सर्दी, खोकला आणि एलर्जी यांमध्ये अत्यंत गुणकारी आहे काळी मिरी, जाणून घ्या काळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग…

काळी मिरी फक्त आपल्या जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर अनेक आजारांवरही गुणकारी आहे. जर तुम्हाला ऋतू बदलल्यावर आजार होत असतील तर नक्कीच तुम्ही काळ्या मिरीचे सेवन करायला हवे. खासकरून याचे सेवन सर्दी आणि खोकल्यासाठी उत्तम आहे. थंडीच्या दिवसात काळ्या मिरीचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकता तसेच तुम्ही निरोगी राहाता.चला तर पाहूया काळ्या मिरीचे फायदे कोणते कोणते आहेत आणि विविध आजारांवर ती कसे काम करते ते

मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे. मात्र या काळी मिरीचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत.  कोमट पाण्यामध्ये काळी मिरी टाकून प्यायल्यास आरोग्याला त्याचा लाभ होतो. त्याचप्रमाणे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीमायक्रोबीयल गुणधर्मांनी युक्त असा हा मसाल्याचा पदार्थ ट्युमरच्या वाढीला नियंत्रित करतो. मेंदूला नवे तेज प्राप्त होऊन तो सतेज होतो. तसंच त्यात अँटीडिप्रेसंट गुणधर्म असतात.

सर्दीपासून सुटका : तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने सर्दीपासून स्वतःची सुटका करून घ्यायची असल्यास एक कप गरम दुधात अर्धा चमचा मिरची पावडर घाला आणि त्यात एक चमचा साखर मिसळा. रात्री झोपायला जाण्याआधी तीन ते चार काळ्या मिर्या चावून वर थोडे दुध प्यायल्यास नक्की फायदा होईल.

गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.

तणाव दूर करते : फक्त शारीरिक नाही तर मानसिक आजारही हे बरे करते. याचे सेवन केल्यास तुम्ही ताण आणि तणावापासून दूर राहू शकता. जर तुम्ही नियमितपणे याचे सेवन केलेत तर नक्की तुम्हाला खूप बरे वाटेल आणि तुमच्यावरचा तणाव दूर होईल.

तुमच्या रक्तात जर शर्करेचे प्रमाण जास्त असेल तर ६ गरम काळी मिरची वाटून घेऊन ३० ग्राम साखर आणि दह्यात मिसळून त्याचे सेवन करा. असे दिवसातून दोन वेळा पाच दिवस घ्या. याने शर्करेचे प्रमाण कमी होईल.

पोटाचे विकार दूर होतात : काळ्या मिरीत अनेक पोषक तत्वे असतात जसे के केल्शियम, आयर्न वगैरे. याने तुमचे आरोग्य योग्य राहाते. काळी मिरी उपाशी पोटी घेतल्यास तुम्हाला बरेच फायदे होतील. पोटाचे अनेक विकार यामुळे बरे होतील. पोटात ग्यास किंवा एसिडिटी झाली असल्यास लिंबाच्या रसात एक चिमुट काळे मीठ आणि एक चिमुट काळी मिरी घालून प्यायल्याने पोटाचे विकार दूर होतील.

आपल्या स्वयंपाक घरात सहजपणे सापडणारा हा घटक फारच गुणकारी आहे. याच्या सेवनाने अनेक विकार बरे होतात आणि तुमचे आरोग्य चांगले राहाते. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास जरूर तुमच्या मित्रांना सांगा आणि शेयर करायला विसरू नका.

काळी मिरी मधील नैसर्गिक एंटी-डिप्रेशन तत्वामुळे दैनदिन आहारात काळ्या मिरीचा समावेश केल्यास मानसिक ताण तणावापासून मुक्ती मिळते . काळीमिरी प्रकृतीने उष्ण असल्यामुळे काळीमिरी चे सेवन योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *