डाळिंब हे शरीरातील रक्त वाढविण्यासाठी खाल्ले जाणारे फळ आहे. पण हे लक्षात ठेवले पाहिजे, की डाळिंब पूर्ण खाल्ले पाहिजे, कारण डाळींबाचे सगळेच दाणे गुणकारी असतात असे नाही, ते अर्धे किंवा कोणाबरोबर हिस्सा करून खाऊ नका. पूर्ण डाळींबाचे सेवन करा. हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. ते तुम्ही रसाच्या स्वरुपात खाऊ शकता. डाळिंबाचा रस ताजा घेतला पाहिजे. तो अधिक गुणकारी आहे. बाजारात मिळणारा रस हा शुद्ध नसतो. डाळिंब तुम्ही सॅलडच्या रूपात खाऊ शकता. पण तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून स्वत:साठी थोडा वेळ जरूर काढा व ह्या गुणकारी फळाचा आपल्या आहारात समावेश करा.
डाळिंबाचा एक दाणासुद्धहा कितीतरी गुणांनी भरलेला असतो. डाळिंब हे १०० आजारांचे एकमेव औषध आहे. याचा रस जर कपड्यावर पडला, तर सहज धुवून निघत नाही. परंतु, डाळिंबात असे गुण आहेत, की ते खाऊन तुम्ही कितीतरी रोगांना पळवून लावू शकता. डाळिंब कितीतरी रोगांसाठी गुणकारी आहे. चला तर मग, जाणून घेऊया याचे गुणधर्म :
डाळिंब पित्तशामक, कृमी नष्ट करणारे, तसेच पोटांच्या तक्रारीवर गुणकारी आहे. तसेच जीव घाबरत असेल, तर त्यासाठी गुणकारी आहे. डाळिंब स्वरतंत्र, हृदय, यकृत, अमाशय, तसेच आतड्यानच्या रोगावर गुणकारी आहे. डाळिंबा मध्ये अॅंटीओक्सीडेंट, अॅंटीवायरल, आणि अॅंटी ट्यूमर असे तत्व असतात. डाळिंब हे विटमिन्सचा चांगला स्त्रोत आहे. ह्यामध्ये विटामीन ए, सी, आणि ई भरपूर प्रमाणात असते.
डाळिंब हृदयरोग, पोटाच्या तक्रारी, मधुमेह, यासारख्या रोगांवर गुणकारी आहे. डाळिंबाची साल व पाने हे खाल्ल्याने पोटाच्या तक्रारीवर आराम पडतो. पचन संस्थेच्या सर्व आजारांवर डाळिंब अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होते. डाळिंबामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, की शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढते.
डोळ्यांसाठी हे फायदेशीर आहे. वाळलेल्या डाळिंबाच्या सालींचे चूर्ण दिवसातून 2-3 वेळा एक एक चमचा ताज्या पाण्याबरोबर घेतल्याने परत परत लघवी होण्याच्या आजारावर उपायकारक आहे. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचंनाच्या सर्व तक्रारींवर आराम पडतो. दस्त आणि कॉलरा या रोगांवर डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे आराम पडतो. मधुमेही लोकांना डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कोरोंनरी आजारांचा धोका कमी संभवतो.
डाळिंबाच्या साली पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्यास श्वासाचा दुर्गंध नाहीसा होतो. डाळिंबाच्या सालींचे चूर्ण सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घेतल्याने पाइल्स या रोगापासून सुटका होते. खोकला झाला असेल, तर डाळिंबाची साल तोंडात धरून हळू हळू चोखली तर खोकला बरा होतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.