वैवाहिक जीवन हे वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध असते. कधी प्रेम तर कधी भांडणे अशा प्रकारे आयुष्य पुढे सुरु होते. आंबट गोड असे हे नाते जापायचे आणि फुलवायचे असते. कठीण प्रसंगात निभावून न्यायचे असते. कधीतरी भांडण एवढे मोठे असते कि ते विकोपाला जाऊ शकते.
अशा वेळी संतुलन ठेवणे आवश्यक असते तसेच दोघांनीही समजूतदारपणा दाखवायचा असतो. अशा वेळी काय करायचे याच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुमची पत्नी रागावली असली तर कोणत्या प्रकारे समजूत काढून तुम्ही भांडण मिटवू शकता ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. या टिप्स तुम्ही जर अमलात आणल्यात तर नक्की तुमचे भांडण लवकर मिटेल.
पत्नीला कामात मदत केलेली आवडते. अशा वेळी तिला तिच्या कामात मदत करा, मुलांना सांभाळा जेणेकरून तिला बरे वाटेल.
असे म्हणतात कि कोणाच्या हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो. जर तुम्ही उत्तम पदार्थ बनवलेत तर नक्की तिचा राग कमी होईल आणि तुमचे भांडण मिटेल. जर तुम्ही तिच्या आवडीचे पदार्थ बनवून तिला खाऊ घातलेत तर नक्कीच तिचा राग शांत होईल.
भांडण ज्या कारणावरून झाले असेल तो मुद्दा सोडून द्या म्हणजे वाद उगाच वाढणार नाही. जर तुम्हाला कारण माहिती नसेल तर तिच्याशी बोला. संवाद हेच उत्तम माध्यम असते. तिच्याशी बोलून मग प्रश्न नक्कीच लवकर सोडवता येतील. असेही होईल कि तुमची पत्नी रागाने तुम्हाला पटकन कारण सांगणार नाही, तुम्हाला प्रेमाने तिला बोलते करावे लागेल आणि तिच्याकडून सगळे काढून घ्यावे लागेल.
बरेचदा बायका वाद झाल्यावर बोलणे बंद करतात पण तसे करणे चुकीचे आहे. तिच्याकडे लक्ष दिलेत थोडी काळजी घेतलीत तर नक्की तिचा राग शांत होऊन ती बोलायला येईल आणि वाद मिटेल. तुम्ही थोडा वेळ एकत्र घालवा किंवा बाहे जाऊन या जेणेकरून तुमच्यातील नाते आणखी घट्ट होईल. तिच्याकडे जास्त लक्ष दिलेत आणि तिच्यासाठी काही केलेत तर नक्की ती विरघळेल आणि तुमचे नाते आणखी दृढ होईल.
तिच्या आवडीच्या गोष्टी केल्याने किंवा तिला आणून दिल्याने तुमच्यातील स्नेह वाढेल. कोतेही भांडण असले तरी ते जास्त ताणू नका किंवा मनाला लावून घेऊ नका, असे केल्याने तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होईल. तुम्हाला भांडण मिटवायचे आहे, वाढवायचे नाही.
भांडणे हा सहजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तुमचे नाते फुलवणे तुमच्या हातात आहे. भांडणातून तुमचे प्रेम वाढवा आणि तुमचे नाते आणखी फुलवा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.