झुरळापासून कायमची सुटका मिळवायची आहे, तर करा हे घरगुती सोपे उपाय…

झुरळंपासून घरातील प्रत्येक महिला त्रस्त असते. घरातील ओलावा असणाऱ्या जागेवर विशेष करून स्वयंपाक घरामध्ये झुरळ आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यापासून वाचण्यासाठी आजकाल बाजारामध्ये अनेक औषधे आणि कीटकनाशके उपलब्ध आहेत ,ज्यांचाद्वारे तुम्ही झुरळांचा नायनाट करू शकता. असा दावा केला जातो परंतु रासायनिक पदार्थ असल्याने त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशातच घरगुती उपचार आपल्याकरिता लाभदायक ठरतात. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमच्या घरातील झुरळ लवकरच नष्ट होतील आणि तुम्हाला झुराळंपासून कायमची मुक्तता मिळेल.

कॉफी फक्त चविलाच लाजवाब नसते तर त्याचा वापर तुम्ही झुराळंपासून मुक्तता मिळण्याकरिता सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये कॉफीचे काही दाणे ठेवायचे आहे आणि ती प्लेट किंवा वाटी अशा ठिकाणी ठेवा, जेथे झुरळ यांचा वावर जास्त असतो.

तेजपत्ताच्या सुगंधामुळे झुरळ, डास सारखे कीटक घराच्या बाहेर निघून जातात. याच्या वापरामुळे तुम्हाला तेजपत्ता चे काही पाने तुम्हाला जळवायचे आहेत आणि नंतर घरातील ज्या कोपऱ्यांमध्ये झुरळ यांचा वावर जास्त असतो अशा ठिकाणी पानांना ठेवावे. लवंगाच्या वासाने दूर पळतात. अशातच लवंग घरातील मोकळ्या जागेवर ठेवा त्यांच्या सुगंधाने झुरळ दूर पळतील.

ताज्या पुदिन्याच्या पानांना पिशवीमध्ये किंवा पेपर मध्ये ठेवून ती पिशवी अशा ठिकाणी ठेवा, जेथे झुरळ जास्त दिसतात. असे केल्याने काही दिवसातच झुरळ पळून जातील. झुराळंपासून वाचण्याकरीता घरातील प्रभावित जागेवर बोरेक्स पावडर चा शिडकाव करा. शिडकावा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, ही पावडर विषारी असते म्हणून लहान मुलांच्या संपर्कात न येता हे कार्य करावे.

बेकिंग पावडर आणि साखर यांचे मिश्रण सुद्धा झुरळ पळवण्यासाठी लाभदायी ठरते. यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये योग्य मात्रा मध्ये दोघांना मिक्स करायचे आहे आणि तिथे ठेवायचे आहे. खरं तर तुम्हाला दहा दिवसानंतर हे मिश्रण बदलावे लागेल कारण नरम झाल्या कारणामुळे सोडाचा असर आणि वास संपून जातो.

अंड्याचे कवच हे झुरळ आणि पाल पळवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला अंड्याचे कवच किचन तसेच ओलसर जागी ठेवणे गरजेचे आहे. असे केल्याने झुरळ लवकरच पळून जातील. रॉकेल ने सुद्धा झुरळ पळून जातात. तुम्ही याला सिंक किंवा ओलावा असणाऱ्या जागेत सुद्धा टाकू शकता. हा, परंतु याचा वास खूपच उग्र असतो म्हणून याचा उपयोग संभाळून करणं गरजेचं आहे.

तुम्हाला ऐकण्यास विचित्र वाटू शकते परंतु रेड वाइन ने सुद्धा झुरळ पळून जातात. हो या साठी तुम्हाला एका वाटीमध्ये एकतृतीयांश रेड वाईन टाकून ज्या ठिकाणी ठेवायचे आहे जेथे झुरळ यांचा वावर जास्त असतो.

हे सारे घरगुती उपाय केल्यास लवकरच तुमच्या घरातील झुरळ दूर पळून जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होईल म्हणूनच आपल्या स्वयंपाक घरामध्ये काम करत असताना कुठेही खरकटे पदार्थ किंवा ओलावा राहणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो आम्ही अशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *