जसे की तुम्ही सर्वच जाणता की, आजच्या धावपळीच्या जीवनात भेसळीचे खाणे-पिणे, चुकीची जीवनशैली, आणि पोषक तत्वांची कमतरता यामुळे शरीरात कितीतरी प्रकारचे आजार उत्पन्न होतात. तुम्ही नेहमीच बघितले असेल, की बरीच माणसे चणीने बारीक असतात, परंतु त्यांची ऊंची चांगली असते. मात्र त्यांच्या शरीराला वजन नसते, तसेच त्यांच्या शरीरात ताकद किंवा शक्ति नसते. जर तुम्हीसुद्धहा असेच काहीसे दिसत असाल, तर तुम्ही तुमच्या शरीरात एखाद्या पहेलवानासारखी ताकद उत्पन्न करू शकता.
आम्ही तुम्हाला आज ज्या वस्तुबद्दल सांगणार आहोत, ती काही साधारण वस्तु नाही. ती दिसायला जरी अगदी साधारण असेल, तरि त्यांची ताकद ही काही साधारण नाही. ती आहे मुगाची डाळ जी सर्वच लोक खातात व वापरतात. यांची भाजी पण बनवितात, आणि याच्या सेवनाने तुमचे शरीर मजबूत व बनेल.
म्हणूनच तुम्हाला मूग डाळ खाण्याचा योग्य प्रकार माहीत असणे खूप जरूरी आहे. मुगाची डाळ खाण्याचे ३ प्रकार आहेत. जर तुम्ही मुगाची डाळ मोड आणून म्हणजेच अंकुरित करून खात असाल., तर ती सगळ्यात जास्त फायदेशीर आणि उत्तम आहे, कारण यामध्ये पोटेशियम, प्रोटीन्स, विटमिन्स यासारखी तत्वे असतात, जी मोड आल्यानंतर खूपच वाढतात. मुगाच्या डाळीमध्ये मासे, कोंबडी, मांस आणि दूध यापेक्षा जास्त प्रोटीन्स असतात, जर तुम्ही ती मोड आणून खाल्लीत तर. ती शरीरातील अशक्तपणा कमी करून शरीरला ताकद देऊन मजबूत बनवतात.
मूग डाळ खाण्याची योग्य पद्धत: डाळ खाण्यासाठी तुम्ही मुगाचे नमकिन (मीठ लावलेली) डाळ खाऊ शकता. त्या प्रकारे खाल्यामुळे ती अतिशय स्वादिष्ट लागते. तुम्ही मुगाच्या डाळीचे नमकिन पदार्थ कोणत्याही दुकानातून खरेदी करून खाऊ शकता. डाळ भिजवून, किंवा शिजवून दुधात मिक्स करून ते दूध तुम्ही सेवन करू शकता. अशा प्रकारे हे खूपच स्वादिष्ट लागते.
मूग डाळीचा उपयोग केवळ निरनिराळे पदार्थ बनवण्यासाठी होतोच, पण त्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी मूग डाळीचे सेवन जरूर करावे. अंकुरित म्हणजेच मोड आलेल्या मुगडाळीत फायबरचे प्रमाण खूप असते, त्यामुळे ते पचनक्रिया व्यवस्थित करून बद्धकोष्टतेचा त्रास नाहीसा करते.
मुगाची डाळ भिजवून सकाळी ती मोड आणून खाल्ली जाते, त्यामुळे त्यामधील प्रोटीन्सचे प्रमाण वाढते. हे जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले, तर शरीरास अत्यंत लाभदायक आहे. अंकुरित मूग डाळीचे सेवन हे त्वचेला तजेलदार बनवते.
अंकुरित मूग डाळीमध्ये पेप्टिसाईड असल्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित करून शरीरास निरोगी आणि कार्यक्षम ठेवते. मूग डाळ ही आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे, त्यामुळे अॅनिमियासारख्या आजारांपासून आपण स्वत:ला वाचवू शकतो त्यासाठी मूग डाळीचे भरपूर प्रमाणात सेवन करणे खूप जरूरी आहे.
नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!