प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये नकारात्मक, टेंशन, दुःख, बेचैनी पाहायला मिळते, तुमच्याही मनात विनाकारण भीती निर्माण होते का? जर तुमचीही अशी नकारात्मक विचारसरणी बनलेली असेल, तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. तर चला अशा विचार सरणीवर काही उपाय पाहू…. तुमच्याच घरामध्ये अशा काही गोष्टी आहे, ज्या तुमच्या मानसिक त्रासाला जबाबदार ठरतात, व ही माहिती पूर्णता रियल फॅक्ट वर अवलंबून आहे यामध्ये कुठेही तुम्हाला जादूटोणा पाहायला मिळणार नाही तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
तुमच्या मनातील नकारात्मकता तुमच्या वास्तुवर वर ही अवलंबून असते, घरातील प्रत्येक व्यक्ती नकारात्मक बनत जातो, एकमेकांसोबत भांडणे होतात, प्रत्येक जण सतत नाराज पाहायला मिळतो, यासाठी काही उपाय पहा…. सर्वात पहिला उपाय आहे की, तुम्ही एक फुलांचा गुच्छ समोर घेऊन बघा त्यातील खूप सार्या फुलांचा समूह मनाला प्रसन्न करतो, मनामध्ये एक जिद्द निर्माण होते.
मनामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते, त्याचप्रमाणे दुसरा जर आपण एखाद्या कचऱ्याचा फोटो पाहिला ज्यामध्ये पुर्ण गावाचा कचरा पडला आहे, व घाणेरडा वास त्यातून अशा वातावरणात लोक देखील फिरत आहे, किती घाण व मन उदास करणारा तो फोटो आहे…. एखाद्या चित्रपटामध्ये कॉमेडी सीन सुरू असेल तर हसायला येतं, पण जेव्हा ब्रेकअप सीन किंवा इमोशनल सिन असेल, तेव्हा मात्र आपल्याला रडायला येत.. डोळ्यात पाणी येतं.. मन बेचैन होऊन उदास झाल्यासारखं वाटतं..
अगदी याच प्रमाणे आपण कायम रिएक्ट होतो, जे आपल्याला समोर दिसते त्याचप्रमाणे आपलं मन आतून अनुकरण करत असतं. जर घरी अस्वच्छता असेल, सर्वत्र घाण पाहायला मिळत असेल, सर्व वस्तू विस्कटलेले असतील, तर असे दृश्य पाहून मनात नकारात्मकता निर्माण होते, म्हणून नेहमी घर साफ ठेवणे व सर्व वस्तू योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे ठेवणे खूप गरजेचे आहे….
तुम्ही एखाद्या छोट्या दवाखान्यात किंवा मोठा हॉस्पिटल मध्ये गेला असणारच दरवाजातून आत पाय ठेवताच एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. व तो औषधांचा असून तो वास सर्वत्र पसरलेला असतो, जो मन बेचैन करतो याचप्रमाणे तुमच्या ही घरी असा एक वेगळ्या प्रकारचा वास येतो का? दवाखान्यासारखा नाही पण कोणताही वेगळा जो घरी येताच जाणवतो, तसं असेल तर त्याचे कारण शोधा व तो वास बंद होईल याची काळजी घ्या..
तो वास कोंडल्या सारखा असो किंवा बाथरूमचा.. घरामध्ये रूम फ्रेशनर, किंवा अगरबत्ती लावू शकता, ज्यामुळे घर अजून प्रसन्न राहील, व घरात पाय ठेवताच तुम्हाला प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. ज्यामुळे मना सोबतच आचरणामध्ये ही प्रसन्नता पाहायला मिळेल, घरामध्ये अंधाराचे वातावरण किंवा कमी उजेड असणे हे देखील नकारात्मक ऊर्जेच्या निर्माणाचा स्त्रोत असतो, घराच्या खिडक्या उघड्या असाव्या ज्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश आत येईल बाहेरची साफ हवा आत येईल व अजून प्रसन्न वाटेल.
जर तुमच्या घराला कमी खिडक्या असतील, तर किमान बल्ब सुरू करून प्रकाश वाढवू शकता. अशाप्रकारे घर प्रसन्न ठेवल्याने सकारात्मकता वाढत जाते. मनाची बेचैनी कमी होते, काही जण म्हणतात घरी येताच मला कसतरी होऊ लागतं त्याच कारण हिच नकारात्मक ऊर्जा आहे, यासाठी अजून काही उपाय आम्ही तुम्हाला सांगेनच जे तुम्हाला अजून उत्साही आणि सकारात्मक बनवतिल.. तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा