दुसर्‍या मुलीला जन्म दिल्यानंतर रडू लागली ईशा देओल, कारण समजल्यावर हेमा मालिनीला देखील धक्का बसला….

बॉलीवुडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक उत्तम अशा फिल्म्समध्ये काम केले. फिल्म्सच्या शिवाय ती आपल्या पर्सनल जीवनात पण बरीच चर्चेत राहिली आहे. त्यांची मुलगी ईशा देओलने पण आपल्या आईप्रमाणे फिल्म्समध्ये स्वत:चे स्थान बनवायचा प्रयत्न केला, परंतु, नशिबाने तिला संधि नाही दिली. त्यानंतर, ती एका उद्योगपतीशी लग्न करून संसारात स्थिरावली. तिला पहिले अपत्य मुलगी झाली आणि तिला जेव्हा दुसरी मुलगी झाली, तेव्हा तर ईशा देओल रडायला लागली आणि तिच्या मनातील गोष्ट फक्त हेमा मालिनीने समजून घेतली.

१० जून २०१९, या दिवशी ईशा देओलने दुसर्‍या मुलीला जन्म दिला. ईशाच्या दुसर्‍या मुलीचे नाव मिराया तख्तानी आहे. आजकाल ईशा आपल्या आईपणाचा आनंद घेत आहे, आणि त्याचबरोबर पुस्तके पण लिहिते आहे. अभिनेत्री बरोबरच ईशा एक लेखिका आहे. आत्ताच, ईशाचे पुस्तक ‘अम्मा मिया’ प्रकाशित झाले आहे.

पहिली मुलगी, राध्याच्या नंतर ईशाने जेव्हा दुसर्‍या मुलीला जन्म दिला, तेव्हा ती एका आजाराने ग्रासली, ज्यामुळे ती दिवस रात्र रडत होती आणि देवाकडे मला लवकर बरे कर अशी प्रार्थना करीत होती. या बाबतीत ईशाने एका गप्पांच्या कार्यक्रमात सांगितले, की ईशा देओल ज्या आजाराने ग्रासली होती, त्या आजारचे कारण हार्मोंसच्या उतार-चढ़ाव हे होते.

लोक याला “पोस्टमार्टम डिप्रेशन” असेही म्हणतात. या आजारात माणसाचा मूड सारखा-सारखा बदलत राहातो आणि ईशा या आजाराची शिकार झाली होती. या बाबतीत ईशाला माहीत नव्हते. परंतु, ईशाच्या म्हणण्यानुसार तिची आई हेमा मालिनी यांच्या हे लक्षात आले आणि त्याचे गांभीर्य कळावे, म्हणून त्यांनी ईशाच्या रक्ताची चाचणी करावयास सांगितली.

या संदर्भात ईशाने पुढे सांगितले, “ मी आईचा सल्ला ऐकला, आणि रक्ताची चाचणी करून घेतली. त्यानंतर, मी एका महिन्यात बरी झाले होते. अशीच परिस्थिति माझ्या दुसर्‍या मुलीच्या जन्माच्या वेळी झाली होती , परंतु, आईने माझा त्रास ओळखला आणि माझी साथ दिली”.

तुमच्या माहितीसाठी सांगतो, ईशा देओल प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. ईशा देओलने सन २०१२ मध्ये उद्योगपती भरत तख्तानी यांच्याबरोबर लग्न केले. ईशाने आपल्या करियरची सुरुवात २००२ मध्ये “कोई मेरे दिल से पूछे” या फिल्मने केली. पण, ही फिल्म बॉक्स-ऑफिस वर वाईट पद्धतीने फ्लॉप झाली.

पण ईशाने हार मानली नाही, आणि त्यानंतर, “तुम जानो ना हम”, “एलओसी”, कारगिल”, “क्या दिल ने कहा”, “कुछ तो है” आणि “चुरा लिया है तुमने” अशा फिल्मस मध्ये काम केले आणि ह्या सगळ्या फिल्म्स हिट नाही झाल्या. तिने नो एंट्री, युवा, धूम, टेल मी ओ खुदा, काल, दस, क्या दिल ने कहा, शादी नं 1, इंसान यासारख्या कितीतरी बॉलीवुड फिल्मस मध्ये काम केले आहे.

सन २००४ मध्ये फिल्म धूम केली ज्यामध्ये जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, उदय चोपड़ा अशा सितार्‍यांनी काम केले होते. फिल्म सुपरहिट झाली आणि ईशाला पुढेही काम मिळाले. सन २०१० मध्ये ईशाने सलमान खान बरोबर फिल्म टैल मी ओ खुदा केली, पण ही फिल्म पण फ्लॉप झाली. मग मात्र ईशाने बॉलीवुड करियर सोडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *