अनिल अंबानी सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात डुबलेले आहेत आणि त्यांच्यावर लंडनच्या कोर्टात खटलाही चालू आहे. अनिल अंबानी यांनी अनेक चिनी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि आता ते हे कर्ज परत करण्यास ते असमर्थ आहेत. एका अहवालानुसार, अनिल अंबांनींवर निर्यात व आयात बँक आणि डेवलपमेंट बँक ऑफ चाइना यांचे ७१६ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ५,२७६ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ह्याच कर्जासाठी या बँकांनी त्यांच्यावर केस दाखल केली आहे. लंडनच्या कोर्टाने त्यांना कर्ज फेडण्यासाठी जूनपर्यंत मुदत दिली होती.
पण यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडे काहीही शिल्लक नसल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले असून ते दागिने विकून वकीलांची फी भरत आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की अनिल अंबानी ज्या घरात राहतात त्या घराची किंमत ५ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. होय, त्यांच्यावर जेवढे कर्ज आहे, त्यापेक्षा जास्त किमतीचे त्यांचे घर आहे.
धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी हे घर अतिशय शानदार पद्धतीने बनवले आहे. २०१८ मध्ये, वित्तीय सेवा कंपनीने आईआईएफएल (IIFL) यांनी भारतातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत अनिल अंबंनींच्या घराला दुसरे स्थान दिले आहे. तर त्याचा भाऊ मुकेश अंबानी यांच्या घराला या यादीत प्रथम स्थान मिळाले आहे.
अनिल अंबानी यांचे हे घर मुंबईत असून या घरात फक्त चार लोक राहतात. जे आहेत, अनिल, टीना मुनिम, त्यांची दोन मुले अनमोल आणि अंशुल अंबानी. अनिल अंबानींच्या घरात जे सजावटीचे सामान आहे, त्याची किंमत कोटींची आहे. त्यानी परदेशातील इंटिरियर डिझायनर्सना पाचारण करून आपले घर सजविले आहे.
त्यांनी मुंबईतील पाली हिल भागात आपला बंगला बांधला आहे. अनिल अंबानी यांचे घर १०,६०० स्क्वेअर फूट मध्ये बांधलेले आहे आणि घरात जिम, स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत.

त्यानी आपल्या घराच्या छतावर हैलिपॅडही बांधले आहे. असे म्हणतात की त्यांना हे घर आणखी उंच बनवायचे होते. परंतु त्यांना तसे करण्यास अधिकार्यांची परवानगी मिळाली नाही.

त्यांच्या घरात बरेच हॉल आहेत आणि ते अतिशय सुंदर प्रकारे सजवलेले आहेत. अनिल अंबानी यांच्या या घराच्या देखभालीचा खर्चही खूप जास्त आहे. त्यांच्या या घरात त्यांचे डझनभर कर्मचारी आहेत. ज्यांना दरमहा लाखोचे पगार दिले जातात.

असे म्हणतात की, त्याच्या घराचे विजेचे बिल ६० लाख रुपयांपर्यंत येते. त्याचवेळी जेव्हा त्याच्या घराच्या खर्चाचा मुद्दा कोर्टात उपस्थित झाला, तेव्हा त्यानी कोर्टात सांगितले की त्यांच्या घरचा खर्च त्यांची पत्नी करीत आहे.