नवरा बायकोने सोशल मीडियावर या चुका कधीच करू नयेत, आजच जाणून घ्या नाहीतर….

मागच्या काही काळापासून सोशल मीडियाचा प्रसार इतका जास्त वाढला आहे, की आपण एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्याऐवजी या माध्यमाचा नको तितका वापर करायला लागलो आहोत. आपल्याला आता समोरासमोर बसून बोलायची किंवा भेटायची जरूर वाटत नाही. सर्वच लोक सोशल मीडियावर एक्टिव राहूनच आपल्या मनातील गोष्टी दुसर्‍यांबरोबर शेअर करतात व त्यांच्या मनातील जाणून घेतात.

या मीडियाच्या सुरुवातीच्या काळात फक्त युवा वर्गच याचा वापर करत होता, पण आता बघता बघता प्रत्येक वयाची माणसे यात ग्रुप बनवून सामील झाली आहेत. लहान मुलेसुद्धा हल्ली सोशल मीडियाचा वापर करू लागली आहेत. तंत्रज्ञान असे असते, की हळूहळू मार्गक्रमण करते. तंत्रज्ञानाचे जे रूप समजायला सोपे असते, ते सर्व वयोगटातील लोक लवकर आत्मसात करतात. असेच काहीसे सोशल मीडियाच्या संदर्भात म्हणता येईल. हे लोकांनी कमी कालावधीत आत्मसात केले आहे.

आपल्या आयुष्यात छोट्याश्या बाळाचं आगमन झाल्यावर कसं वाटतं, या क्षणापासून मुलाचा शाळेचा पहिला दिवस इथपर्यंत सारं काही हल्लीची पिढी सोशल मीडियावर शेअर करते. पण ब-याचदा या गोष्टीवरुन नवरा-बायकोमध्ये मतमतांतरे आढळून येतात. जर तुम्हीही तुमच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे शेअर करत असाल तर थांबा..! असं करण्याआधी काही नियम स्वत:चे स्वत:च बनवा आणि काय काळजी घ्यावी असं करताना ते देखील जाणून घ्या. अन्यथा तुमच्या कर्माचे नकारात्मक परिणाम तुमच्या निश्पाप मुलाला भोगावे लागू शकतात.

हल्ली सोशल मीडियाचा वापर बहुतेक लोक करतात. त्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटे पण आहेत. सोशल मीडियावरील सगळ्याच गोष्टी खर्‍या असतात असे आपण सांगू शकत नाही. तथापि, सोशल मीडियाच्या काही चुकीच्या सवयींमुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. परंतु यामुळे आपल्याला जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे. बर्‍याच लोकांना त्यांच्या ऑनलाइन मित्रांना आपल्यासंबंधी माहिती देऊन अद्ययावत ठेवायचे असते.

परंतु आपल्याला जर असे वाटत असेल की आपला जोडीदार आवश्यकतेपेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय आहे, तर आपण सावधगिरी बाळगणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला काही संशयास्पद आढळल्यास त्या विषयावर आपल्या जोडीदाराशी नक्की बोला.

जर आपल्या जोडीदारास त्याच्या भूतकाळातील व्यक्तीचा पाठलाग करण्याची वाईट सवय असेल, तर एकतर तो आपल्या भूतकाळातून पूर्णपणे बाहेर पडला नाही किंवा त्याला आता आपल्यामध्ये गोडी किंवा रस राहिलेला नाही. या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी घातक आणि वाईट आहेत.

कधीकधी प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर जोडीदाराशी संबंधित पोस्ट शेअर करणे ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. परंतु सोशल मीडियावर एकमेकांबद्दलच्या गोपनीय गोष्टी जास्त प्रमाणात शेअर करणे चुकीचे आहे. जर तुमच्या जोडीदाराला खरोखरच तुमची काळजी असेल, तर तो तुमच्या खासगी आयुष्याची व गोपनीय गोष्टींची नक्कीच काळजी घेईल.

आपण आपल्या जोडीदारावर जर संशय घेत असाल; आणि जर तुम्हाला त्यांच्या ऑनलाइन अॅक्टिविटीबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर शोध इंजिनचे बटन आपल्याला मदत करू शकते. जर तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करीत असेल, तर त्याचा शोध विभाग हा इतर लोकांच्या नावाने भरला असेल. विशेषतः, त्यामध्ये असे लोक असतील जे तुमच्या जोडीदारास मनापासून पसंत करतात.

जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *