समस्या नसेल, तरी देखील मालीशमुळे तुम्हाला खूपच लाभ मिळेल. याशिवाय तुम्ही नियमित व्यायाम आणि गरम शेक घेणे चालू ठेवा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.