१७ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे नवरात्र, जाणून घ्या घटस्थापनेचे महत्व आणि शुभ मुहूर्त…

१७ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होत आहे. हे नवरात्र थाटामाटात संपूर्ण देशात साजरे केले जाते आर घराघरात मातेची चौकी स्थापन केली जाते. नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. असे म्हणतात कि जे लोक नऊ दिवस पूजा करतात आणि व्रत ठेवतात त्यांच्यावर देवीची कृपा होऊन त्यांची भरभराट होते. देवीची कृपा आपल्यावर होण्यासाठी शारदीय नवरात्रीत घरात मातेची चौकी नक्की स्थापन करा आणि शक्य झाल्यास व्रतही करा.

शारदीय नवरात्र 2020 : १७ ऑक्टोबरला नवरात्र सुरु होते आणि पहिल्या दिवशी मातेच्या चौकीची स्थापना होते. या वर्षी नवरात्रीचा शेवटचा दिवस २६ ऑक्टोबर आहे. वास्तविक या वर्षी अधिकमास आल्याने नवरात्र नेहमीपेक्षा एक महिना उशिरा आली आहे. एरवी पितृपक्ष संपला कि लगेचच नवरात्रीची सुरवात होत असते.

घटस्थापना शुभ मुहूर्त : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापना नेहमी शुभ मुहूर्तावरच केली जायला हवी.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त १७ ऑक्टोबर २०२० ला सकाळी 06:23:22 पासून 10:11:54 पर्यंत राहील. म्हणजेच घटस्थापनेचा अवधी ३ तास ४८ मिनिटे इतका राहील. या दरम्यान तुम्ही घटस्थापना करू शकता.

अशी करा घटस्थापना : याला काही लोक कलश स्थापना किंवा मां की चौकी ठेवणे असेही म्हणतात. नवरात्रीत कलशाचे महत्व खूप जास्त आहे. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा घरात कलश कायम ठेवला जातो. घटस्थापना करण्याआधी स्वतःची स्वच्छता करा. मग देवघर साफ करून घ्या. देवघरात एक चौकी ठेवा. यावर लाल रंगाचे वस्त्र घाला. आता चौकीवर नवग्रह बनवा. हे तुम्ही हळद आणि तांदुळाने बनवू शकता. नवग्रह बनवण्यासाठी चौकीच्या जवळ एक पात्र ठेवा. यात माती घाला. कलश मातीच्या पात्रात ठेवा. या कलशात पाणी घाला. यांत नारळ ठेवा आणि आंब्याची पाने ठेवा.

कलश स्थापना झाल्यावर चौकी वर मातेची मूर्ती ठेवा. मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावा. देवीला फुलांच्या माळा घाला आणि फळे सुद्द्धा वाहा. आता पूजेचा संकल्प करा. संकल्प करत हातात पाणी घ्या आणि मनात मनोकामना सांगा. त्याचसह प्रार्थना करा.
संकल्प केल्यानंतर जल चौकीच्या जवळ जमिनीवर सोडून द्या. आता पूजा सुरु करा आणि दुर्गापाठ सुद्धा करा. देवीची आरती करा अशाच प्रकारे संध्याकाळीसुद्धा पूजा करा.

नऊ दिवस देवीची अशीच मनापासून पूजा करा. शेवटच्या दिवशी कुमारिका पूजन करा. शक्य असल्यास शेवटच्या दिवशी घरात हवन करून घ्या. देवीच्या या नऊ रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी सिद्धिदात्री. ह्या गोष्टी करू नका. नवरात्र चालू असताना कांदा लसूण खाऊ नका, दा रू पिऊ नका, घरात स्थापना झाल्यावर जमिनीवर झोपा. स्त्रियांचा अपमान करू नका.

दुर्गा स्तोत्र पाठ : त्वमेवसर्वजननी मूलप्रकृतिरीश्वरी। त्वमेवाद्या सृष्टिविधौ स्वेच्छया त्रिगुणात्मिका॥ कार्यार्थे सगुणा त्वं च वस्तुतो निर्गुणा स्वयम्। परब्रह्मस्वरूपा त्वं सत्या नित्या सनातनी॥ तेज:स्वरूपा परमा भक्त ानुग्रहविग्रहा। सर्वस्वरूपा सर्वेशा सर्वाधारा परात्परा॥ सर्वबीजस्वरूपा च सर्वपूज्या निराश्रया। सर्वज्ञा सर्वतोभद्रा सर्वमङ्गलमङ्गला॥ सर्वबुद्धिस्वरूपा च सर्वशक्ति स्वरूपिणी। सर्वज्ञानप्रदा देवी सर्वज्ञा सर्वभाविनी। त्वं स्वाहा देवदाने च पितृदाने स्वधा स्वयम्। दक्षिणा सर्वदाने च सर्वशक्ति स्वरूपिणी।

निद्रा त्वं च दया त्वं च तृष्णा त्वं चात्मन: प्रिया। क्षुत्क्षान्ति: शान्तिरीशा च कान्ति: सृष्टिश्च शाश्वती॥ श्रद्धा पुष्टिश्च तन्द्रा च लज्जा शोभा दया तथा। सतां सम्पत्स्वरूपा श्रीर्विपत्तिरसतामिह॥ प्रीतिरूपा पुण्यवतां पापिनां कलहाङ्कुरा। शश्वत्कर्ममयी शक्ति : सर्वदा सर्वजीविनाम्॥ देवेभ्य: स्वपदो दात्री धातुर्धात्री कृपामयी। हिताय सर्वदेवानां सर्वासुरविनाशिनी॥ योगनिद्रा योगरूपा योगदात्री च योगिनाम्। सिद्धिस्वरूपा सिद्धानां सिद्धिदाता सिद्धियोगिनी॥ माहेश्वरी च ब्रह्माणी विष्णुमाया च वैष्णवी। भद्रदा भद्रकाली च सर्वलोकभयंकरी॥ ग्रामे ग्रामे ग्रामदेवी गृहदेवी गृहे गृहे। सतां कीर्ति: प्रतिष्ठा च निन्दा त्वमसतां सदा॥ महायुद्धे महामारी दुष्टसंहाररूपिणी। रक्षास्वरूपा शिष्टानां मातेव हितकारिणी॥ वन्द्या पूज्या स्तुता त्वं च ब्रह्मादीनां च सर्वदा। ब्राह्मण्यरूपा विप्राणां तपस्या च तपस्विनाम्॥ विद्या विद्यावतां त्वं च बुद्धिर्बुद्धिमतां सताम्। मेधास्मृतिस्वरूपा च प्रतिभा प्रतिभावताम्॥ राज्ञां प्रतापरूपा च विशां वाणिज्यरूपिणी। सृष्टौ सृष्टिस्वरूपा त्वं रक्षारूपा च पालने॥

तथान्ते त्वं महामारी विश्वस्य विश्वपूजिते। कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिश्च मोहिनी॥ दुरत्यया मे माया त्वं यया सम्मोहितं जगत्। यया मुग्धो हि विद्वांश्च मोक्षमार्ग न पश्यति॥ इत्यात्मना कृतं स्तोत्रं दुर्गाया दुर्गनाशनम्। पूजाकाले पठेद् यो हि सिद्धिर्भवति वाञ्िछता॥ वन्ध्या च काकवन्ध्या च मृतवत्सा च दुर्भगा। श्रुत्वा स्तोत्रं वर्षमेकं सुपुत्रं लभते ध्रुवम्॥ कारागारे महाघोरे यो बद्धो दृढबन्धने। श्रुत्वा स्तोत्रं मासमेकं बन्धनान्मुच्यते ध्रुवम्॥ यक्ष्मग्रस्तो गलत्कुष्ठी महाशूली महाज्वरी। श्रुत्वा स्तोत्रं वर्षमेकं सद्यो रोगात् प्रमुच्यते॥ पुत्रभेदे प्रजाभेदे पत्‍‌नीभेदे च दुर्गत:। श्रुत्वा स्तोत्रं मासमेकं लभते नात्र संशय:॥ राजद्वारे श्मशाने च महारण्ये रणस्थले। हिंस्त्रजन्तुसमीपे च श्रुत्वा स्तोत्रं प्रमुच्यते॥ गृहदाहे च दावागनै दस्युसैन्यसमन्विते। स्तोत्रश्रवणमात्रेण लभते नात्र संशय:॥ महादरिद्रो मूर्खश्च वर्ष स्तोत्रं पठेत्तु य:। विद्यावान धनवांश्चैव स भवेन्नात्र संशय:॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *