तुम्ही सगळेच जाणता की, आपल्याला जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आपले स्वास्थ्य उत्तम असणे खूपच जरूरी आहे. त्यासाठी शरीराचा प्रत्येक भाग तंदुरुस्त असला पाहिजे. जर आपण, दातातील किडीबद्दल बोलत असू, तर आजकाल ही समस्या बर्याच लोकांमध्ये दिसून येते. काही लोक आपल्या आवडीचे पदार्थ खायलादेखील घाबरतात.
दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे. त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते. त्याच्या वेदांनांनी आपली मानसिक अस्वस्थता वाढते. यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर घेतात. पण हा झाला तात्पुरता उपाय. यामुळे दातातील कीड मरत नाही व थोडे दिवसांनी तो परत दुखायला लागतो. यावर आपल्याकडे घरगुती उपाय आहेत. तर, आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सुचवणार आहोत, जे केल्यामुळे तुमच्या दातातील कीड कायमची नष्ट होईल. बघा तर मग, कोणते आहेत ते उपाय?
तुळशीचे पान आणि कापुर: जर तुमचा दात थोडासा दुखत असेल, तर तुळशीचे एक पान, आणि पूजेसाठी जो कापुर वापरतो तो घ्या. मग कापूर आणि तुळशीचे पान हातात घेऊन दोघांचा चुरा करा, एकत्र करून एक लाडूसारखे बनवा, म्हणजे तो तुमच्या दातात राहू शकेल. मग तो छोटा लाडू जिथे तुमचा दात दुखत आहे, त्या जागी ठेवा. लक्षात असुदे, की लाडू तेवढ्याच आकाराचा बनवा, जो तुमच्या दातात राहू शकेल. हा उपाय केल्याने तुम्हाला दातदुखीपासून लवकर आराम मिळेल.
लवंग तेल वापरा: जिथे दातात दुखत असेल, किंवा कीड लागली असेल, तिथे तुम्ही लवंगेचे तेल कापसाच्या बोळ्यावर शिंपडा आणि ते लावा व थोडा वेळ लवंग तेलाला दातात राहू द्या. तेलाऐवजी तुम्ही लवंगेची पाऊडर वापरू शकता. तसेच, सुंठ पाऊडर पण या दुखण्यावर रामबाण उपाय आहे. मित्रांनो, ह्या उपायाने तुम्हाला दाताच्या वेदनेपासून आराम मिळेल. हे तुम्ही सतत केलेत, तर तुमच्या दातातील कीड निघून जाईल.
तुरटी: याचा दूसरा उपाय पण आहे. तुम्हाला अर्धा चमचा तुरटी पाऊडर करून, मोहरीच्या तेल थोडे कोमट करून त्यात तुरटी पाऊडर मिसळा व एक पेस्ट तयार करा. ती कीड लागलेल्या दाताला लावा. यामुळे सुद्धहा तुमच्या दाताच्या दुखण्याला आराम मिळू शकेल. तुमचे दाताचे दुखणे कमी होईल व सतत हा प्रयोग केला, तर दातातील कीड कायमची नाहीशी होईल.
आले: दात दुखत असल्यास, आल्याचा लहान तुकडा चघळत राहा, आल्याचा जो रस निघेल, तो दुखणार्या दाताकडे लावण्याचा प्रयत्न करा. आल्यामध्ये असलेल्या जंतूंनाशक घटकांमुळे तुमच्या दातात जर संसर्ग झाला असेल, तर त्यापासून तुम्हाला नक्कीच आराम पडेल. हा उपाय दिवसातून 2-3 वेळा करायला काही हरकत नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.