दिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….

प्रत्येक व्यक्तिला असे वाटत असते, की आपला दिवस आनंदात मजेत जावा. आपण व आपला परिवार यांच्या दिवसाची सुरुवात उत्तम व्हावी. पण यासाठी, फक्त वाटणे महत्वाचे नाही, तर त्यासाठी आपणही तसे वागले पाहिजे. “व्यक्ति तितक्या प्रकृती” असे म्हटलेच आहे. म्हणजेच, सगळ्या व्यक्तींचे स्वभाव सारखे नसतात. काही व्यक्ति शांत असतात, देवभोळे असतात, तर काही नास्तिक असतात. काही लोक आळशी असतात, सकाळी लवकर उठत नाहीत, तर काही पहाटे उठून आपली कामे पटपट उरकतात.

काहींना खोटे बोलायची सवय असते, तर काही अगदी सरळमार्गी असतात. काही आनंदी तर काही शीघ्रकोपी असतात. तर काही व्यक्ति भिडस्त असतात, तर काही व्यक्तींना दुसर्‍याचा अपमान करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. अशा अनेक प्रकारच्या स्वभावाच्या व्यक्ति आपल्या आजूबाजूला असतात. पण आपल्या दिवसाची सुरुवात छान व्हावी असे जर वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी थोडी मार्गदर्शक माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग, दिवसाची सुरुवात छान होण्यासाठी काय करावे लागेल ते पाहूया:

कधीही व्यक्तीने सकाळी उठल्यावर खोटे बोलू नये. सकाळी उठून खोटे बोलल्यावर व्यक्तीचा सगळा दिवस वाईट जातो. विशेषत: आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की त्यांनी मुलांसमोर खोटे बोलू नये. कारण मुले आईवडिलांच्या सगळ्या गोष्टी लवकर शिकतात व त्याचे अनुकरण करतात.

शास्त्रानुसार सकाळी उठण्यासाठीची वेळ ही “ब्रम्ह मुहूर्त” मानला गेला आहे. जी व्यक्ति सूर्योदय झाल्यानंतर झोपून राहाते, ती व्यक्ति आळशी बनत जाते. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले ध्यानधारणा केली पाहिजे. ज्यामुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात उत्तम होईल.

सकाळी उठल्यावर परिवरातील कोणाचाही अपमान करू नये. सकाळी उठल्यावर कोणाचा अपमान केला, तर नात्यात दुरावा येऊ शकतो. ज्यामुळे आपापसातले संबंध बिघडू शकतात. सकाळी उठल्यावर सगळ्यांशी गोड बोलावे. प्रेमाने बोलावे. त्यामुळे दिवसाची सुरुवात छान होईल.

माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू राग किंवा क्रोध आहे. म्हणूनच, सकाळी उठल्यावर कोणावरही रागावू नये. रागाच्या भरात केलेली कामे आपल्याला अडचणीत आणून पश्चातापाचे कारण ठरू शकतात. दिवसाची सुरुवात खराब होऊ नये, म्हणून सकाळी उठल्यावर कधीही रागावू नये. नेहमी हसतमुख राहावे.

सतत कार्यक्षम राहावे, म्हणजे आपले मन कशाना कशात तरी गुंतले की आपणही प्रसन्न राहतो. वेळ चांगला जातोच, पण त्याचबरोबर आपण काहीतरी उत्तम कार्य करतो आहोत याचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. चला तर मग, स्वत:चा आनंद स्वत:च शोधूया.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *