कंगना राणावतच्या बाबतीत खूपच कमी लोकांना माहिती आहेत या गोष्टी…

कंगना राणावत सध्याच्या काळात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या बेफिकीर टिपण्या आणि तिचा जमान्याशी टक्कर देण्याचा उत्साह पाहून काही लोक त्याचा संबंध राजकारणाशी जोडतात. पण तरीही तिच्या उत्तम अभिनयासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार व चार फिल्म फेयर अवार्ड जिंकलेली ही बॉलीवुडची ‘क्वीन’ तिच्या करीयरच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच बॉलीवुडच्या दिग्गजांशी पंगा घेत आली आहे आणि त्याच्याही आधी तिने स्वतःचा असा वेगळा मार्ग निवडला आहे आणि यशस्वी वाटचाल ती करत आहे.

२३ मार्च १९८७ ला हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात एका लहानशा कुटुंबात जन्माला आलेल्या कंगनाची आई आशा शाळेत शिक्षिका होत्या आणि वडील अमरदीप राणावत यांचा व्यवसाय होता. तिची लहान बहीण रंगोली बॉलीवुडमध्ये कंगनाच्या बरोबर आहे तर अनेकदा कंगनावर केल्या गेलेल्या अनेक टिप्पणी किंवा प्रतिक्रियांचे उत्तर रंगोलीच देते.

द्रोही स्वभावाच्या कंगनाला बंधने कधीच आवडली नाहीत. लहानपणी तिच्या भावाला बंदूक आणि तिला बाहुली दिली जायची तर ती ते घ्यायला नकार देत असे व या भेदभावाचा ती कडाडून विरोध करत असे. तिला तिच्या पद्धतीने जगणे आवडत असे. हा गुण तिने फिल्मी जगातही टिकवून ठेवला आणि ती प्रत्येक प्रकारच्या भेदभावाच्या विरोधात लढताना दिसली मग तो पैशांचा प्रश्न असो किंवा आणखी काही. तिच्या घरच्यांना तिला डॉक्टर बनवायचे होते आणि म्हणूनच ती चंदिगढच्या डीएवी शाळेत विज्ञान विषय घेऊन शिकत होती पण अचानक एक दिवस तिला जाणवले कि तिचा जन्म ह्यासाठी झालेला नाही व ती वयाच्या १६ व्या वर्षी दिल्लीला निघून गेली. तिच्या वडिलांना हे आवडले नाही आणि त्यांनी तिच्याशी नाते तोडले.

दिल्लीला काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर तिला अभिनय करायचा होता आणि ती अस्मिता थिएटर ग्रुपमध्ये गेली. तिने तिथे काही नाटकांत काम केले आणि तिकडे तिच्या अभिनयाची खूप तारीफ झाली. त्यानंतर ती मुंबईला गेली आणि आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिने कोर्स पूर्ण केल्यानंतर ती तिच्या स्वप्नांचा मार्ग शोधण्यात व्यस्त झाली.

तिला २००४ मध्ये अनुराग बासु दिग्दर्शित फिल्म ‘गैंगस्टर’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिचा पुढचा मार्ग सोपा झाला. नंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आणि या दुनियेचा एक भाग ती बनून गेली. नंतर २००८मध्ये ‘फैशन’ चित्रपटातून तिला खूप यश मिळाले आणि तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पडद्यावर किंवा मागे, कंगना कायम चर्चेत राहिली.

अफेयर्सच्या चर्चांनी तिला बॉलीवूडची कंट्रोवर्सी क्वीन बनवले. आम्ही तुम्हाला तिच्या ५ अफेयर्स बद्दल सांगणार आहोत जी खूप चर्चेत होती. आदित्य पंचोली ; मायानगरी मुंबई येथे कंगनाची आदित्यशी ओळख झाली. आदित्य विवाहित असून तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते पण तरीही त्यांचे सूर जुळले. बराच काळ ते एकमेकांबरोबर पती पत्नीप्रमाणेही राहिले पण असे म्हणतात कि तो तिला मारहाण करायला लागल्याने दोघांचे नाते संपले. अध्ययन सुमन ; आदित्य पंचोलीच्या ब्रेकप नंतर कंगनाची भेट ‘राज 2’च्या सेटवर शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन याच्याशी झाली आणि दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागले. 

अजय देवगन ; अध्ययन आणि कंगणाचे अफेयर संपल्यानंतर कंगनाने अजय बरोबर चित्रपट ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’मध्ये काम केले आणि त्याचवेळी त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली. निकोलस लाफर्टी ; सलग तीन अफेयर मध्ये धोका मिळाल्यावर कंगणाचे नाव निकोलस लाफर्टी नामक एका ब्रिटीश डॉक्टरशीही जोडले गेले. ऋतिक रोशन ; जेव्हा ऋतिक रोशन त्याची पत्नी सुझेन हिच्याशी घ ट स्फो ट होण्याची वाट पाहात होते त्याच वेळी त्याचे कंगनाशी अफेयर चर्चेत आले. कंगनाने हे उघडपणे कबूल केले की तिचे त्याच्याशी अफेयर आहे पण ऋतिकने या गोष्टीला नकार दिला.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *