जेवल्यानंतर कधीही करू नका या ६ मोठ्या चुका…

जेवताना अनेकदा आपण अशा काही चुका नकळत करून बसतो ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात/ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवण नेहमी योग्य वेळेत जेवायला हवे आणि कधीही कोणत्याही कारणाने आपल्या भुकेला मारू नये. तसे केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. जेवण झाल्यावर जर तुम्ही खाली दिल्या गेलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलेत तर नक्कीच तुमचा फायदा होईल.

जेवताना सारखे पाणी पिऊ नका.असे केल्याने तुम्हाला त्रास होतो. पाणी एकदाच संपूर्ण जेवण झाल्यावर मग प्यावे. जेवताना सारखे सारखे पाणी पिणे टाळावे. जेवण पूर्ण झाल्यावरसुद्धा लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर अर्ध्या तासानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.

हे लक्षात ठेवा कि जेवल्यानंतर साधे पाणी प्यावे आणि थंड पाणी पिणे टाळावे थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. थंड पाणी तुमच्या पचनशक्तीवर परिणाम करते. जर तुम्ही साधे किंवा कोमट पाणी प्यायल्यास उत्तम.

अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते पण ही सवय चांगली नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लगेच चहा किंवा कॉफी पिण्याने तुमच्या जेवणातील लोह नष्ट होते आणि तुमच्या शरीराला प्रोटीन मिळू शकत नाही.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल , पण हो जेवणानंतर लगेच शॉवरने आंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले नाही . जेव्हा आपण शॉवरने आंघोळ करतो तेव्हा आपला रक्तप्रवाह हात आणि पाय यांच्याकडे जास्त प्रमाणात जातो . पचनक्रियेत जिथे खरी गरज आहे तिथे रक्तप्रवाह न गेल्यामुळे जेवाणातील पोषक घटक संपूर्ण शरीरात पोहोचत नाहीत . आणि मग अन्नपचन नीट न झाल्याने आपल्याला वेगळ्याच प्रकारचा अस्वस्थपणा जाणवतो .

काही लोक जेवल्यानंतर लगेच झोपतात पण ही सवय चांगली नाही. झोपायचे असल्यास जेवल्यानंतर थोडा वेळ थांबून मग झोपावे. थोडा वेळ शतपावली करून मग अर्ध्या तासाने झोपणे चांगले. जर लगेच तुम्ही झोपलात तर तुमचे पचन बिघडेल आणि तुम्हाला पोटाचे विकार होतील.

जेवल्यानंतर लगेच ज्यूस पिऊ नका. असे केल्याने तुमचे पचन बिघडते. कोणतेही पेय जेवल्यावर पिऊ नका. जेवल्यानंतर दोन तासांनी ज्यूस प्यायलात तर चालेल. जेवल्यावर लगेच धु म्र पा न करू नका किंवा दा रू पिऊ नका. असे केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परीणाम होतो.

जेवताना थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाऊ नये. थंड दही आणि दुध एकत्र घेऊ नका. असे केल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. अशाच प्रकारे पनीर खाल्यावर दुध किंवा कॉफी पिऊ नये. अनेक लोकांना जेवण झाल्यावर लगेच खुर्चीवर बसून काम करायची सवय असते. डॉक्टर म्हणतात कि जेवल्यानंतर लगेच खुर्चीवर बसू नये. जेवण झाल्यावर कमीत कमी १० मिनिटे चालून मगच खुर्चीवर बसून काम सुरु करावे.

या गोष्टी पाळल्यात तर कधीही तुम्हाला पचनाच्या किंवा पोटाच्या तक्रारी होणार नाहीत. नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *