फक्त वडी आणि भजी बनवविण्याकरीता नाही अळूची पाने, हे आहेत खूप सारे फायदे!

भजी च्या नावावर आपल्याला कांदा, बटाटा, वांगी आणि कोबीची भजी यांची आठवण होत असेल परंतु एक भजीची आठवण करून देणारी काही पाने आहेत. या पानांचा उपयोग आपण वडी करण्याकरिता करतो . हो , त्याचं नाव आहे आळूची पाने. या पानांची भाजी तसेच वडी, भजी सुद्धा बनवली जाते . बेसनाच्या पिठामध्ये मिसळलेली वडी खूपच
स्वादिष्ट आणि चविष्ट असतात.

आळूच्या पानामध्ये जीवनसत्व अ,ब ,क पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात . हे शरीरासाठी खूप फायदेमंद असतात . आतापर्यंत जर तुम्ही वडी आणि भाजी करीता या पानांचा उपयोग करत असाल तर या पानाचे प्रमाण तुमच्या जेवणामध्ये वाढवा . आपणास सांगू इच्छितो की आळूची पाने कशाप्रकारे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.

ऍसिडिटी( अपचन) मध्ये लाभदायक : पोटामध्ये गॅस आणि अपचनाची समस्या साधारणतः जेवण झाल्यानंतर होते ,अशातच आळूच्या पानांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. यासाठी या पानांना गरम पाण्यामध्ये उकळून घ्या ,आता या पाण्यामध्ये थोडेसे तूप मिसळून तीन दिवसापर्यंत कमीत कमी तीन वेळा प्या. यामुळे तुमच्या पोटातील अपचनाची समस्या कमी होईल.

डोळ्यांची दृष्टी वाढवते. आळुच्या पाण्यामध्ये जीवनसत्व क खूप प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. हे जीवनसत्व तुमचा डोळ्यांसाठी खूप लाभदायक असते . जर तुम्ही आळूच्या पानांचे सेवन करत आहात तर यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढेल .एवढेच नाही तर तुमच्या शरीरातील मांस पेशी सुद्धा अधिक मजबूत होतील .जर नियमितपणे आळूच्या पानांचे सेवन केले गेल्यास तुम्हाला मायोपिया ,आंधळेपण आणि मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या समस्या त्यापासून लवकरच मुक्तता मिळेल.

सांधेदुखी : वाढत्या वयाप्रमाणे साधारणतः लोकांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण वाढू लागते .जर तुम्हाला नेहमी सांधे दुखीचा त्रास होत असेल तर प्रत्येक दिवशी आळूच्या पानांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. यामुळे तुम्हाला सांधेदुखीच्या वेदनेपासून आराम मिळेल.

ब्लड प्रेशर ला नियंत्रित करते : ब्लडप्रेशर ही समस्या सर्वसाधारणपणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहायला मिळते .जरी हा सर्वसामान्य आजार असला तरी त्याचे परिणाम मात्र गंभीर आहेत . शरीरातील ब्लड प्रेशर वाढल्यास हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो. अशामध्ये आळूची पाने तुमच्या ब्लडप्रेशर ला नियंत्रणामध्ये ठेवते . खरंतर आळूच्या पानामध्ये ओमेगा ३, फॅटी अॅसिडस असते, जे ब्लडप्रेशरला नियंत्रणात ठेवते.

वजन कमी करते : जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास, तर तुमच्या आहारामध्ये आळूच्या पानांचा समावेश नियमितपणेे करा.या पानांमध्ये फायबर उपलब्ध असते , जे मेटाबोलिजम सक्रिय बनवते आणि यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. खरे तर जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास आळुच्या पानाच्या वड्या नियमितपणे खा.

हे आहेत तोटे : अळूच्या पानांचा वापर करण्याबद्दलचे फायदे तर आहेतच पण याचे काही तोटे देखील सुद्धा आहेत. कच्ची आळूच्या पानांचा आहारामध्ये वापर केल्यास यामुळे तोंडाला खाज आणि जळण होण्याची शक्यता असते. अर्ध शिजलेले आणि कच्चे आळुचे पान हे विषारी सुद्धा ठरू शकते . गंभीर आणि खुली असलेल्या जखमेवर जर आळूच्या पानांची पेस्ट लावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील तसेच आळूची पाने कॅल्शियम सोबत कधीही सेवन करू नये.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *