देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुलीचे लग्न १२ डिसेंबर २०१८ मध्ये पिरामल ग्रुपचे मालक आनंद निर्मल यांच्याबरोबर झाले. लग्नात ७५० करोड रुपये खर्च झाले. लग्नानंतर, काही दिवसातच ईशाने एका वार्तापत्रात आपल्या पतीच्या कितीतरी गोपनीय गोष्टी जगासमोर आणल्या. या मुलाखतीत तिने सांगितले, लग्नानंतर त्यांचे जीवन कसे चालू आहे. ईशाने सांगितले, त्या दोघांचे स्वभाव एकदम वेगळे आहेत. ईशाने सांगितले की, आनंद आपला जास्तीत जास्त वेळ कामात व्यस्त असतात. त्यांना पार्ट्यांमध्ये जाणे अजिबात पसंत नाही.
तर ईशाला पार्टयांमध्ये भाग घ्यायला आवडते, त्याचबरोबर काम करणे पण आवडते. स्वभावात जरी फरक असला, तरी काही गोष्टी दोघांनाही आवडतात. त्यांना दोघांनाही खायची-प्यायची आवड आहे. ते दोघेही काही खास खायचे असेल, तर बाहेर जातात. आनंदला डांस करणे अजिबात आवडत नाही. परंतु, आनंदने लग्नात फक्त ईशासाठी डांस केला होता. ते दोघेही आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवण्याचा आनंद घेतात.
आनंद ईशाला आपली मैत्रीण मानतात. आनंदला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल यांचे लग्न शानदार व धुमधडाक्यात झाले. पिरामल ग्रुपचा मुलगा आनंद पिरामल यांचे लग्न देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ति मुकेश अंबानी यांच्या एकुलत्या एका मुलीबरोबर म्हणजेच ईशा अंबानी बरोबर झाले.
त्यांचा साखरपुडा, २३ सप्टेंबर रोजी इटली येथील लेक कोमोमध्ये झाला होता. हा सोहळा प्रेक्षणीय तर होताच, पण ३ दिवस चालला होता. लग्नात कितीतरी सितारे आणि प्रसिद्ध व्यक्ति आणि कितीतरी हॉलीवूड तसेच बॉलीवूडच्या सितार्यांनी हजेरी लावली होती. या लग्नात बियोक वाईने पण प्रदर्शन केले आणि हे लग्न केवळ आपल्या देशातच नाही तर दुनियेतील सगळ्यात महाग व श्रीमंत लग्न होते. साधारण ७५० करोडोचे हे लग्न होते.
हे लग्न १२ डिसेंबर २०१८ मध्ये झाले होते. हे लग्न मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या एंटीलिया या घरी संपन्न झाले. लग्नाच्या अगोदर अंबानी आणि पीरामल यांनी आपल्या परिवारांसोबत डिनर उदयपुरमध्ये ठेवले होते. डिनर पार्टीसाठी राजस्थान कल्चर निवडण्यात आले होते.
या लग्नाची सुरूवात होण्याअगोदर अंबानी दाम्पत्य आणि कोकिलाबेन हे सर्व सिद्धिविनायक मंदिरात गेले होते आणि त्यांनी सर्वात प्रथम बाप्पाच्या चरणी आपली पत्रिका अर्पण केली होती. अशीही हिंदू धर्मात आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजेनेच करतो.
ईशा अंबांनीच्या लग्नात शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अमीर खान तसेच मोठे मोठे सेलेब्रिटी पंगत वाढताना दिसले. त्यांचे हे विडियो सोशल मीडियावर खूपच फिरत होते. काही लोकांनी याबाबतीत सेलिब्रिटींना ट्रोल पण केले.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.