वयाच्या 50 व्या वर्षी मंदाकिनी चित्रपटांपासून दूर जगत आहे असे आयुष्य, करत आहे हे काम…

मेरठमधील एक साधारण कुटुंबातील मुलगी जिने एका रात्रीत देशात खळबळ माजवली, जेव्हा राजकपूर यांनी तिला राजीव कपूरच्या बरोबर चित्रपटात भूमिका दिली. मंदाकिनी उर्फ यास्मिन जोसेफ, एक नाव जी एका रात्रीत चमकती तारका बनली. पण ही तारका जेवढी लवकर प्रसिद्ध झाली, तेवढीच लवकर लुप्त झाली. सन १९८५ मध्ये एक फिल्म आली, ज्याचे नाव होते “राम तेरी गंगा मैली”. या फिल्मचे दिग्दर्शन केले होते,

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता व शोमॅन राज कपूर यांनी. आर. के. बॅनरच्या या फिल्मचे अभिनेता होते, राज कपूर यांचे भाऊ राजीव कपूर आणि अभिनेत्री होती, मेरठ मधील १६ वर्षाची मंदाकिनी. फिल्म सुपरहिट झाली आणि मंदाकिनी देशभरात चर्चेचा विषय बनली. तसे तर मंदाकिनी आपल्या अभिनयापेक्षा आपल्या भडक अशा व्यक्तिमत्वाने चर्चेत आली. या फिल्मने मंदाकिनीला सर्व प्रकारची प्रसिद्धी दिली, जे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते.

राम तेरी गंगा मैलीच्या प्रचंड यशानंतर मंदाकिनीला एका पाठोपाठ एक अशा फिल्मच्या संधि आल्या. ८५ ते ९० च्या दरम्यान मंदाकिनीने मिथुन चक्रवर्ती बरोबर “डांस डांस” तसेच गोविंदा बरोबर “प्यार करके देखो” आणि अनिल कपूरच्या बरोबर “तेजाब” सारख्या यशस्वी फिल्म्समध्ये काम केले. मग १९९०चे पर्व आले.

या दशकात मंदाकिनी नावाच्या चमकत्या तारीकेच्या नावाला बट्टा लागला आणि तो दाग एवढा मोठा होता, की तिचे अस्तित्व धूसर होत गेले. खरे तर, ९०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, मंदाकिनीचे नाव अन्डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी जोडले गेले. वर्तमानपत्रात मंदाकिनीची दाऊद बरोबर छायाचित्रे छापून येऊ लागली. असे म्हटले गेले, कि मंदाकिनी आणि दाऊद यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत. परंतु, मंदाकिनीने मात्र या प्रेमसंबंधांना कधीच दुजोरा दिला नाही आणि हेच सांगत राहिली, कि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.

मग आले वर्ष १९९३चे. १२ मार्च १९९३ने मायानगरी मुंबईत मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट झाले, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या धमाक्यापासून बॉलीवूड वेगळे राहिले नाही. या बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार दाऊद देशातून पळून गेला, तेव्हा पोलिसांनी बर्‍याच बॉलीवूड कलाकारांची कसून चौकशी केली.

त्या दिवसात ही चर्चा सर्वत्र होती, कि मंदाकिनी दाऊदची अतिशय जवळची आहे. असेही म्हटले जात होते, कि मंदाकिनीने दाऊदशी लग्न केले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. पण या चर्चेला दाऊदने कधी काही उत्तर दिले नाही ना मंदाकिनीने काही सांगितले. तिने फक्त एवढेच सांगितले, कि त्यांची चांगली मैत्री आहे.

दाऊदच्या मैत्रीमुळे एका प्रसिद्ध डायरेक्टरने तिला फिल्ममध्ये घेण्यास नकार दिला, तेव्हा दाऊदने त्याला जीवे मारले. परंतु, दाऊदचे नाव मंदाकिनीसाठी एक बदनामीचा डाग ठरले आणि ज्याने तिच्या करियरला वाळविसारखे खाऊन टाकले. नंतर असे समजले, कि दाऊदच्या नावामुळे झालेला मानसिक त्रास कमी करण्यासाठी मंदाकिनीने एका बौद्ध आश्रमाचा आधार घेतला.

इथे तिची भेट डॉक्टर काग्युर टी रिंनपोचे ठाकुर बरोबर झाली. तेच शेवटी तिचे जीवनसाथी बनले. आता मंदाकिनी अनामिकेची जीवनपद्धती जगत आहे. ती आपल्या पतीबरोबर मुंबईत तिब्बतन हर्बल सेंटर चालवते आहे. याशिवाय मंदाकिनी तिब्बत योगा शिकवते.

मीडिया रिपोर्टनुसार मंदाकिनी आता चित्रपटांपासून दूर ‘योगा क्लास’ चालवित आहेत. असेही म्हटले जाते की मंदाकिनी “दलाई लामा” यांचे अनुयायी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *