तोंडात फोड येणे ही एक सामान्य समस्या आहे. बर्याच लोकांना हा त्रास होतो. वास्तविक तोंडातले फोड हे अपचन, पोटाचे विकार, उष्णता आणि हार्मोंस मधील बदल या कारणांमुळे होतात. याने खूप त्रास होतो, खाता पिताना त्रास होऊ शकतो, याने तुम्हाला दिवसभर अवस्थ वाटू शकते.
बरेचदा लोक यासाठी क्रीमचा किंवा औषधांचा वापर करतात ज्यामुळे तुम्हाला आराम तर पडतो पण ते पूर्णपणे बरे होत नाहीत आणि हे फोड तसेच बराच काळ राहातात. बराच काळ तोंडात फोड राहाणे हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जर तुमच्या फोडांतून रक्त निघत असेल तर हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो, अशा वेळी डॉक्टरकडे जाणे हाच योग्य मार्ग आहे. काही असे घरगुती उपाय आहेत जे करून तुम्ही या तोंडातील फोडांपासून मुक्ती मिळवू शकता. त्याआधी जाणून घेऊया असे फोड येण्यामागची कारणे काय आहेत ती:
१. जास्त मसालेदार जेवण केल्याने तुमचे पचन बिघडते आणि तोंडात फोड येतात. साधा आहार नेहमी योग्य असतो. २. जास्त गरम खाद्य पदार्थ पेय यांचे सेवन केल्यानेही तोंडात फोड येतात. ३. दातांची स्वच्छता नीट न केल्यास असे होऊ शकते आणि जास्त एसिडिक खाद्य पदार्थ खाल्यानेही असे होऊ शकते. ४. शरीरात विटामिन बी आणि लोह यांच्या कमीनेसुद्धा फोड येऊ शकतात. ५. एलर्जी असली पदार्थ खाल्ल्याने असा त्रास होऊ शकतो. ६. लहानशा तापानेसुद्धा तोंड येते, महिलांच्या मासिक पाळीच्या काळात उष्णतेने असे फोड येऊ शकतात.
तोंडातील फोडांवर रामबाण उपाय : १) मधात सरपण चूर्ण मिसळून त्याचा लेप फोडांवर लावल्यास फोड बरे होतात. लेप लावल्यावर लाळ बाहेर पडू द्यावी. २) अडुळसाची दोन तीन पाने चावल्याने फोडांवर परिणाम होतो. ३) लिंबू रस मधात मिसळून त्याच्या गुळण्या केल्याने तोंडातील फोड नक्कीच बरे होतात. ४) भरपूर पाणी प्यावे, त्याने तोंडातील फोड लवकर बरे होतात.
५) दिवसातून तीन ते चार वेळा ताकाने गुळण्या केल्यास बराच फरक पडेल. ६) जेवल्यावर गुळाचे सेवन केल्यास नक्की फरक पडेल. ७) रोझमेरी आणि फिटकरीची पावडर बनवून फोडांवर लावल्यास तोंडाचे फोड संपतात. ८) काथा व सरपण यांचे चूर्ण मधात उगाळून लावल्याने तोंडातील फोड नाहीसे होतात. ९) फोड्यांवर थंड पदार्थ ठेवल्याने फायदा होता. त्याठिकाणी बर्फ लावण्यास वेदना आणि सूज कमी होते.
तोंडात फोड येणे ही एक सामान्य समस्या आहे आणि घरगुती उपायांनी हे नक्कीच बरे होऊ शकतात तसेच उत्तम आहार आणि भरपूर पाणी यांमुळे तुम्हाला असे फोड कधी होणार नाहीत. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.