बॉलीवुडच्या ह्या 3 अभिनेत्रींनी केले होते पळून जाऊन लग्न, कारण जाणल्यावर दंगच व्हाल….

मित्रांनो, जसे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, की बॉलीवुडमध्ये असे बरेच अभिनेता आणि अभिनेत्री आहेत, जे एकमेकांवर प्रेम करतात आणि लिविंग रिलेशनशिपमध्ये राहातात. परंतु, काही कारणामुळे त्यांच्या आई-वडीलानी त्यांचे हे नाते स्वीकार केले नाही. ज्यामुळे, त्यांना घरातून पळून जाऊन लग्न करावे लागते. तसे तर पळून जाऊन लग्न बॉलीवूडमध्ये खूपच कमी अभिनेत्यांनी केले आहे. पण यामध्ये काही खास अभिनेते आहेत, ज्यांच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला मग, आम्ही तुम्हाला अशा काही तारे-तारकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते.

आमिर खान आणि रीना दत्ता : तुमच्या माहितीसाठी सांगतो, की रीना आमिर खानच्या शेजारी राहत होती. आमिरनी २१व्या वर्षीच तिला प्रपोज केले होते. एवढेच नाही, तर आमिर खानने आपल्या स्वत:च्या रक्ताने लिहिलेले प्रेम-पत्र तिला दिले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. परंतु, दोघांचाही धर्म वेगवेगळा होता.

म्हणूनच, परिवारातील सदस्य या लग्नाच्या प्रस्तावामुळे खुश नव्हते. त्यांना हे लग्न मान्य नव्हते. अशा वेळी, आमिर खान आणि रीना यांनी पळून जाऊन लग्न केले. काही वर्षांनंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला आणि आमिर खानने किरण राव बरोबर दुसरे लग्न केले.

गुरमीत चौधरी आणि देबिना बनर्जी : तुमच्या माहितीसाठी सांगतो, की रामायण या मालिकेतील प्रसिद्ध जोडी गुरमीत चौधरी और देबिना बनर्जी या दोघांनी २०११ मध्ये जरी लग्न केले होते, तरी बर्‍याच कमी लोकांना ह्याची माहिती आहे, की या दोघांनी २००६ मध्ये घरातून पळून जाऊन गुपचुप लग्न केले होते.

गुरमीत चौधरी यांचा जन्म २२ फेब्रुवरी, १९८७ मध्ये बिहार मधील भागलपुर येथे झाला होता. ते टीव्ही अभिनेता आहेत त्याचबरोबर ते डांसर आणि मार्शल आर्टिस्ट पण आहेत. याच बरोबर गुरमीत यांची “सेक्सिस्ट एशियन मैन अलाइव” या स्पर्धेच्या अग्रभागी असलेल्या १० स्पर्धकांच्या यादीमध्ये गणना झाली होती. ते या यादीत ८ व्या क्रमांकावर होते. त्यावेळी दोघांचे वय फक्त १९ आणि २० वर्षे असे होते. त्यांनी आपल्या परिवाराला याबाबत काहीही सांगितले नाही आणि मित्रांच्या मदतीने गावातल्या मंदिरात लग्न केले होते.

शशि कपूर आणि जेनिफर केंडल: तुम्हाला सांगतो, की शशि कपूर आणि जेनिफर केंडल या दोघांनीसुद्धा पळून जाऊन लग्न केले होते. त्यावेळेस जेनिफर नाटकात काम करीत होती, तेव्हा त्यांची भेट शशि कपूर बरोबर झाली होती. लवकरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जेनिफर दुसर्‍या धर्माची होती. म्हणून, त्यांचा परिवार शशि कपूरशी लग्न करण्यास नकार देत होता. तेव्हा, त्या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *