चित्रपटांपासून २६ वर्षे दूर आहे, तरीही यामुळे एखाद्या महाराणीसारखे आयुष्य जगते आहे ही अभिनेत्री…

बॉलिवूडच्या जगात दरवर्षी किती लोक येतात व किती जातात, हे तर बर्‍याच जणांना माहित आहे. काही अभिनेता किंवा अभिनेत्री, बर्‍याच फिल्म्समध्ये काम करून आपली एक स्वतंत्र अशी ओळख बनवून, एक आपले स्थान निर्माण करतात. तर काही या चमचमत्या गर्दीत हरवून जातात. बाहेरून झगमगीत दिसणार्‍या या फिल्म जगाचे रहस्य जे त्यात असतात तेच अनुभवू शकतात, कारण त्यांनी या फिल्मी जगात आपले आयुष्य जगलेले असते.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड चित्रपटातील एका अशाच अभिनेत्रीबद्दल सांगू इछितो, जिने अमिताभ, गोविंदा, राजेश खन्ना यासारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे आणि बर्‍याच सुपरहिट चित्रपटांमधून चाहत्यांची वाहवा मिळविली आहे. पण काही काळानंतर, ती या चित्रपटसृष्टीपासून दूर गेली, पण असे असूनही, ती आज राण्यांसारखे जीवन जगत आहे.

सन १९९०च्या काळात आलेला चित्रपट “स्वर्ग” तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, गोविंदा आणि जूही चावला होते, हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट होता. त्या काळातील हा एक गाजलेला चित्रपट होता. या चित्रपटात एक पात्र होते माधवी. माधवीने राजेश खन्नाच्या पत्नीची भूमिका केली होती.

यासोबतच माधवी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गिरफ्तार’ या चित्रपटातील गाण्यात दिसली होती, ते गाणे होते,. “धूप निकल निकला ना करो रूप की राणी”. याशिवाय माधवीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘अंधा कानून’ आणि ‘अग्निपथ’ या दोन चित्रपटातही काम केले होते.

माधवीचे फिल्मी करियर: माधवीने आपल्या करिअरची सुरूवात मात्र दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली, त्यानंतर तिने १९८१ मध्ये ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अंधा कानून (१९८३), ‘मूझे शक्ती दो’ (१९८४), ‘ अग्निपथ ‘(१९९०),’ मिसाल ‘(१९८५ ),’ गिरफ्तार” ‘(१९८५),’ लोहा ‘(१९८७),’ सत्यमेव जयते ‘(१९८७),’ प्यार का मंदिर'(१९८८),’ स्वर्ग ‘(१९९०) जख्म (१९८९) ‘हारजीत’ (१९९०) सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले. १९९४ मध्ये आलेल्या चित्रपट ‘खुदाई’ यात त्यांनी शेवटचे काम केले, आणि त्यानंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला.

माधवीचे वैयक्तिक आयुष्य : माधवीचे लग्न तिचे गुरू स्वामी रामा यांनी फार्मास्युटिकल उद्योगपती राल्फ शर्मा यांच्याबरोबर करून दिले. माधवी आणि राल्फ यांची भेट हिमालय इंस्टीट्यूट ऑफ योग विज्ञान आणि तत्वज्ञान या संस्थेत झाली होती. त्यानंतर दोघांनी १९९६ मध्ये लग्न केले आणि तेव्हापासून माधवी चित्रपटजगतापासून दूर झाली.

माधवी सध्या आपल्या कुटूंबासह न्यूजर्सी येथे राहते. माधवी आणि राल्फ यांना प्रिस्सिला, टिफनी आणि इवेलीन या तीन मुली आहेत. ती तिकडे राणीसारखे आलीशान जीवन जगते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *