हिरव्या मिरचीचा जेवणात स्वाद वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. जर जेवणात मिरची नसेल, तर तुम्ही कोणतेही मसाले वापरले, तरी जेवण स्वादिष्ट लागत नाही. मिरच्याचे दोन प्रकार आहेत, एक हिरवी आणि एक लाल. लाल मिरचीची पाऊडर म्हणजे आपले तिखट. पण काही पदार्थात हिरवी मिरची पाहिजे नाहीतर पदार्थ स्वादिष्ट होत नाही.
हिरवी मिरची फक्त तिखट आहे असे नाही , तर त्यात अनेक गुणधर्म लपलेले आहेत, जे जाणून घेतलेत तर तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. ज्या लोकांमध्ये आयर्नची कमी असते, त्यांच्यासाठी तर हिरवी मिरची खूपच उपयोगी आहे. तसेच हिरवी मिरची विटामीन के चा चांगला स्त्रोत आहे. चला तर मग जाणून घेऊया, २ हिरव्या मिरच्या रात्री पाण्यात भिजवून जर सतत ७ दिवस ते पाणी सेवन केले तर कोणते फायदे होतात:
हिरव्या मिरचीचे पाणी पिण्याचे फायदे : हिरव्या मिरची मध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असते आणि म्हणूनच ते शरीराला आजारांशी लढण्यास मदत करते. शरीराला संक्रमणापासून वाचवते तसेच कॅन्सर सारख्या आजारांपसून वाचवते. शरीरात रक्ताच्या गुठळया बनवण्यापासून वाचवते. चयपचय क्रिया सुरळीत करते आणि कॅलरीज बर्न करते.
उन्हाळ्यात हिरवी मिरची सेवन केल्यामुळे शरीरास थंडावा मिळतो. हे उच्च रक्तदाब असलेल्या रोग्यांसाठी फायदेशीर आहे व हृदयरोगास दूर ठेवते. गठीया रोगात पण फायदेशीर आहे. हिरव्या मिरची मध्ये विटामीन ए आहे, त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. हिरव्या मिरचीत असलेल्या अॅंटी-ओक्सिडेंटमुळे त्वचा आणि सौंदर्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ते वाढते वयानुसार पडणार्या सुरकुत्या कमी करते.
हे अॅंटी-इन्फ्लमेटरी औषधाप्रमाणे काम करते आणि शरीरात कोठेही जर वेदना असतील, तर हिरव्या मिरचीत असणारे गुण शरीरातील वेदनामध्ये आराम देण्याचे काम करतात. हिरवी मिरची ही कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हिरवी मिरची खाल्ल्यानंतर एक हार्मोन एंडोर्फिन निर्माण होते, हे हार्मोन “फील गुड हार्मोन ” म्हणून ओळखले जाते. म्हणजेच हे आपला मूड चांगला करते.
हिरवी मिरची हाडांसाठी, दातांसाठी फायदेशीर आहे व आपल्या शरीरातील कोणत्याही दुखण्यावर इलाज आहे. शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यास मदत करते, जी शरीरासाठी अत्यंत जरूरी आहे. याशिवाय पुरुषांसाठी हिरव्या मिरचीचे सेवन खूपच फायदेशीर आहे. ते यासाठी की पुरुषांमध्ये प्रोटेस्ट कॅन्सर होण्याची भीती जास्त असते. हिरवी मिरची प्रोटेस्ट कॅन्सरला रोकते.
कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.