आजच्या काळामध्ये लोक इतके व्यस्त झाले आहेत की , स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी सुद्धा ते देऊ शकत नाही. या कारणामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढे सुद्धा वेळ नाही की ते आपल्या खाण्यापिण्याचे लक्ष ठेवू शकतील . व्यक्तीला आपले आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी संतुलित आहाराची सर्वात जास्त गरज भासते. जे आजच्या काळामध्ये शक्य होत नाही या कारणामुळे ९० टक्के पेक्षा जास्त लोकांना पोटाच्या समस्या उद्भवतात आणि या समस्येमुळे त्रस्त होतात
आजच्या काळामध्ये पिकांची वाढ होण्याकरिता त्यांवर वेगवेगळे कीटकनाशकांची फवारणी केली जाते आणि अनेक औषधांचे प्रयोग सुद्धा केले जातात. त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, आधीच्या काळामध्ये जैविक पद्धतीने शेती केली जात असे. या कारणामुळे त्या काळातील लोकांचे आरोग्यसुद्धा स्वस्थ आणि मस्त असायचे आणि त्यांना शारीरिक समस्या सुद्धा कमी प्रमाणात व्हायच्या. आज ऑफिसमध्ये काम करणारे अधिकाधिक लोकांना अधिक वेळ बसून राहण्याची सवय असते ,ज्यामुळे जेवणाचे पचन योग्य पद्धतीने होत नाही म्हणूनच आजच्या पिढीतील अनेक तरुणांना पोटाच्या समस्या निर्माण होतात.
अधिक तर पोटात गॅस वाढल्याची समस्या लहान आतड्यांमध्ये गॅस या कारणांमुळे होत असते. पोटामध्ये गॅस हा धूम्रपान, अल्सर , शरीरातील पाण्याचा स्तर कमी झाल्याने व खोकल्या सारख्या समस्या मुळे वाढतो.या कारणामुळे अन्य व आरोग्य संबंधी समस्या निर्माण होतात परंतु काही गोष्टींचं जर योग्य पद्धतीने ध्यान ठेवल्यास या समस्यांचे समाधान लवकरच आपल्याला मिळते ,ज्यामुळे पोटातील गॅस समस्याचे लवकरच उपचार होऊ शकते.
जर तुम्ही पोटातील गॅसच्या समस्याने त्रस्त असाल तर अशावेळी पोटाच्या वरच्या भागावर दोन ते तीन मिनिट क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज पद्धतीने मसाज करा. यानंतर हीच प्रक्रिया पोटाच्या खालच्या भागावर करा . असे केल्याने पोटातील गॅस ची समस्या पासून तुम्हाला मुक्तता मिळेल.
पोटातील गॅस दूर करण्यासाठी बेकिंग सोडा सुद्धा एक चांगला पर्याय आहे अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग सोडा मिसळा यामध्ये लिंबूचे काही थेंब टाकून ते मिश्रण प्या, असे केल्याने पोटातील गॅस लवकरच दूर होईल आणि पोटाच्या समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळेल.
पोटातील गॅस समस्यांचे समाधान करण्यासाठी हे आहेत काही घरगुती उपचार : एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाकून चांगल्या पद्धतीने उकळावे, जेव्हा पाणी चांगल्या पद्धतीने कळेल तेव्हा ते पाणी गाळून कोमट करून प्यावे.
एक चमचा अदरकच्या रसामध्ये थोडेसे मध मिसळून त्यामध्ये लिंबूचे काही थेंब टाका. आता त्याचे सेवन करा, यामुळे पोटातील गॅस ची समस्या दूर होईल.
एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा तसेच एक चिमूटभर मीठ मिसळा आणि यामुळे पोटातील गॅस दूर करण्यासाठी सहाय्यता होईल. नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!