जर तुमच्याही हाताच्या तळव्यावर आहे ही खास खूण, तर तुमच्या नशिबात आहे श्रीमंत होण्याचा योग…

आपले पूर्वज व मोठी माणसे असे म्हणतात, की आपले नशीब आपल्या हातात असते. ते नशीब आपल्या हातवरील रेशांमध्ये सामावलेले असते, जी काळानुसार बदलत असते. हाताच्या याच रेषांच्या अभ्यासाला “हस्तरेषा विज्ञान” म्हटले जाते. कोणाचा या सर्व गोष्टीवर विश्वास असतो किंवा कोणी आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतो. व्यक्ति तितक्या प्रकृती हेच खरे आहे.

आपल्या हातावर मुख्य अशा ३ रेषा असतात. एक म्हणजे मस्तिष्क रेषा, दुसरी जीवन रेषा आणि तिसरी हृदय रेषा. त्याशिवाय एक आणखी रेषा असते, ती म्हणजे “भाग्य रेषा”. ही भाग्य रेषा खूप लोकांच्या हातावर असते, तर काही वेळेला ती काही लोकांच्या हातावर नसते. हाताच्या मधल्या बोटाच्या खालील बाजूस शनि पर्वत ज्याला आपण “भाग्य स्थान” असेही म्हणतो, तिथे जी रेषा पोहोचते त्याला “भाग्य रेषा” असे म्हणतात. ज्यांच्या हातावर ही रेषा असते, असे लोक नेहमी श्रीमंती उपभोगतात व सुखी राहातात.

श्रीमंत होण्याचा योग: आपल्या पूर्वजांनी काही ग्रंथांची रचना केली होती, ज्याच्या आधारे भविष्य जाणून घेतले जात असे. त्या ग्रंथांमध्ये हस्तरेखाशास्त्र हे मुख्य आहे. या ग्रंथांमधून हाताच्या रेषा, त्यावरील खुणा, व प्रकार यावरून भविष्याविषयी माहिती जाणून घेतली जात असे. आज आम्ही तुम्हाला सांगनार आहोत, उज्जैनच्या हस्तरेखा विशेष डॉक्टर विनीता नगर यांच्या मतानुसार हाताच्या तळव्यावर असणार्‍या त्या खास चिन्हांबद्दल, जे व्यक्तिला श्रीमंत बनवण्यास करणीभूत आहेत.

जर जीवनरेषा गोल असेल व मस्तिक रेषेचे दोन भाग झालेले असतील, त्याशिवाय तळहातावर त्रिकोण चिन्ह असेल, तर अशा व्यक्ति हस्तशात्रांनुसार खूपच भाग्यवान असतात. अशा लोकांना थोड्या थोड्या काळानंतर धनलाभ होत असतो. जर भाग्य रेषा हे मणीबंधापासून सुरू होऊन शनिपर्वत येथे संपते, आणि जर भाग्यरेषा निर्दोष असेल, तर अशी व्यक्ति उद्योगधंद्यात सफल होते. त्यांना व्यवसायातून खूप धनप्राप्ती व लाभ होतो.

जर कोणाचा तळवा भुगीर व पसरट असेल, त्याशिवाय करंगळी कोमल व नाजुक असेल, तर हस्तशात्रांनुसार अशा व्यक्ति कमी वयातच खूप श्रीमंत होतात. तळव्याचे मध्यमा बोट म्हणजेच शनि पर्वताजवळ दोन किंवा दोनापेक्षा जास्त उभ्या सरळ रेषा असतील, तर अशा व्यक्तींचे नशीब नेहमीच त्यांच्याबरोबर असते. असा योग असलेल्या व्यक्ति त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता अनुभवत नाहीत. त्यांना पैशासाठी कधीही झगडावे लागत नाही. लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असते.

जर हाताच्या तळव्यावर शनिपर्वत उठून दिसत असतील, व जीवनरेषा योग्य प्रकारे आकारात असेल, तर अशा व्यक्ति नेहमीच श्रीमंत व सुखात राहातात.

One Comment on “जर तुमच्याही हाताच्या तळव्यावर आहे ही खास खूण, तर तुमच्या नशिबात आहे श्रीमंत होण्याचा योग…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *