बरेचदा लोकांना वाटते कि खाण्याचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे चांगले अस्र्ते पण काही पदार्थ असे असतात जे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, तसे केल्यास नुकसान होईल. असे म्हणतात कि काही पदार्थ असे असतात जे कधीच फ्रीजला ठेवू नये. कारण तसे केल्याने त्यांचा मूळ रंग आणि चव निघून जातात. तर चला पाहूया हे आहेत तरी कोणते पदार्थ
कॉफी : कॉफी बींस कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यांचा वास आणि नैसर्गिक चव असे केल्याने उडून जातात. जर तुम्ही फ्रीजमध्ये अशा गोष्टी ठेवल्यात तर त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थांना त्याचा वास लागेल. जर फ्रीजमध्ये भाजी ठेवली असेल तर ती भाजी हा वास शोषून घेईल. याने तुमची सगळी कॉफी खराब होऊ शकते.
लसूण : लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण असे केल्यानंतर १२ तासांनी ती सुखायला लागते. लसूण नेहमी सामान्य तापमानावरच स्टोअर करावी. असे केल्याने ती खराब होत नाही आणि सुरक्षित राहाते व जास्त काळ टिकते. टोमेटो, फ्रिजमध्ये अगदी कमी तापमानात जर टोमेटो ठेवले तर त्याची चव बिघडते आणि ते खूप नरम होतात.
मध हा पदार्थ मुळात टिकाऊ असल्याने याला फ्रीजला ठेवण्याची आवश्यकता नाही. तसे केल्याने त्याची चव बिघडते. मध हा फ्रीजशिवायच वर्षानुवर्षे उत्तम टिकू शकतो जर तुम्ही हा फ्रीजला ठेवलात तर हा कडक होऊन खराब होऊ शकतो.
कांदा हा फ्रिजच्या बाहेर अनेक दिवस टिकतो म्हणून याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. जर जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर कांदा खराब होईल आणि त्यावर बुरशी येईल. जर तुम्ही कांदा चिरून ठेवला तर तो सुखून जातो.
केळी टिकाऊ असतात म्हणून त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. जर फ्रीजमध्ये ठेवलीत तर ही जास्त पिकतात आणि मऊ पडतात आणि चवीवर परीणाम होतो म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात.
फ्रीजचा वापर हा पदार्थ टिकवण्यासाठी केला जातो पण तरीही सगळेच पदार्थ फ्रीजला ठेवू नयेत. तसे केल्याने त्यांचे गुणधर्म कमी होतात. म्हणून पदार्थ स्टोअर करताना पूर्ण विचार करून मगच स्टोअर करावेत.
नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!