दूध आणि टोमॅटो आपल्या त्वचेसाठी आहेत वरदान, घरीच करून पहा हे उपाय आणि काही दिवसातच मिळवा चमकदार त्वचा…

प्रत्येक मुलीची ही इछा असते, की ती जगातील सर्वात सुंदर मुलगी असली पाहिजे. तिला असे वाटत असते, की आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार असावी आणि तिच्या त्वचेवर कोणतेही डाग किंवा चट्टे नसावेत. परंतु कधीकधी काही कारणांमुळे तिचे हे स्वप्न पूर्ण होत नाही.

मग ती आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधंनांचा वापर करते, परंतु याचा परिणाम मात्र काहीच दिसून येत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल. कोणतीही महागडी प्रसाधने न वापरता, तुम्ही तुमच्या चेहर्‍याचे तेज वाढवू शकता. कसे ते आपण जाणून घेऊया:

या पद्धतींनी चेहरा चमकदार बनवा: गोरा रंग मिळविण्यासाठी एका मोठ्या टोमॅटोचा रस काढून घ्या. आता त्यात अर्धा कप ताजे कच्चे दूध घाला. ते मिश्रण आता कापसाच्या मदतीने आपल्या चेहर्‍यायावर लावा. जेव्हा ते चांगले वाळून जाईल, तेव्हा ते थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा खूपच तजेलदार आणि स्वच्छ दिसेल. याशिवाय जर तुमच्या चेहर्‍यावर सुरकुत्या असतील, तर टोमॅटो आणि मुल्तानी मातीचे मिश्रण बनवून चेहर्‍यावर लावा आणि १५ मिनिटे ते चेहर्‍यावर वाळवा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

त्वचेसाठी दहयाचा वापर हा खूप फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने आपल्या चेहर्‍यावर तकाकी येईल व चेहरा चमकदार दिसेल. याचा वापर करण्यासाठी १ मोठा चमचा ओट्स दहयामध्ये मिसळून बारीक वाटून घ्या. आता हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर लावा. २० मिनिटांनंतर, जेव्हा ते सुकेल, तेव्हा ते धुवा. त्याचा उपयोग केल्याने, सूर्यप्रकाशाने चेहर्‍यावर आलेला काळपटपणा कमी होईल आणि त्याचबरोबर आपली त्वचा चमकदार होईल. त्वचा जी टोन होते त्यावर एकदम उत्तम उपाय आहे.

जर तुमच्या डोळ्यांखाली काळी गडद वलये असतील, तर त्यापासून मुक्त होण्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग आहे. डोळ्यांखालील काळी गडद वलये काढून टाकण्यासाठी, बटाट्याची चकती गडद काळ्या वलयावर ठेवा. जर आपल्याला गडद वलयांची समस्या दूर करायची असेल, तर आपण बटाट्याचा रससुद्धहा ह्या गडद वलयांवर लावू शकता. तो रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी उठल्यावर धुवा.

यामुळे तुमचे डोळे सतेज दिसतील. तुम्हाला आम्ही सांगू इछितो, की बटाट्यांमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात, जे काळा रंग काढून टाकण्यास मदत करतात. इतकेच नाही तर हे फुगिर डोळ्यांची (पफी आय) जर समस्या असेल तर ती देखील दूर करतात.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *