लग्न हे प्रत्येक मुलगी किंवा मुलाचे स्वप्न असते. लग्नानंतर, मुलगा व मुलगी दोघांच्याही जीवनाची नवीन सुरुवात होते. दोघांनी आपल्या भावी आयुष्याबद्दल खूप स्वप्ने बघितलेली असतात. तुम्ही नेहमीच बॉलीवूड फिल्म्समध्ये किंवा टीव्हीवर मालिकांमधून बघितले असेल, की लग्नाच्या पहिल्या रात्री वधू ही वरासाठी दुधाचा ग्लास घेऊन जाते.
असे केल्यामुळे त्या दोघांमधील दुरावा कमी होतो. तसे तर, ही प्रथा म्हणजे भारतात लग्नासंबंधी जोडली गेलेली एक परंपरा आहे, जी वर्षानुवर्षे आपल्याकडे चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी वर व वधू एकमेकांना ओळखत नसत. घरातील वडील मंडळी त्यांचे लग्न जमवत. त्यामुळे त्या दोघांना जवळ आणण्यासाठी तसेच वर जर थोडा घाबरला असेल, तर त्याला धीर यावा यासाठी ह्या दुधाचे प्रयोजन होते.
नातेसंबंध: जेव्हा दोन माणसे लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकतात, तेव्हा ती वेळ खूपच वेगळी असते. एक वेगळीच अनुभूति ते अनुभवत असतात. लग्नानंतर, जेव्हा दोन आत्म्याचे मिलन होते, तेव्हा त्याला लग्नाची “पहिली रात्र” असे म्हणतात. तेव्हा ही दोन्ही माणसे तनाने व मनाने जीवनभरासाठी एकरूप होतात.
भारतीय परंपरेतील लग्न ही पूर्वी २-३ दिवस चालत असत. त्यात हळद लावणे, घाना भरणे, ग्रहमख, व्याही भोजन या सारखे कार्यक्रम असत. त्यामुळे वराला आलेला हा थकवा दूर व्हावा यासाठी या दुधाचे प्रयोजन केले जायचे, ज्यायोगे वराला स्फूर्ति व ताकद मिळेल व दोघे एकमेकांच्या जास्त जवळ येतील, संवाद साधतील.
स्नायूमध्ये मजबूती आणते दूध: ह्या सोनेरी रात्रीची गोष्ट जितकी खास असते, तितकेच पतीसाठी त्या रात्रीसाठी जे दूध बनविले जाते, ते खास असते. त्या दुधात केसर, हळद, साखर, काळी मिरी, बदाम, आणि बडीशेप मिसळली जाते आणि ते खूप उकळवून कोमट असताना पतीला प्यायला द्यायला पत्नीकडे दिले जाते.
संप्रेरकामध्ये सुधारणा: दुधात असलेल्या या प्रोटिंसच्या मदतीने, टेस्तोस्टेरोन आणि एसट्रोजन या नावाचे दोन संप्रेरक (हार्मोन्स) बनतात. म्हणूनच वराला किंवा पतीला दूध व बदाम यांचे मिश्रण दिले जाते. क्रिया किंवा कार्य करण्यामध्ये वाढ: जर दूधामध्ये केसर किंवा शीलाजित मिसळून प्यायल्यामुळे पुरुषाच्या प्रजजन तंत्रासाठी चांगले असते. नियमित दूध प्यायल्यामुळे कामवासना, शुक्रजंतूंची संख्या व कार्यक्षमता वाढते.
रोगप्रतीकरक शक्ति आणि पचनशक्ति यामध्ये वाढ: आयुर्वेदानुसार, दूध शरीरातील प्रजजन स्नायूंना ऊर्जा देते. दुधानी बुध्हि तल्लख होते आणि रोगप्रतीकरक शक्ति वाढते तसेच पचंनाच्या क्रियेत सुधारणा होते. शरीरातील ऊर्जा वाढते: दुधात कार्बोहायड्रेटची मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते. कार्बोहायड्रेट तुमच्या किडनी आणि मेंदूच्या कार्याला अधिक गतिमान बनवतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.