हरयाणातील मुलगी जेव्हा मराठी मुलाकडून प्रेग्नंट राहते, लग्न करायची वेळ येते तेव्हा मुलग्याचे वडील….

गुरूनाथ सुभेदार इंजनियरिंग कॉलेजमधील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होता. त्याच्याच कॉलेजमध्ये एक राधिका नावाची हरियाणवी सुंदर मुलगी होती. गुरू व राधिका एकमेकांच्या प्रेमात पडले होते. राधिकाला मराठी येत नव्हते ! गुरूच तिला थोडं थोडं मराठी शिकवत असे व तिही तोडकं- मोडकं मराठी बोलत असे. ज्यामूळे गुरूला तिचे खूपच कौतूक वाटत असे. असेच पाहता पाहता त्यांचे कॉलेज संपले व ते दोघे एकाच कंपनीत काम करू लागले. गुरूच्या घरचे त्याच्यासाठी स्थळे शोधू लागले. पण गुरूचे राधिकाबद्दल घरच्यांना सांगायचे धाडसच होत नव्हते. त्याच्यासाठी आणलेली स्थळे तो नापसंद करत होता. प्रत्येक मुलीत तो दोष दाखवत असे.

राधिकाचीही परिस्थिती वेगळी नव्हती. घरचे लग्नाचं नाव काढतील म्हणून ती गावी हरियाणाला जातच नव्हती. आता तर ती अस्खलित मराठी बोलू लागली होती.. आणि अचानक एक दिवस राधिका गुरूला घाबरून विचारू लागली ! ” गुरू आपले लग्न केव्हा होणार ? ” असं काय करतेस राधिका ! घरी मी तूझ्याबद्दल सांगितलं की घरच्यांचा होकार येईल व आपण लगेच लग्न उरकू ( पण गुरू तू कधी घरच्यांना विचारणार ? गेली सात वर्षे मी हेच ऐकत आली आहे ! राधिका आज मी नक्की विचारतो असंही तूला घरी माझ्याबद्दल सांगवेच लागेल. कारण …. कारण मला दिवस गेले आहेत … ” काय ? अरे सोंड्या मग यात एवढं चेहरा पाडण्यासारखं काय आहे ! मी बाप होणार याहून आनंदाची गोष्ट काय असेल ! मी जबाबदारी स्विकारायला तयार आहे. खरंच गुरू आय लव यू..

त्यानंतर गुरू संध्याकाळीच घरच्यांना राधिकाबद्दल सांगतो. त्याचे वडिल खूप संतापतात. त्यांना सून म्हणून मराठी मुलगीच हवी असते. हरियाणवी नव्हे! ते साफ नकार देतात. व गुरूचा जबरदस्ती एका मुलीशी साखरपूडा ठरवतात.. आँफिसमध्ये लंच टाईमला राधिका गुरूचा उतरलेला चेहरा पाहते व विचारते. ” गुरू काय झालं ? उदास का आहेस ? घरी सांगितलंस का आपल्याबद्दल ? काय म्हणाले ? “ राधिका शांत हो घरच्यांनी नकार दिलाय कारण तू मराठी नाहिस !” “पण तूझ्याशी लग्न करून मी मराठीच होईन ना!” “हे बाबांना कोण समजवणार ? ” गुरू निराशेने म्हणाला … “मी माझ्या बाबांना तूझ्याबद्दल सांगू का ?” “नको राधा त्यांचाही नकार असेल तर ते तूला परत महाराष्ट्रात पाठवतील का ! लगेच दूसऱ्याशी लग्न लावून देतील ” “गुरूमग आता ….. ‘

आता एकच उपाय- आपण पळून जाऊन लग्न करायचे. दूर कोठेतरी संसार थाटू ! तू ताबडतोब तूझ्या बाबांना पत्र लिही व आपला निर्णय कळव. मीही माझ्या बाबांना पत्र लिहून कळवतो. ‘त्यानंतर दोघेही विवाहबद्ध होतात. नवा संसार थाटतात. गुरूच्या साथीमूळे राधिकाही सर्व निभावून नेते. अखेर काही महिन्यांनी तिला छानशी मुलगी होते. तिचं नाव ते शनाया ठेवतात. बघता बघता शनाया चार वर्षाची होते. राधिका व शनाया अंगणात लपाछपी खेळत असतात. शनाया घरात किचनमध्ये लपून बसते.

राधिका शोधते – शोधते पण सापडतच नाही . राधिका घाबरून शनायाला हाका मारू लागते. आवाज ऐकून शनाया पळत येते. राधिकाला शनायाला पाहून हायसे / बरे वाटते..ती पटापट शनायाचे पापे घेऊ लागते … आणि तिच्या डोक्यात विचार येतो माझ्या चार वर्षाच्या मूलीच्या तीन मिनटे गायब होण्याने मी इतकी गर्भगळीत झाले. मी पळून आल्यावर आई-बाबांची तिकडे काय अवस्था झाली असेल! * गुरू कामावरून आल्यावर राधिका हट्ट करते की दोघांच्याही घरच्यांना पत्र पाठवा व आपल्या घरच्याना शनायाच्या पाचव्या वाढदिवसाला बोलव .. गुरू राधिकाला नाराज करत नाही.

तो पत्राने शनायाच्या बर्थडेला दोघांच्याही घरच्यांना बोलवतो. शनायाचा आज वाढदिवस असतो. ती आज आजी-आजोबा येणार या आशेने खूप खूश असते. पण गुरूला उगाच वाटत असते की ते कदाचित येणार नाहित. शनाया केक कापायची थांबलेली असते. सर्व तिचे मित्र मैत्रिणी ताटकळत थांबलेले असतात. आणि काय आश्चर्य ! दारात एक गाडी येते व त्यातून राधिका व गुरूचे बाबा गाडीतून एकमेकांसोबत येतात … शनायाला उचलून घेतात. दोघे नातीला गिफ्ट देतात. वाढदिवस खूप छान पार पडतो. गुरूचे वडिल त्याला गावी येण्यास सांगतात. तेव्हा गुरू त्यांना सांगतो, ” बाबा तूम्हाला मराठी सून हवी होती ना ? ” ” हो, पण गुरू राधिकाही मराठीच आहे” “राधिका मराठ . ते कस काय ? ” यानंतर राधिकाचे बाबा सांगू लागतात की…

“जेव्हा अहमदशाहा अब्दाली व मराठ्यांची पानिपतची तिसरी लढाई झाली तेव्हा लाखो वीर धारातिर्थी पडले. तर काही सैरभैर झाले. काहिंनी सगळंच गमावल्याने तिथेच स्थायिक झाले..अजूनही हरियाणात काही मराठ्यांचे वंशज आहेत. काहिंना कल्पनाही नाही की ते मूळचे मराठे आहेत. आमचे पूर्वजही मूळचे मराठेच होते जे पानिपतच्या लढाईनंतर हरियाणात स्थायिक झाले. त्यामूळे राधिका ही मराठीच आहे ! पाच वर्षापूर्वी मी पत्र वाचल्या वाचल्या सुभेदार साहेबांची भेट घेतली व सविस्तर मूद्दा व वंशावळ त्यांना दाखवली. पण तूम्ही दोघे पळून गेल्याने तूम्हा महाभागांचा पत्ताच नाही. आम्ही शोधाशोध केली पण सापडलाच नाहित .. गुरू राधिकाच्या बाबांची क्षमा मागतो.. त्यानंतर गुरू गावी येतो व राधिकाला खऱ्या अर्थाने सासर लाभते !

– लेखन नि.ता. (निलेश कांबळे)

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. फोटो प्रतिकात्मक आहे आणि तुम्हाला लेख कसा वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *