उन्हाळ्याच्या दिवसात कितीतरी प्रकारच्या समस्या बघायला मिळतात, ज्यामध्ये खरूज आणि नायटा असतात. त्वचेवरील नायटा आणि खरूज एक असा आजार आहे, जे लोकांना दुसर्यांना सांगायला लाज वाटते. इतकेच नाही, जर तुम्ही त्याचा इलाज वेळेत नाही केला, तर तुम्हाला कितीतरी त्रासांशी झगडावे लागेल. खरूज भलेही दिसायला छोटी समस्या वाटते, पण ज्यांना ती होते, त्यांची परिस्थिति खूपच बिकट होते. चला तर मग जाणून घेऊया, आमच्या या लेखात तुमच्यासाठी काय खास आहे?
त्वचेवरील खरूज आणि नायटा हे त्वचेच्या रोगांपैकी एक आहे. जर आपण त्यापासून मुक्त होण्यासाठी खूप उपाय केले असतील, तर हा लेख शेवटपर्यंत वाचण्यास विसरू नका, कारण त्यातून मुक्त होण्यासाठी कोणता रामबाण उपाय आहे यांची तुम्हाला माहिती मिळेल. सहसा नायटा आणि खरूज हे अस्वछतेमुळे होते, परंतु काहीवेळा ते आनुवंशिक देखील असते. समजा तुमच्या आजी- आजोबांना हा आजार असेल, तर तो तुम्हालासुद्धा होऊ शकतो.
नायटा आणि खाज सुटण्याची लक्षणे: जर तुमच्या शरीरावर लाल रंगाचे चिन्ह दिसत असेल म्हणजेच पुरळ उठली तर ती खरूज असते. होय, बर्याचदा खरूज आणि खाज सुटणे जननेंद्रियामध्ये होते. जेव्हा तुम्हाला कोणत्याही जागी पुन्हा पुन्हा खाज सुटण्यास सुरूवात होते, आग व्हायला लागते, तेव्हा आपण समजले पाहिजे की आपल्याला त्वचेचा रोग झाला आहे. त्वचेवर डाग येतात, तर काहीवेळा त्याच्यासह मुरूम उद्भवतात, त्यांच्यात पू भरणे सुरू होते, जे लवकर बरे होत नाही.
जर तुम्ही नायटा आणि खरूज यापासून हैराण असाल, आणि तुम्ही परत परत त्याच्यावर उपचार करीत असाल, परंतु, ते परत होत असेल, त्यामुळे तुम्ही जास्तच हैराण असाल, तर आज आम्ही तुम्हाला यासाठी उत्तम असे उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला या त्रासापासून मुक्ति मिळेल. चला तर मग, जाणून घेऊया काय आहेत ते उपाय?
१. जर तुम्ही परत परत नायटा ह्या त्वचारोगाने हैराण असाल, तर चन्दनाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून जेथे नायटा झाले आहे, तिथे ६ ते ७ वेळा लावा, नंतर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
२. कडुलिंबाची पाने घ्या आणि चटणीप्रमाणे बारीक वाटा, त्यानंतर ती पेस्ट जिथे नायटा झाला आहे, त्या जागेवर १० मिनिटे लावा. येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे, आपण आपला पलंग पूर्णपणे स्वच्छ ठेवा.
३. प्रथम नायटा स्वछ करा, त्यानंतर त्यावर लिंबाचा रस लावा. परंतु हे लक्षात घ्या, की लिंबाचा रस इतकाच लावा, जितका तुम्ही सहन करू शकता म्हणजे आपण मध्ये थोडे थांबून, ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करावी.
जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…