पावसाच्या दिवसात डास आपली झोप उडवतात. काही वेळेस डासांपासून वाचण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे जिन मौस्कीटो रेपेलन्ट याचा वापर करतो. त्याचा डासांवर अधिक परिणाम होत नाही किंवा धूराने आपलाच दम घुटल्यासारखे वाटते. ऋतूमध्ये उकाडा सुरू झाला, की डासांची संख्या वाढू लागते. अशावेळी, बाजारात मिळणारी रसायने, स्प्रे, किंवा रीफील्स सुद्धहा कामी येत नाहीत. जर तुम्ही सुद्धहा या समस्येने हैराण असाल, तर या उपायांनी डासांपासून सुटका मिळवू शकता.
कडूलिंब हे अनेक गुणांचे भांडार आहे. म्हणूनच त्याला “गावातील दवाखाना” असे संबोधले जाते. तब्येतीसाठी उपयोगी असलेला कडूलिंब हा डास व माशा यांना आपल्या शरीरापासून दूर ठेवतो. यांना स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणाला आपल्या शरीरावर लावा. या तेलाचा प्रभाव कमीत कमी ८ तास तुमच्या शरीरावर राहतो. याप्रमाणे, डास किंवा माश्या तुमच्या शरीराजवळ याला घाबरतील.
सगळ्यात पहिले कडूलिंबाच्या तेलामध्ये कापुर मिसळून एका स्प्रेच्या बाटलीत भरा. आता हे मिश्रण तमालपत्रावर शिंपडा आणि तमालपत्र जाळा. तमालपत्राचा धूर तब्येतीसाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पति मिळतात. ज्यामध्ये अशी काही रोपे आहेत, जी डासांना पळवून लावून वातावरणही स्वछ ठेवण्यास मदत करतात. या रोपांमध्ये पवित्र अशा तुळशीचे, पुदिन्याचे आणि लेमनग्रास ही रोपे मुख्य मानली जातात. या रोपाना आपल्या बागेत किंवा व्हरांड्यात लावल्यामुळे तुम्ही पावसाळी दिवसात आपल्या बागेचा आनंद घेऊ शकता व डासापासून स्वत:ला वाचवू शकता.
डासांची घरात वाढ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. डासांचे चावणे हे आपल्यासाठी अनेक आजारांचे कारण होऊ शकते. जास्त करून, उन्हाळ्याच्या दिवसात डासांची वाढ जास्त प्रमाणात होते. त्यापासून सुटका मिळावी, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. चला तर मग, पाहूया आपण काय करू शकतो.
डासांच्या अनेक जाती असतात, ज्याना जंतु आणि घाम या दोन्ही गोष्टी प्रिय आहेत. काही डास एखाद्या विशिष्ट वासाने आकर्षित होतात. डास संध्याकाळच्या वेळी आपले खाणे शोधतात. त्यांना वासाचे खूपच चांगले जाण असते. हेच कारण आहे, की ते रक्ताचा स्त्रोत असलेला माणूस व प्राणी यांचा शोध घेतात. कार्बन डाइऑक्साइड आणि आपल्या शरीराला येणारे काही प्रकारचे गंध हे डासांसाठी महत्वाचे असतात.
कडूलिंबाच्या झाडाची पाने बरीच गुणकारी असतात. ती आपल्या घरातील डासांना पळवून लावण्यास आपल्याला मदत करतात. डासांना पळवून लावण्यासाठी आपण शेणाच्या गोवर्यानमध्ये कडूलिंबाची पाने जाळा. त्यापासून निघणारा धूर डासांना घराबाहेर पळवून लावतो. त्याशिवाय कडूलिंबाच्या तेलामध्ये दिवा लावून जाळला तर डास पळून जातात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.