जर तुम्हाला कधीही नैराश्य आले असेल तर नक्की वाचा हे…

आपण सध्याच्या काळात आपल्या मानसिक समाधानाकडे लक्ष न देता, या यांत्रिक युगात स्वत: यंत्र बनत चाललो आहोत. पैसे, संपत्ति कमावण्याच्या नादात आज आपण इतके व्यस्त झालो आहोत, की स्वत:साठी आपल्याकडे वेळच उरला नाहीये. खरच, आपण पैशाने समृद्ध होत आहोत, पण आपण आपले मानसिक समाधान, आनंद हे कुठेतरी हरवत चालले आहे. जगभरातील सगळ्यात मोठी स्वास्थ्य संस्था “विश्व स्वास्थ्य संस्था” च्या एका रीपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, भारत हा जगभरातील सगळ्यात जास्त नैराष्यग्रस्त लोक असलेला देश आहे.

आजच्या काळात भारतासारख्या देशात प्रत्येक वयोगटातील लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचा ताण-तणाव आहे. जसे की, मुलांवर अभ्यासाचा शिक्षणाचा ताण-तणाव आहे, तर युवकांवर चांगली नौकरी मिळवण्याचा ताण आहे. या सगळ्या प्रकारात तुम्ही एकदम हरवून गेला आहात. एकलकोंडे झाला आहात.

भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे नैराष्य: नैराष्य ही भारतासारख्या देशासाठी चिंतेची गोष्ट आहे. जास्त ताण-तणावामुळे लोक नैराष्यासारख्या गंभीर आजाराच्या संपर्कात येत आहेत. याच कारणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या आजाराचे जास्त बळी हे १५ ते २९ वयोगटातील युवावर्ग आहे. म्हणून हे जरूरी आहे, की नैराष्य या आजारासंबंधीच्या सगळ्या सेवा या फुकट दिल्या गेल्या पाहिजेत आणि सहज लोकांसाठी उपलब्ध झाल्या पाहिजेत. रिपोर्ट असे म्हणतो, की जर लोक अशीच तणावग्रस्त जीवन जगत राहिले, तर २०२० पर्यन्त मानसिक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. विश्व स्वास्थ्य संगठनचा रिपोर्ट सांगतो, की भारताच्या नंतर दुसर्‍या नंबरवर चीन आणि अमेरिका हे देश आहेत. ज्या देशातील लोक नैराष्याग्रस्त आहेत.

भारतात मनोरुग्णांची संख्या वाढते आहे: भारतात मनोरुग्ण रोग्यांच्या चिकित्सेसाठी खूप कमी सुविधा आहेत. माहितीनुसार, असे सांगितले आहे, की देशात ३५०० मनोवैज्ञानिक, ४००० मानसोपचारतज्ञ आणि ३५०० मानसिक स्वास्थ सामाजिक कार्यकर्ते उपलब्ध आहेत. भारतातील जास्तीत जास्त लोक जे मानसिक रुग्ण आहेत, ते आपल्यावर उपचार करून घेत नाहीत. हेच कारण आहे, की देशातील जास्तीत जास्त लोकांच्या आत्महत्येचे कारण हे नैराष्य हेच आहे.

नैराष्य म्हणजे काय? कोणीही व्यक्ति नैराष्याची शिकार तेव्हाच होते, जेव्हा त्यांच्यावर कोणत्याही कामाचा खूप ताण असतो किंवा त्यांच्यावर ते काम करण्यासाठी खूपच दबाव आणला जातो. अशा गंभीर प्रकारात, व्यक्ति आतून पूर्णपणे तुटून जाते, आणि स्वत:ला जगापासून वेगळे करते. एकटे राहाणे पसंत करते. पण ही स्थिति कोणत्याही माणसासाठी गंभीर असू शकते. या परिस्थितीतून त्या व्यक्तिला जर वेळीच बाहेर काढले नाही, तर ती व्यक्ति आत्महत्या करू शकते, किंवा मनोरुग्ण बनू शकते.

नैराष्याग्रस्त असल्याची लक्षणे: नैराष्यग्रस्त असल्याचे लक्षण दुसर्‍या व्यक्तिला सहजपणे समजत नाही. नैराष्यग्रस्त झाल्यावर व्यक्तिमध्ये ही लक्षणे दिसू लागतात. नेहमी गप्प गप्प राहणे, मनात काहीतरी विचार करीत सारखे स्वत:ला अपराधी मानणे, अचानक कोणत्याही प्रकारची नशा करायला सुरुवात करणे. घाबरणे व बेचैन होणे, स्मरणशक्ती कमी होणे, जरूरीपेक्षा जास्त खाणे कोणत्याही गोष्टीत लक्ष न लागणे, कशातही मन न गुंतणे मनात सतत नकारात्मक विचार येणे, समाजात किंवा स्वत:च्या घरात लक्ष न लागणे, तसेच एकटे एकटे राहाणे. अंगदुखी बरोबर डोकेदुखीचा त्रास होणे.

नैराष्यातून सुटका: नैराष्यातून वाचण्याचे काही उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला वरील दिलेल्या लक्षणांपैकी कोणतेही लक्षण आढळले, तर नैराष्यातून वाचण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता: नेहमी हे लक्षात ठेवा, तुमच्या कामाच्या दडपणात दुसर्‍या कोणत्याही व्यक्तिला आणू नका. तर आपले काम स्वत:च आरामात करीत राहा. नैराष्यातून सुटका होण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे तो म्हणजे व्यायाम किंवा कोणतेही संगणक कार्य. त्यासाठी थोडा वेळ काढा आणि व्यायाम करा. पराभव स्वीकारून बसून राहू नका तर आपले प्रयत्न निरंतर चालू ठेवा.

नैराष्यात सगळ्यात उत्तम उपाय आहे, की तुम्ही तुमची तुलना दुसर्‍या कोणाशीही करू नका, स्वत:वर प्रेम करा, दुसर्‍या कोणाशी स्वत:ची तुलना करू नका. कधीही कोणत्याही कामात असफलता मिळाली, तरी निराश होऊ नका, विरुद्ध पक्षाला आपल्यावर विजय मिळवू देऊ नका. असफलतेतून काहीतरी शिका आणि त्यातूनच पुढची सुरुवात करा.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *