जंगले ही खूप महत्वाची असतात. जंगलांमुळेच तर शुद्ध वायू मिळतो,जो जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक असतो. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे जंगले कमी होताना दिसत आहेत. जंगलात अनेक प्रकारची झाडे दिसतात. यातील अनेक झाडे यांच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला या क्रमात शिशम म्हणजेच रोजवूड याच्या बाबतीत काही तथ्य सांगणार आहोत.
रोजवूडचे लाकूड खूप मजबूत आणि महाग असते. दिसायला साध्या दिसणाऱ्या ह्या झाडात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्याच्या पानातून एक चिकट पदार्थ बाहेर पडतो ज्याचा वापर अनेक रोगांच्या इलाजात केला जातो. त्याच्या पानाचे अनेक औषधी फायदे आहेत जसे कि, वेदनाशामक, सडन रोखणारा, कामोत्तेजना वाढवणारा, जीवाणु रोधक आणि कीटनाशक. याची सगळ्यात जास्त पाने ब्राझीलमध्ये आढळतात. तिकडे याची सदाबहार पाने सापडतात. त्याचे लाकूड खूप महाग आणि मजबूत असते ज्याचा वापर घरे बनविण्यासाठी केला जातो. हे झाड आणि पाने दोन्ही खूप उपयुक्त असतात.
रोसवूडच्या पानांचे फायदे
याची पाने तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. त्याच्या पानातून एक चिकट पदार्थ बाहेर पडतो जो अनेक आजारांत गुणकारी आहे. डिप्रेशन मध्ये सहायक : रोसवूडच्या तेलाने डिप्रेशनमध्ये खूप फायदा होतो. याच्या तेलाने मसाज केल्यास डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. याने आपल्याला सकारात्मक उर्जा मिळते. याचे तेल केल्याने लक्ष केंद्रित व्हायला मदत होते.
वेदनाशामक : जर तुम्हाला दातात दुखत असेल किंवा सांधेदुखी होत असेल तर रोजवुड तेल तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहे. जर दातात दुखत असेल तर हे तेल कापसावर लावून दाताच्या खाली ठेवा त्याने तुम्हाला बरे वाटेल. डोकेदुखीवर सुद्धा ह्याने खूप फायदा होतो. याने मालिश केल्याने तुमचा फायदा होईल. जर सांधेदुखी असेल तर तेल गरम करून त्या ठिकाणी लावा.
हृदय रोगाच्या बाबतीत उपयुक्त
ह्रदय रोगावर खूप उपयुक्त आहेत ही पाने. जर तुमचे कॉलेस्ट्रोल वाढले असेल तर या तेलाचा वापर करा. याने तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होईल. या तेलाचा वापर स्वयंपाकात केल्याने तुमची पचनशक्ती उत्तम राहील. मळमळ होते तेव्हा काही चांगले वाटत नाही आणि बेचैनी वाटते. रोजवूडच्या तेलाने तुमचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर इतर आजार म्हणजे उल्टी, कफ़ समस्या, सर्दी,तणाव त्वचा रोग यांतसुद्धा या तेलाचा वापर फायदेशीर आहे.
जर तुम्हाला जखम झाली असेल तर ती भरायला ह्या तेलाचा उपयोग होतो. जिथे घाव असेल तिथे या तेलाला हळदीत मिसळून लावा. असे केल्याने जखम लवकर भरेल. त्याचबरोबर तळपायांच्या भेगांवर हे तेल खूप गुणकारी आहे. अनेकदा काही कारणांमुळे आपले डोळे लाल होतात. अशात तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. रोजवूडच्या नरम पानांना वाटून घेऊन त्याचा लेप बनवून रात्रभर डोळ्यावर पट्टीच्या सहाय्याने बांधून घ्या. याने डोळ्याची लाली कमी होईल.
नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!