आपली त्वचा सुंदर बनविण्यासाठी आपण सगळेच साबणाचा वापर करतो. त्याचबरोबर आपण त्याचा उपयोग हात धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी पण करतो. बाजारात मिळणारे सर्व साबण विक्रेते असा दावा करतात, की त्यांच्या साबणामुळे त्वचा मऊ व मुलायम होते. परंतु, हे खरे नाही. साबण कोणता आहे, नैसर्गिक आहे, की रसायनयुक्त आहे, व तो कुठे वापरला तर हानिकारक नाही, या सर्वांची माहिती असणे खूपच आवश्यक आहे.
प्राचीन काळात साबणाऐवजी सर्व घरगुती प्रकार वापरले जात होते, जसे की मुलतानी माती, हळद, बेसन, मलाई. परंतु, आता या सर्वाचा वापर बंद झाला आहे, व लोक वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरु लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत, की शरीराच्या कोणत्या भागाला तुम्ही साबण लावलात, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया, या विषयी थोडेसे:
तुम्हाला माहीतच आहे, की साबण बनविण्यासाठी अनेक रसायनांचा उपयोग केला जातो. जर तुम्ही चुकीच्या जागेवर साबण वापरलात, तर तुमचे नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की आंघोळ करताना शरीराच्या या तीन भागावर साबणाचा उपयोग किंवा वापर करू नये, चला तर मग जाणून घेऊया, ते कोणते अवयव आहेत, ज्यावर साबण लावायचा नाही.
जर आंघोळ करताना तुम्ही नाकाच्या आतील बाजूस साबण लावत असाल, तर तुम्ही जळजळ अनुभवता, आणि त्यामुळे तुम्हाला डोक्याच्या कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागेल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चेहर्याला कडूनिंब, आवळा, किंवा कोणत्याही आंबट खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा उपयोग करू नये, कारण त्यांचा चेहर्यावर वाईट परिणाम होतो. याचे कारण असे आहे की, आपल्या चेहर्याची त्वचा खूप मऊ असते.
कानात साबणाचा उपयोग करू नये: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपण साबणाचा उपयोग कधीही कानात करू नये. जर चुकूनही साबण कानात गेला, तर ऐकण्याची क्षमता कमी होते. एवढेच नाही, तर कांनातून पिवळा द्रव निघू लागतो.
हाताची वरील त्वचा: तुम्ही हाताला साबण लावू शकता, त्यात काहीही अडचण नाही. पण जेव्हा तुमच्या हाताला खाज येत असेल, तेव्हा मात्र चुकूनही साबण वापरू नका. त्यामुळे खाज जास्त येते आणि तुमची त्वचा खराब होते.
केसांना साबण लावू नका: डॉक्टरांच्या मते जर तुम्ही केसाला साबण लावत असाल, तर त्यामुळे केसात कोंडा होतो. त्याशिवाय केस हळूहळू अशक्त होतात आणि तिथे पांढरे केस येऊ लागतात. जर साबणच वापरायचा असेल, तर मग शॅम्पू कशासाठी बनवला गेला आहे. जर केसात साबण लावला, तर केस हळूहळू निर्जीव होतात, व ते गळायला सुरुवात होते. परंतु, एक गोष्ट लक्षात घ्या, शॅम्पूसुद्धहा नैसर्गिक असेल तोच वापरा. त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.